daily horoscope

शनिवार 18 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 18 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार  18 डिसेंबर चंद्ररास वृषभ 27:20 पर्यंत व नंतर मिथुन.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

चंद्रनक्षत्र रोहिणी 13:47 पर्यंत व नंतर मृगशीर्ष. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

श्री दत्तजयंती  चा दिवस असल्याने दत्तउपासकांनी  श्री दत्त महाराजांची उपासना करावी

 

मेष :–मनावर संयमाचा अंकुश ठेवावा लागेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी कोणावरही विसंबून राहू नये. वयस्कर मंडळीना सांधेदुखीचा त्रास वाढल्याचे जाणवेल.

 

वृषभ :–घटनेचा परामर्ष घेऊन नंतरच आपले मत व्यक्त करा. खोट्या प्रतिष्ठेला बळी पडाल. कोणाविषयी  अचानक आपले मत व्यक्त करू नका.

 

मिथुन :– आपण भले व आपले काम भले याचा  वस्तुस्थितीतीून धडा मिळेल. महिलांनी कोणाच्याही व्यवहारात नाक खुपसू नये.

 

कर्क :–मधुमेहींच्या पायाचे दुखणे मर्यादेपेक्षा वाढल्यामुळे कांही प्लँन  रद्ध करावे लागतील. कोणाबरोबर कसे संबंध ठेवावेत याचे भान ठेवा.

 

सिंह :–आज नकारात्मक विचारांना अजिबात थारा देऊ नका. घरातील नात्यात आनंदाचे वातावरण   राहील व जुना दुरावा कमी होईल.

 

कन्या :–स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवूनच आज कामाला लागा. व्यवसायाच्या विकासासाठी एखादी योजना राबवण्याचे ठरवाल. पायातील जबाबदारीची जाणीव ठेवा.

 

तूळ :– सर्वकाही आलबेल असल्याची खात्री पालकांना द्यावी लागेल. तुमच्या मनातील आनंदाच्या गोष्टी तुम्हाला इतरांना कधी सांगतो याची घाई होईल.

 

वृश्र्चिक :–आपल्या सध्याच्या कार्यक्षेत्रात सहकार्‍यांची जराही मदत न घेता पुढे जाऊन दाखवाल. वयस्कर मंडळीनी आपली तब्बेत चा, गली असल्याचा सकारात्मक विचार करावा.

 

धनु :– व्यवसायातील क्लीष्ट गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागेल. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात जराही घाईगडबड  करू नये. शांततेने घ्यावे.

 

मकर :–आपल्या कार्यक्षेत्रातील मंडळींसाठी  झपाटून काम कराल व अखेर तेवढेच दमालही. ज्येष्ठांना दिलेला शब्द पाळला. कशाचाही अतिरेक करू नका.

 

कुंभ :–वडीलधार्या  वक्तीच्या जबाबदारीतून  सहजपणे व आनंदाने पार पाडाल.  कुटुंबातील गैरसमजाचे वातावरण निवळले जाईल.

 

मीन :–कोणतीही गोष्ट फार न ताणता  सहजपणे त्याचा स्विकार करा.  शांत वृत्तीने विचार केल्यास तुमच्या वागणुकीमुळे  कुटुंबातील आनंद  द्विगुणित होईल.

 

||शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *