daily horoscope

मंगळवार 07 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 07 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 07 डिसेंबर चंद्ररास धनु 07:43 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 24:11 पर्यंत व नंतर श्रवण.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज विनायक चतुर्थी अंगारक योग आहे. तरी श्री गणेशाची उपासना करावी.

मेष :–सार्वजनिक क्षेत्रात काम करताना अतिशय विचारपूर्वक करावे. तुमच्या चांगल्या स कामाला प्रसिद्धि मिळेल व चुकांवर मोठ्या चर्चा होतील.

 

वृषभ:– अचानक आर्थिक उलाढाली कराव्या लागतील. मनातील अनुत्तरीत प्रश्न विचारानेच सोडवावे लागतील त्यात कोणाचाही सल्ला उपयोगी पडणार नाही.

 

मिथुन. :–प्रथम संततीच्या प्रगतीच्या चर्चेमुळे मनाला आनंद निर्माण होईल. व्यवसायाच्या ज्या परवानग्यांची वाट पहात होता त्याबाबतच्या अडचणी दूर होत असल्याचे जाणवेल.

 

कर्क :–विचारवंतांना आपले मौलीक विचार इतरांपर्यंत पोचवण्यासाठी व्यासपीठ मिळेल. सल्लागार मंडळींची इतरांकडून वाहवा होईल व प्रसिद्धही मिळेल.

 

सिंह :–कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. परदेशी असलेल्या मुलांबरोबर आज मनाला समाधान होईपर्यंत गप्पाटप्पा होतील.

 

कन्या :–हातीतील पैशाबाबत इतरांकडून आज तुमच्याकडे मागणी केली जाणार आहे.  दूरच्या नातेवाईकांची दु:खद बातमी ऐकून मानसिक क्त्रास होईल.

 

तूळ :–सरकारी काम कोठे अडकले आहे याबाबत अनोळखी व्यक्तीकडून माहिती मिळेल. पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कामासाठी लहानशा प्रवास करावा लागेल.

 

वृश्र्चिक :– बँकेतील पैशाचा वापर आज दुसर्‍यांसाठी आनंदाने करणार आहात. वैवाहिक जोडीदाराबरोबर मोकळेपणाने प्रेमाचा संवाद घडेल व आनंद मिळेल.

 

धनु :–तुमच्या बौद्धिक क्षमतेला इतरांकडून  चँलेंज  दिले  जाणार आहे. मित्रपरिवाराबरोबर आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाणार आहे. 

 मकर :– वयस्कर मंडळी अचानक नवीन पिढीचा विचार करून त्यांच्याबरोबर जुळवून घेतील. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणापुढे इतर गोष्टी गौण वाटतील व परदेशी जाण्याची महत्वाकांक्षा व्यक्त करतील.

 

कुंभ :–कुटुंबातील नात्यातील विवाहाच्या कार्यक्रमाकरीता  प्रवास करावा लागणार आहे. अहंकार बाजूला ठेवून सर्वांबरोबर मिळून मिसळून वागाल व इतरांकडून शाबासकी मिळवाल.

 

मीन :–आज तुम्हाला विचित्र स्वभावाच्या माणसामुळे  त्याचा सहवास नकोसा होईल. नोकरी व्यवसायातील अडचणींवर मात करणे आता तुम्हाला सोपे जाणार आहे.

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *