daily horoscope

मंगळवार 14 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 14 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 14 डिसेंबर चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी  28:39 पर्यंत व नंतर भरणी.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

मंगळवार 14 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज  मोक्षदा एकादशी, गीता जयंती आहे.

मेष :–आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे. नातेवाईकांविषयी मनामध्ये असलेले  समज गैरसमज अचानक दूर होतील  व भेटण्याची ओढ वाटेल.

 

वृषभ :–इतरांच्या  अडचणीसाठी आज तुम्हाला  आर्थिक मदत करावी लागेल. व्यवसायातील वृद्धी साठी नव्याने गुंतवणूक करण्याची गरज निर्माण होईल.

 

मिथुन :– आई व मुलांमधील प्रेमाचा अनुभव इतर नातेवाईकांना खूपच ह्रदयस्पर्शी येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी आपल्यावर असलेल्या विश्र्वासाला तडा जाणार नाही याची दखल घ्यावी.

 

कर्क :–नोकरीच्या  ठिकाणी तुमच्या अधिकारातील बाबींवर जास्त लक्ष द्यावे लागेल. पोलीस  खात्यातील अधिकार्यांना गुन्हेगारांकडून चकवा देणार्‍या गोष्टी घडतील.

 

सिंह :–मागिल येणे बाकी असलेल्या कामाचे येणे वसूल होऊ लागेल. नोकरीतीलही मागिल बिले मंजूर होतील. पतीपत्नी  दोघांच्या विचारात महत्वाच्या कामाबाबत एकविचार होईल.

 

कन्या:–हँस्पिटलमधे अँडमिट असलेल्यांना आज प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे घरी सोडण्यात येईल. लेखक व कलाकाराना  त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल  त्यांचे कौतुक होईल.

 

तूळ :–संशोधक मंडळीना   प्रत्येक घटनेमागची शास्त्रीय कारणे  शोधण्याची  ओढ लागेल. कुटुंबातून दूर गेलेल्या  व्यक्तीस  पुन: घराची  ओढ लागेल.

 

वृश्र्चिक :–आयुर्वेदीक डाँक्टरना त्यांच्या अभ्यासाबद्दल सन्मान केला जाईल. त्वचारोगाचा त्रास असलेल्यांना अचानक रोगाचा प्रभाव वाढल्याचे जाणवेल.

 

धनु :–कोणतेही कारण नसूनही तुम्हाला नोकरीविषयी अनास्था निर्माण होऊन  नोकरी सोडाविशी वाटेल. व्यवसायातील भागिदाराकडून दिलेला शब्द पाळला जाणार नाही.

 

मकर :–प्रेमाच्या व्यवहारात तिसर्‍याच्या हस्तक्षेपामुळे  नात्यात बिघाड निर्माण होईल. गर्भवती स्त्रियांना  अतिशय धोक्याचा दिवस. आज  आराम करावा, दगदग करू नये.

 

कुंभ :–कोणत्याही गोष्टीचा  उपभोग घेताना त्याचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या. राजकीय मंडळीनी आपल्या ताकदीचा विचार करूनच आश्वासन द्यावे.

 

मीन :–विश्वसनीय   व्यक्तीशिवाय  अचानक कोणालाही  जामिन राहू नका. संततीच्या करारीपणाचा आज अनुभव येईल. विश्रांतीची आवश्यकता आहे.

 

||शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *