Read in
मंगळवार 21 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 21 डिसेंबर चंद्ररास मिथुन 15:46 पर्यंत व नंतर कर्क.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
मंगळवार 21 डिसेंबर चंद्ररास मिथुन 15:46 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 22:24 पर्यंत व नंतर पुष्य. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज 21 डिसेंबर उत्तरायणास आरंभ होत आहे.
मेष :–दूरदर्शन टेलिफोन, सिग्नल यंत्रणेत काम करणार्यांच्या हातून आज एखादे अवघड वाटणारे काम पार पडेल. जनसंपर्क अधिकार्यांना आज मोठ्या दिव्यातून जावे लागेल.
वृषभ :–ज्यांना डोळ्याच्या दुखण्याचा त्रास आहे त्यांना योग्य दिशा सापडेल. विद्यार्थी आपल्या वाक्चातुर्याने इतर मित्रमंडळींवर प्रभाव पाडतील.
मिथुन:–संततीच्या प्रदेश दौर्याविषयीच्या विषयात तुम्हाला आज महत्वाची भूमिका घ्यावयाची आहे. वडिलांचे शेअर्समधून धनलाभ होईल.
कर्क :–आज कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. तसेच आज अचानक प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल व उत्साह वाटणार नाही. रोजच्याच कामातही आळस वाटेल.
सिंह :–आज एकटे राहणार्यांना आपल्या माणसात राहण्याची इच्छा निर्माण होईल. जुने हेवेदावे सोडण्यात तुमच्याकडून पुढाकार घेतला जाईल.
कन्या :–आज तुम्ही कोणालाही कोणताही सल्ला देऊ नका कितीही बरोबर असला तरी तुमच्याच अंगाशी येईल. तुम्ही करत असलेल्या उपासनेवरील विश्वासात वाढ होईल.
तूळ :–पोलीस खात्यातील अधिकार्यांनी आपल्या अधिकारांची मर्यादा पाळावी. लहान मुलांच्या अचानक होणार्या पोटदुखीवर औषध करावे लागेल
वृश्र्चिक :–सध्या सुरू असलेल्या उच्च शिक्षणात अचानक अडचणी येऊ लागतील नाराज न होता तज्ञांचे मार्गदर्शन घ्या. जुन्या मित्रांच्या भेटीचा सुखद अनुभव येईल.
धनु :–आज तुमच्या समोर असलेल्या प्रश्नांविषयी मनात नकारात्मक विचार येणार आहेत तरी पूर्ण विचारानेच निर्णय घ्या. महिलांना जवळच्याच व्यक्तींकडून अपकिर्ती होत असल्याचे जाणवेल.
मकर :–नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रमाणापेक्षा जास्त असलेली इन्हाँल्वमेंट इतराना त्रासदायक होईल. प्रेमाच्या व्यवहारात अडचणी निर्माण होण्याचे संकेत मिळतील.
कुंभ :–आर्थिक नुकसान करणार्या घटना घडतील. आज मनात आले म्हणून अचानक खरेदी करू नका. पुरूषांनी आपल्या अधिकारात कौटुंबिक निर्णय एकट्याने घेऊ नयेत.
मीन :–काल परवा डोळ्यासमोर असलेला कामाचा डोंगर आज तितका मोठा वाटणार नाही. सहकारी व जवळचे मित्र यांची खूप मोलाची मदत मिळेल.
||शुभं-भवतु ||