Read in
शुक्रवार 10 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 10 डिसेंबर चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 21:47 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–कुटुंबातील महत्वाची जबाबदारी अतिशय उत्तम रितीने पार पाडाल. विद्यार्थ्यांना मनातील इच्छेप्रमाणे शिक्षणाची संधी उपलब्ध होईल पण त्यासाठी मनाने प्रयत्न न करता तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल.
वृषभ :–जागेच्या व्यवहाराविषयी कोणताही शब्द देऊ नये. पूर्ण चौकशी करावी. धार्मिक व सकारात्मक व्यक्ती सहवासात येथील. मुलांकडून नकळतपणे आर्थिक नुकसान होणार आहे.
मिथुन :–मनात आले म्हणून अचानक खरेदीसाठी बाहेर पडू नका. आजचा दिवस तुमचे नुकसान करणारा आहे. आज सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
कर्क :–आज विचारपूर्वक घेतलेला निर्णय फायदेशीर असल्याचे मुलांना पटेल. नोकरीतील वादग्रस्त प्रकरणे हाताळताना तुम्हाला अतिशय कौशल्याने हाताळावी लागतील.
सिंह :—लेखक, साहित्यिकांना आपल्या साहित्याबाबत बोलण्याची संधी मिळेल. विद्यार्थी त्यांच्या आवडत्या विषयाची माहिती व लाोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
कन्या :–कुटुंबातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. वैवाहिक जीवनात पदार्पण करणार्याना आजचा दिवस आनंद व समाधानाचा राहणार आहे.
तूळ :–मुलांच्या प्रगतीसाठी काय करावे लागेल याचा आज तुम्हाला चांगला अंदाज येईल. आपल्यावर असलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी महिलां प्रचंड मेहनत घेतील.
वृश्र्चिक :–नोकरीतील तुमच्या हार्ड वर्कमुळे वरिष्ठांबरोबरचे संबंध वृद्धींगत होतील. स्वतंत्र व्यावसायिकांना आजचा दिवस लाभदायक असल्याने त्यांनी आपल्या व्यवसायात नवनवीन योजनांचा विचार करावा.
धनु :–कुटुंबातून एकमोकांना मदत मिळणार्या विषयावर सकारात्मक चर्चा होतील. तरूणांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केल्यास प्रकृतीतील बिघाड लवकर दुरूस्त होईल.
मकर :–विवाहेच्छूना परिचयातून विवाहाबाबतचा विचार करण्याची संधी मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून आज परतावा घेण्याचा प्रयत्न केल्यास चांगला लाभ होईल.
कुंभ :–प्रकृतीबाबत आज विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. वयस्कर मंडळीनी पायांच्या जखमांकडे जराही दुर्लक्ष करू नये. कुटुंबातील सर्वानीच सहविचाराने निर्णय घ्यावा.
मीन :–मित्राच्या कुटुंबाकरीता मोठी आर्थिक मदत करावी लागेल. नोकरीतील अडकलेल्या सरकारी कामाची जबाबदारी स्विकारावी लागेल. कुटुंबातील वयस्कर मंडळीना आनंद देणार्या तुमच्याकडून घटना घडतील.
||शुभं-भवतु ||