Read in
सोमवार 13 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 13 डिसेंबर चंद्ररास मीन 26:04 पर्यंत व नंतर मेष.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
चंद्र नक्षत्र रेवती 26:04 पर्यंत व नंतर अश्र्विनी.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–संततीकडून होणार्या कार्याचा, कर्तृत्वाचा सत्कार करणार असल्याचे निरोप येतील. जूनी मालमत्ता विकण्याच्या विचारावर फेरविचाराची गरज आहे. कोणत्याही कारणाव्यतिरिक्त अचानक पैसे खर्च करावे लागतील.
वृषभ :–हरवलेल्या वस्तूची माहिती मिळाल्यामुळे दिलासा मिळेल. जवळच्या व्यक्तींकडून तुमच्या हातातील कामाला सपोर्ट मिळेल. न्यायालयातील केसबाबत महत्वाच्या टीप्स मिळतील.
मिथुन :–निद्रानाशाचा त्रास असलेल्यांना डाँक्टरांच्या उपायाबरोबरच मेडीटेशनचा उपाय लागू पडेल. आज खर्च होणार्या पैशातून भरपूर आनंद व समाधान मिळेल.
कर्क :–अचानक नोकरीतील कामाविषयी अनासक्ती निर्माण होऊन मानसिक अस्वस्थता वाटेल. सहकार्याची मदत घ्या व आवडत्या छंदाला वेळ दिल्यास हा स्ट्रेस कमी होईल.
सिंह :–वेदनादायी जुन्या आजाराचा पुन: त्रास होणार आहे. तरी काळजी घ्यावी लागेल. गर्भवती महिलांनी आजचा दिवस आराम करावा विशेष दगदग करू नये.
कन्या :–परदेशी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या रखडलेल्या शिक्षणाच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळेल व पुन: सुरू करता येणार असल्याचे कळेल. पतीपत्नीमधील मतभेद दूर करण्यासाठी आवडत्या व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यावे.
तूळ :–सध्याच्या दिवसात पसरलेल्या रोगराईपासून अतिशय सावघ रहा. घर किंवा शेती मधील भाडेकरू तुम्हाला दाद देणार नाहीत तरी नियमांचा वापर करावा लागेल.
वृश्र्चिक :–वैवाहिक जीवनातील अडचणींवर योग्य मार्ग शोधण्याच्या प्रयत्नाला यश येईल. पुनर्विवाहाची इच्छा असलेल्यांना नातेवाईकांकडून आवश्यक ती मदत मिळेल .
धनु :–द्वितीय संततीकडून अत्युच्च आनंद देणार्या बातम्या कळतील. भागिदारीच्या व्यवसायातील व्यावहारिक गैरसमजामुळे भागीदारी अचानक संपुष्टात येण्याचे धोके निर्माण होतील.
मकर :–तरूणांना घराविषयीची ओढ कमी होईल. ज्यांनी आपले राहते घर किंवा शेत विकायला काढले आहे त्याना गिर्हाइकाकडून प्रतिसाद चांगला मिळत असल्याचे जाणवेल.
कुंभ :–शाळकरी मुलांची बरेच दिवसापासूनची खरेदीची इच्छा आईवडिलांकडून पूर्ण केली जाणार आहे. प्रवासी वाहतूक संस्थेत काम करणार्यांना सरकारी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
मीन :–कुटुंबाच्या सुखासाठी अचानक मोठा खर्च करावा लागेल. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे सर्दी पडसे तसेच व्हायरल फिव्हरचा त्रास संभवतो. पैसे ठेवण्याच्या जागेची बारकाईने काळजी घ्या.
||शुभं-भवतु ||