daily horoscope

शनिवार 11 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 11 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 11 डिसेंबर चंद्ररास कुंभ  16:15 पर्यंत व नंतर मीन.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 22:30 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज दुर्गाष्टमी आहे.

मेष :– हातात घेतलेल्या नवीन कामामधे कुटुंबातील सर्वांचीच मदत मिळेल. विद्यार्थ्यांना  आपल्या अभ्यासक्रमातील   अवघड वाटणार्‍या विषयांकरीता  तज्ञ  मार्गदर्शनाची  सोय होईल.

 

वृषभ :–सामाजिक कार्यातील महिलांनी हातात घेतलेले नवनवीन उपक्रम  खूपच प्रसिद्धि मिळवून देतील. तुमच्यातील उत्तम कार्यशक्तीची  इतरांना जाणिव होईल.

 

मिथुन :–सततच्या कामाने व धावपळीने आज तुम्हाला आराम करावासा वाटणार आहे. नोकरीतही कामाचा व्याप सांभाळताना  मानसिक ताण येईल.

 

कर्क :–कुटुंबाकरीता अचानक मोठा खर्च करावा लागणार आहे.  परदेशी असलेल्या  मुलांबरोबरच्या  चर्चेतून   दिवसभराचा आनंद मिळणार आहे.

 

सिंह :–लहान मुलांकडून त्यांच्या साठवलेल्या पैशातून   आईवडिलांकरीता प्रेमाची भेट आणली जाईल. सरकारी कामाच्या जबाबदारीतून मुक्त होत असल्याचे जाणवेल.

 

कन्या :–कुटुंबातील कोणताच वाद विकोपाला जाणार नाही याची दखल घ्या. खुल्या मनाने इतरांची मदत घेतल्यास  आनंदाचे वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नांना यश येईल.

 

तूळ :–कांही नकारात्मक कामे तुमच्या हातून होतील तरी आज अतिशय विचारानेच कामे करावी लागतील. मित्रमंडळीमधील गैरसमज दूर झाल्यामुळे प्रगतीच्या नवीन वाटा सापडतील.

 

वृश्र्चिक :–प्रकृतीबाबतच्या अती चिकीत्सेने आपण आजारी असल्याचा भास होईल. मनातील शंका कुशंका काढून टाका व  कामाला, उद्योगाला सिद्ध व्हा.

 

धनु :–योग्य वेळी केलेल्या नियोजनामुळे आज तुम्ही बाजी जिंकणार आहात. पुरूष मंडळीना पत्नीकडील नात्यातून कौतुकाचे शब्द ऐकवले जातील  व वाहवा होईल.

 

मकर :–नव्याने झालेल्या ओळखीतून  आर्थिक फ सगत होण्याची शक्कता आहे. गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरीतील प्रत्येक निर्णय शांततेने  स्विकारा.

 

कुंभ :–मित्रपरिवाराबरोबर चैनीच्या प्रवाहात नुकसान करून घ्याल. आज या राशीच्या मुलांवर त्यांच्या भल्यासाठी आईवडिलांना लक्ष ठेवावे लागेल.

 

मीन :–कोणतीही चर्चा करताना दुसर्याच्या मतांचाही स्विकार करा. सरकारी नोकरीतील मंडळीना स्वत:च्या कामाबरोबरच इतर दुसर्या जबाबदार्या टाकल्या जातील.

 

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *