Read in
बुधवार 15 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 15 डिसेंबर चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र भरणी अहोरात्र.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– आज तुमच्या मनात सुरू असलेल्या विचारांने जबरदस्त प्रफुल्लित व्हाल. जेवणाच्या वेळा न पाळल्याने त्रास होणार आहे. मौजमजेकरीता विचार न करता खर्च कराल.
वृषभ :– तुमच्या चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीचा अनुभव येईल. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांनी डाँक्टरांच्या सल्ल्याचा विचार करूनच आपले निर्णय घ्यावेत.
मिथुन :–राजकीय मंडळीना आत्मबचावाचे धोरण स्विकारावे लागेल. आज तुमचा सडेतोड वृत्तीच्या व्यक्तींबरोबर संबंध येईल व त्यामुळे मानसिक त्रास होईल.
कर्क :–आज तुम्ही परिस्थितीशी जुळवून घेण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबियांबरोबर अतिशय प्रेमळ संवाद होईल. तरूण वर्ग आज मानसिक कल्पनेने प्रेमात रममाण होतील.
सिंह :–तुमच्यातील नेतृत्व वृत्ती आज उफाळून येईल. तरूणांच्या मनात विचारांची स्थिरता येणे आवश्यक आहे. निर्णयाच्या वेळी सारासार विचार करूनच निर्णय घ्या.
कन्या :–पाठदुखीच्या दुखण्याने हैराण व्हाल. दवाखान्यात काम करणार्या नोकरदार व्यक्तींना पेशंटच्या प्रती प्रेमाचा उमाळा येईल व जिव्हाळा वाढेल.
तूळ :–आज तरूण तरूणींच्या वेंधळेपणात अचानक वाढ होईल. राजकीय मंडळी आपल्या साध्या बोलण्यातून मतलब साधून घेतील. बालसंगोपन करणार्या संस्थेस अचानक चांगली देणगी मिळेल.
वृश्र्चिक :–बोलण्यातील हुषारीने कार्यभाग साधून घ्याल. तोलून मापून राहण्याच्या दृष्टीकोनात अचानक बदल होत असल्याचे जाणवेल. न्यायनिवाडा करताना योग्य बाजू उचलून धराल.
धनु :–महत्वाकांक्षी योजना राबवताना तुम्हाला स्वत:च्या विचारांना मूरड घालावी लागेल. प्रशासनात कुशल असलेल्यांना लवकरच नवीन नोकरीची संधी मिळेल.
मकर :–विनाकारण कष्ट करण्याच्या प्रवृत्तीमुळे दुसर्याचे काम अंगावर घ्याल. कोणत्याही अवघड कामाचीही भिती राहणार नाही. काटकसरीपणाची मर्यादा फार कराल.
कुंभ :–व्यवसायाची आवड असलेल्यांना आज अचानक व्यवसायिक गोष्टींची माहिती घेण्याची इच्छा होईल. थंडीतापाचा त्रास होण्याची शक्यता जास्त आहे.
मीन :–इलेक्ट्रानिक्स वस्तू आज अचानक बिघडल्यामुळे फजिती होईल. गाणारे, वाद्य वाचवणारे यांना मोठ्या कार्यक्रमाची संधी चालून येईल. वयस्कर मंडळींच्या पायाचे दुखणे वाढेल.
||शुभं-भवतु ||