Read in
सोमवार 20 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 20 डिसेंबर चंद्ररास मिथुन.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
सोमवार 20 डिसेंबर चंद्ररास मिथुन. दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 19:45 पर्यंत व नंतर पुनर्वसु. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–जवळच्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर जर एखादा वाद झाला असल्यास तो मिटवण्यास आजचा दिवस फारच चांगला आहे. अंतस्फूर्तीने एखाद्या गोष्टीची सुचक चाहूल लागेल.
वृषभ :–आज तुमची वृत्ती खर्चिक राहणार असल्याने बाहेर जाताना पैशाचे पाकीट आतून गरजेपेक्षा जास्त पैसे नेऊ नका. एखाद्या जवळच्या मित्राच्या चैनीसाठी मनात नसूनही खर्च करावा लागेल.
मिथुन :–कुटुंबात नवीन पाहुणा येणार असल्याचे गुपित कळेल. लांबच्या प्रवासात भेटलेली ओळख पुन: नव्याने ताजी होईल. सरकारी कामात दुसर्याची लुडबूड होऊ देऊ नका.
कर्क :–तुम्ही ठरवलेल्या कामाच्या बाबतीत दुसर्याच्या हस्तक्षेपामुळे कामात बिघाड निर्माण होईल. आज तुमचा कल मोठी गुंतवणूक करण्याकडे लागेल.
सिंह :–नोकरी व्यवसायातील करावयाच्या बदलाच्या बाबतीत तुमचे मत ठाम राहणार नाही. शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याचा त्रास सोसावा लागणार आहे.
कन्या :–कुटुंबात प्रमुखांच्या मताने चालताना कांही प्रमाणात नाराजी निर्माण होईल. घरगुती व्यवसायाच्या निमित्ताने लागणार्या वस्तूंची खरेदी कराल.
तूळ :–पूर्वीच्या केलेल्या गुंतवणूकीतून चांगला लाभ होईल. इतरांना उसनवार दिलेले पैसे येत्या दोन चार दिवसात मिळणार असल्याचा निरोप येईल.
वृश्र्चिक :– तुमच्या कंजूष वृत्तीचा मित्रमंडळींकडून वेगळाच अर्थ काढला जाईल. हरवलेल्या वस्तूंचा अचानक शोध लागेल. आजारपणातून बरे वाटलेल्यांना फार मोठ्या संकटातून वाचल्याच भावना होईल.
धनु :– नुकत्याच विकत घेतलेल्या वस्तूत बिघाड निर्माण झाल्याने त्याचे पैसे रिफंड मिळणार आहेत. अध्यात्मिक उपासकांना आपल्या अभ्यासाबाबत स्वत:लाच शंका निर्माण होईल.
मकर :–विवाहाच्या बाबतीत ठरवलेल्या विचारात बदल झाल्यामुळे अडचणी निर्माण होतील. व्यावहारिक पातळीवर बोलताना अविचाराने बोलू नका.
कुंभ :–नोकरीतील तुमच्यावर असलेल्या जबाबदारी बाबत वरिष्ठ खूष असतील. कुटुंबातील अडचणींवर मित्रमंडळींकडून आवश्यक ती मदत मिळेल.
मीन :–नोकरीत करावयाच्या बदलाबाबत तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही हालचाल करू नका. स्पर्धात्मक यशात मात्र चांगले यश मिळणार आहे.
||शुभं-भवतु ||