daily horoscope

बुधवार 08 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 08 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 08 डिसेंबर चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र श्रवण 22:39 पर्यंत व नंतर धनिष्ठा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

नागपूजन, नागदिवे

मेष :–नोकरीच्या ठिकाणी तुमच्या हाताखालील लोकांकडून जराही हुकमत न गाजवता काम करून घेता येणार आहे. मुलांकरता व नातवंडांकरीता आजचा दिवस  नकळत कारणी लागेल.

 

वृषभ :–पतीपत्नीच्या भागिदारीच्या व्यवसायात नव्याने गुंतवणूकीची गरज भासेल. विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळून अचानक  करीयर साठी योग्य मार्ग सापडेल.

 

मिथुन :–नवीन घर घेण्याच्या विचारांना पुन: आज मोडते घातले जाईल. नोकरीतील कामाचा ताण वाढल्यामुळे  कामाविषयी अनास्था निर्माण होईल.

 

कर्क :–कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घेताना उगीचच भावूक व्हाल. आईच्या माहेरकडील मंडळींच्या इच्छेखातर   तुम्हाला  आपल्या  विचारांना मुरड घालावी लागेल.

 

सिंह :–कलाकारांना  आपला जम बसवण्यासाठी   बर्‍याच तडजोडी  कराव्या लागतील. नात्यातील पुरूष व्यक्तीमुळे तुमचे बर्याच दिवसापासून अडकलेले काम मार्गी लागेल.

 

कन्या :–महिलांना  आवराआवर करताना सापडलेल्या जुन्या वस्तूंचा मोह आवरणार नाही. कुटुंबात अचानक लांबच्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे.  

 

तूळ :–सामाजिक  कार्यात काम करत असलेल्यांचा सन्मान केला जाईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी मनाला त्रासदायक ठरेल.

 

वृश्र्चिक :–लहान मुलांना आजचा दिवस कांही प्रमाणात पडण्या धडपडण्याचा असणार आहे. आज कोणत्याही कारणासाठी लहान मुलांना बरोबर घेऊन प्रवास करू नका.

 

धनु :–धार्मिक कार्याच्या आयोजनाची तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाणार आहे. नोकरीत वादग्रस्त प्रकरणे हाताळताना तुमच्याच कौशल्याचा कस लागेल.

 

मकर :–पूर्वीची राहिलेली येणी आजपासूनच येऊ लागतील. कुटुंबातील वातावरण अतिशय आनंदी व प्रसन्न राहणार आहे. संगीत क्षेत्रातील कलाकारांना नवीन संधी प्राप्त होतील.

 

कुंभ :–महत्वाची कामे मार्गस्थ करताना घाई करू नका. कुटुंबातील वादावर तात्पुरता  पडलेला  पडदा इतरांच्या सल्ल्याने लवकरच दान चार दिवसात  उसळी मारून त्रास देणार आहे.

 

मीन :–कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. राजकीयदृष्टय़ा आज तुमच्या मदतीला तुमचे पाठीराखे खंबीरपणे उभे राहतील. जवळच्या व्यक्तीकडून अनपेक्षित पणे मोठी महत्वाची मदत मिळेल.

 

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *