Read in
गुरूवार 16 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 16 डिसेंबर चंद्ररास मेष 14:19 पर्यंत व नंतर वृषभ.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
चंद्रनक्षत्र भरणी 07:34 पर्यंत व नंतर कृतिका. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज प्रदोष असल्याने शिव उपासकांनी उपवास व उपासना दोन्ही करावे.
मेष :– सामाजिक कार्यासाठी कमी पडणारी मोठी रक्कम तुम्ही आपल्या स्वत:च्या बचतीतून द्याल. आईला सामाजिक स्तरावर मान सन्मान मिळेल.
वृषभ :–आज तुम्हाला मनमोकळ्या गप्पा मारता येणार आहेत त्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. नोकरीत सहकारी वर्गावर अचानक अधिकार गाजवण्याची इच्छा होईल.
मिथुन :–मित्रमंडळींच्या मदतीने हातातील प्रोजेक्टमधे आवश्यक तो टप्पा गाठता येईल. सरकारी नोकरदारांना हुकुमशाही प्रवृत्ती समोर झुकावे लागेल.
कर्क :–आपमतलबी व्यक्तीपासून सावध रहा. गर्भवती महिलांनी कोणतेही कष्ट करू नका. महत्वाचा प्रश्न विवेकबुद्धीने हाताळावी लागेल.
सिंह :–इतरांच्या वादात कोणत्याही प्रकारे सहभाग घेऊ नका. न्यायालयातील कामकाजात तुमच्या बोलण्यामुळे कामकाजात बिघाड निर्माण होईल.
कन्या :–घडलेल्या व घडणार्या सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात हे लक्षात घ्या. शांत वृत्तीने विचार केल्यास मानसिक व शारिरीक त्रासही कमी होईल.
तूळ :–आरोग्याबाबत जागरूक रहावे लागेल. स्वभावातील हिशोबीपणामुळे मानसिक त्रास होईल. आज कष्टाची मर्यादा वाढणार आहे.
वृश्र्चिक :– तुमच्या कणखर वृत्तीने प्रतिस्पर्ध्यांना पुढे सरकू दोणार नाही. अतिदक्ष प्रवृत्तीचे मित्रमंडळींकडून हसे होईल.
धनु :–विद्यार्थ्यांनी घडलेल्या प्रसंगातून धडा घेतल्यास पुढील अडचणी उद्भवणार नाही. आपली क्षमता व मर्यादा ओळखून कामाची जबाबदारी स्विकारा.
मकर :–प्रवासातील नव्याने झालेली ओळख तुमच्या क्षेत्रातील कामाच्या पद्धतीबद्दल उपयोगी पडेल. सत्संगाची अनुभव येऊन मनाची प्रसंन्नता वाढेल.
कुंभ :– सतर्कतेमुळे फार मोठ्या संकटातून वाचाल. राजकीय मंडळीनी गुप्तशत्रूं पासून सावध राहणे अतिशय महत्वाचे राहील. अनोळखी व्यक्तींवर विसंबून राहू नका.
मीन :–तुमच्या हट्टीपणा व लहरीपणावर कंट्रोल केल्यास पश्चात्तापाची वेळ येणार नाही. घरातील अलिशान वस्तूंसाठी मर्यादेपेक्षा जास्त खर्च कराल.
||शुभं-भवतु ||