Read in
गुरूवार 09 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 09 डिसेंबर चंद्ररास मकर 10:09 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र धनिष्ठा 21:50 पर्यंत व नंतर शततारका.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय ६.
आच चंपाषष्ठी असून स्कंदषष्ठी आहे.
श्री मल्हारी मार्तंड भैरवोत्थापनआहे.
मेष :–तुमच्या हातून होत असलेल्या कामाचा व कार्याचा आज इतरांकडून गौरव केला जाईल. मनातील दु:खद व नैराश्याची भावना कुठच्या कुठे निघून जाईल.
वृषभ :–रखडलेल्या सरकारी कामातील गुंता सोडवण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची धावपळ सुरू होईल. मानसिक स्वास्थ्यासाठीच्या धडपडीत इतर विवंचना वाढतील.
मिथुन :– नोकरीच्या कामातून लहानशा व्यवसाय करण्याची संधी चालून येईल आईवडिलांच्या कृपेने मनाची शक्ती वाढेल व अडचणीतून बाहेर पडण्याचे बळ मिळेल.
कर्क :–स्वत:चा हेका चालवताना मित्रांबरोबर होणारा वाद अचानक वाढत जाईल. स्वत:साठी नाही पण कुटुंबातील सदस्यांच्या आनंदासाठी मन मारावे लागेल.
सिंह :–आज प्रत्येक व्यवहारात दक्ष राहीलात तर नुकसान नक्कीच टळेल पण जरासे दुर्लक्षही मोठ्या नुकसानास कारणीभूत ठरेल. महिलांना कामाचा कंटाळा येईल.
कन्या :–कुटुंबातील देण्या – घेण्याच्या व्यवहारात अचानक कटुता येईल. आर्थिक व्यवहार सुद्धा अनिच्छेनेच कराल. आज कोणतीच जबाबदारी तुमच्याकडे घेऊ नका.
तूळ :–व्यवसायातील आर्थिक उलाढालींकडे काटेकोरपणे लक्ष द्या इतरांवर विसंबून राहू नका. संततीच्या करारीपणाचा व धाडसाचा अनुभव येईल. नैसर्गिक दुर्घटना टाळण्यासाठी आज कोणताच प्रवास करू नका.
वृश्र्चिक :–अचानक आज खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक नियोजनाची गरज भासेल. व्यवसायातील भागिदाराचे उत्पन्न वाढणार आहे. रागावर व स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल.
धनु :–कुटुंबाच्या व संततीच्या मौजमजेसाठी अचानक हात सैल सोडाल व खर्चाला मागेपुढे बघणार नाही. नोकरी व्यवसायात अचानक चांगली संधी येईल पूर्ण विचाराने वसल्ल्येच निर्णय घ्या.
मकर :–राहता घराची सजावट करण्यासाठी पूर्वी ठरवलेला जंगी बेत आज फायनल कराल. कोणत्या बँकेचे कर्जप्रकरण सहजपणे मंजूर होणार आहे जरासाच प्रयत्न करावा लागेल.
कुंभ :–शैक्षणिक क्षेत्रातील मंडळीना प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पदावर नेमणूक केली जाणार असल्याचे कळेल. राहत्या गावातील सामाजिक कार्यातील तुमचा सहभाग उल्लेखनीय व मोलाचा ठरेल.
मीन :–व्यवसायातील भागिदारांबरोबर अचानक नाराजी निर्माण होईल. संस्थेतील नवीन उपक्रमाबाबतची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाणार आहे तरी हसतमुखाने स्विकारावी लागेल.
||शुभं-भवतु ||