Read in
शुक्रवार 17 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 17 डिसेंबर चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 10:39 पर्यंत व नंतर रोहिणी.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–नोकरदार अधिकारी वर्गाकडून महत्वाच्या बाबतीत निश्चित दिशेने मार्गक्रमण करतील. उत्तम आकलन शक्ती असलेल्यांना आपल्या बुद्धिचा चांगला उपयोग करता येणार आहे.
वृषभ :– एकलकोंडेपणाची सवय असलेल्याना आजचा दिवस अतिशय मानसिक त्रासाचा जाणार आहे. सुवासिक अत्तराच्या उद्योगातून चांगली प्राप्ती होईल.
मिथुन :–चामड्याच्या वस्तूंच्या उद्योगातून एखादे प्रदर्शन भरवण्याची कल्पना ठरवाल. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत व्यवसायाचा विचार कराल.
कर्क :–भंगाराच्या वस्तूतून टिकाऊ वस्तू बनवण्याचे ठरवाल. आरोग्याच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याचा त्रास सोसावा लागेल.
सिंह :–चिकाटी व दूरदर्शीपणामुळे तुमच्या नियोजनानुसार कामात यश येईल. इतरांवर विश्वास ठेवून कोणताही पैशाचा व्यवहार करू नका.
कन्या :–बँकेतील तुमचे कर्जप्रकरण शेवटच्या टप्प्यावरच अडकेल तरी तुमचे प्रयत्न आवश्यक आहेत. अतिचिकीत्सकपणाने हातातील सुखही वाया जाईल.
तूळ :–आज तुमची मानसिक वृत्ती कोणतेही धाडस करण्यास प्रवृत्त करेल. सततच्या श्रम करण्यामुळे प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल.
वृश्र्चिक :–आज उगाचच आपली आक्रमकता दाखवण्याची इच्छा वाढेल. पैसे वाढवण्याच्या विचाराने अति काटकसरीच्या आहारी जाल.
धनु :– दुसर्यांसाठी स्वत:चे नुकसान करून घ्याल. इतरांवर व तुमच्यावर अवलंबून असलेल्यांवर आज अधिकार गाजवण्याची तीव्र इच्छा होईल.
मकर :–तुमच्या सेवाभावी वृत्तीमुळे आज तुमचे कष्ट अफाट वाढणार आहेत. अनितीने वागणारे आज तुमच्या तावडीत सापडतील पण तुम्ही दुर्लक्ष करावे हेच चांगले.
कुंभ :–इतरांना वाटत सुटण्याच्या गुणांमुळे तुम्ही स्वत:चेच नुकसान करून घ्याल. नोकरीच्या ठिकाणी करारीपणाने वागून इतरांवर जरब बसवाल.
मीन :–निर्णयातील व्यवहारी पणा दैनंदिन जीवनात आणण्याचा प्रयत्न करा. जराशी नम्रता दाखवली तर नक्की नुकसानी पासून वाचाल.
||शुभं-भवतु ||