Read in
रविवार 19 डिसेंबर 2021 ते शनिवार 25 डिसेंबर 2021 पर्यंत साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 19 चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 16:51 पर्यंत व नंतर आर्द्रा.
सोमवार 20 चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 19:45 पर्यंत व नंतर पुनर्वसु. मंगळवार 21 चंद्ररास मिथुन 15:46 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 22:44 पर्यंत व नंतर पुष्य. बुधवार 22 चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 24:44 पर्यंत व नंतर आश्लेषा. गुरूवार 23 चंद्ररास कर्क 26:40 पर्यंत व नंतर सिंह, चंद्रनक्षत्र आश्लेषा 26:40 पर्यंत व नंतर मघा. शुक्रवार 24 चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 28: 09 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. शनिवार 25 चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 29:04 पर्यंत व नंतर उत्तराफाल्गुनी.
बुधवार 22 संकष्ट चतुर्थी चंद्रोदय20 :48 (मुंबई)
शनिवार 25 ख्रिसमस, नाताळ.
मेष :–तुमचा स्वत:च्या मोबाईलमधे अचानक बिघाड निर्माण होईल व कामाची कुचंबणा होईल. वर्तमानपत्र किंवा प्रसार यंत्रणेत काम करणार्यांना आपल्या हातून “ ध चा मा ” होत नाही ना याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.संवत:च्या क्षमतेविषयी अती बढाई करू नका व दाखवू पण नका. तुम्हाला या सप्ताहात तुमच्या जबरदस्त आकलनशक्तीचा अनुभव येईल. विद्यार्थ्यानी आलेल्या संधीचा फायदा घ्यावा.
वृषभ :–लेखन कला असलेल्यानी आपले लेखन प्रकाशित करणार्या संस्थेबरोबर बोलणे सुरू ठेवावे. काही तुमच्या वैयक्तिक कामाबाबत लांबचा प्रवास करण्याची तयारी ठेवावी. जोडिदाराच्या मदतीने या सप्ताहात महत्वाच्या वस्तूंची खरेदी कराल. तरूणांना नोकरी करता करता व्यवसायाची नवीन दिशा सापडेल. विद्यार्थी वर्ग आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारावर भरार्या मारतील. मवयस्कर मंडळीना होम सिकनेसचा त्रास जाणवेल.
मिथुन :– मनातील योजना कार्यान्वित करण्यासाठी हा सप्ताह एकदम उपयोगी पडणार आहे. घसा खवखवणे, दुखणे यावर लगेच पँनिक होऊ नका. हा सप्ताह तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीकोनातून अतिशय लाभदायक राहणार आहे. महिलांना स्वयंपाकघरातील कामात नवनवीन प्रयोग करण्याची इच्छा होईल. पाककलेच्या आवडीच्या महिला व पुरूष वर्गाला आपल्या पाककलेने सर्वांना खूष करता येईल. लहान भावंडाकडून प्रेमाचा निरोप येईल तरी उगाच आढेवेढे घेऊ नका.
कर्क :–मनातील इच्छेची पूर्तता करताना काही अडचणी निर्माण होतील पण त्यावरही तीव्र इच्छा शक्तीने मात कराल. वयस्कर मंडळीना अचानक काचबिंदूचा त्रास जाणवेल तरी वेळीच उपाय करावा लागेल. महिलांनी आपली खाजगीतील पैसे ठेवण्याची जागा इतरांना जाहीर करू नये. शत्रू व मित्र दोन्ही पक्षांचा डोळा त्यावर राहणार आहे.आवश्यक असेल तर हाँस्पिटलमधे अँडमिट व्हावे लागेल त्यात टाळाटाळ करू नका.
सिंह :–सप्ताहाच्या उत्तरार्धात महत्वाच्या कामाला तुमच्या कडून खरी सुरूवात होईल. नवीन आवडत्या वस्तूंची खरेदी करताना वस्तूची प्रत तपासून न पाहता मोहात पडून वस्तू खरेदी करण्याचा संभव आहे. घाई करू नका. पूर्वी ज्या घरासाठी जीव टाकत होता त्याच प्रकारच्या नवीन घराची संधी पुन: चालून येईल तरी विचार करायला हरकत नाही. महिलांच्या सौंदर्यदृष्टीवर सर्वांकडून कौतुक होईल. पूर्वी केलेल्या श्रमाचे, कष्टाचे पैसे लवकरच मिळणार असल्याचा निरोप येईल.
कन्या :–लहान भावंडाच्या सासुरवाडीकडून तुम्हाला एखादी महत्वाची सुंदरशी भेट मिळेल. दैनंदिन काबाडकष्ट करणार्याना सरकारी योजनेतून किंवा एखाद्या संस्थेकडून आर्थिक मदत मिळेल. महिलांना अध्यात्मिक क्षेत्राविषयीचे मिळालेले ज्ञान पडताळून पाहण्याची योग्य संधी मिळेल. कोर्टकेसच्या प्रकरणात सध्या तुम्ही गप्प बसलेले बरे राहील. पाय पोटर्या दुखण्याचे प्रमाण अचानक वाढेल. औषधाच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका.
तूळ :–आईच्या आवडत्या गोष्टी, महागातील वस्तू आईला भेट द्याल. सरकारी खात्यातील उच्च पदाधिकार्यानी आपला अधिकाराचा वापर करताना कांही वेळा विचारकरावा. राजकीय व्यवहारात आलेल्या अडचणींवर या सप्ताहात तुम्हाला काहीही उपाय सापडणार नाही. खूपच जवळ असलेल्या व्यक्तीला किंवा मित्रमैत्रिणींच्या अडचणीसाठी मदत करावी लागेल. नुसत्या सल्ल्याने काम होणार नाही. आर्थिक मदत करावी लागेल.
वृश्र्चिक :–प्रसिद्धीच्या झोतात असलेल्यांनी आपले कोणतेही काम अती गाजावाजा करून करू नये. लहान मुलांच्या हातातील वस्तूंकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल, तोंडात लागण्याचा धोका आहे. एकांतवासात राहिलेल्यांनी आपल्या मनावरील दडपण कमी करण्यासाठी आवडत्या व्यक्तींच्या सहवासात रहावे चांगला फरक पडेल. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून कोणताही आर्थिक व्यवहार करू नका.
धनु :–धार्मिक स्थळाच्या किंवा एखाद्या देवळाच्या समितीवर असाल तर लोकांच्या टिकेला सहन करावे लागणार आहे हे लक्षांत ठेवा. धार्मिक ग्रंथांचे वाचन करणार्यांना सामान्य जनांसाठी उपदेशाचे किंवा मार्गदर्शनाचे बोल सांगता येणार आहेत. भावंडांच्या हस्तक्षेपाने जुन्या बिघडलेल्या परिस्थितीवर तुम्हाला उपाय करता येईल. सौंदर्यप्रसाधनाच्या घरगुती व्यवसायात नवीन तंत्रे वापरून व्यवसाय वाढवण्याचा विचार कराल.
मकर :–कोणतेही धर्मबाह्य वर्तन किंवा बोलणे टाळावे लागेल. मनातील बंड करणार्या प्रवृत्तीला स्वत:च समजावून सांगावे लागेल. औषधी कंपनीतील किंवा क्षेत्रातील कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टस्ला सामोरे जावे लागेल. पण याच सप्ताहात आर्थिक गणितेही मोकळी होतील व सुटू लागतील. महिलांना आपल्या आवडत्या छंदाबाबतचा अभ्यास करण्याची जुनी इच्छा पूर्ण करता येणार असल्याचे चित्र दिसेल. नोकरी सोडण्याचा विचार तूर्तास नको.
कुंभ :–संततीच्या मदतीने संगणकावर करावयाची कामे या सप्ताहात वेग घेतील. वयस्कर मंडळीनी नोकरीतील कोणत्याही कामाचे प्रेशर घेऊ नये. तरूण संततीच्या मनातील गोष्टींचा आज जराही तुम्हाला थांगपत्ता लागणार नाही. व्यसनाच्या बाबतीत वयस्कर मंडळीनी नियंत्रण ठेवावे व इतरांच्या सल्ल्यानेच वागावे. स्वत:चा हेका चालवू नये. तरूणांना मित्रांचा आग्रह अडचणीत आणेल.
मीन :–या सप्ताहात तुमच्या आवडीच्या विषयावर बोलण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला मिळणार आहे. वैचारिक क्षेत्रातील वक्त्यांना एखाद्या वेबिनार मधील आपला सहभाग स्पेशल इफेक्ट्स देईल. बुद्धिच्या जोरावर आपले म्हणणे तुम्हाला इतरांच्या गळी उतरवणे सोपे जाणार आहे. नोकरीतील कामाच्या ताणतणावाला अती महत्व देऊ नका. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात मुलांच्या मताला महत्व द्यावे लागेल.
||शुभं-भवतु ||