daily horoscope

सोमवार  06 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार  06 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 06 डिसेंबर चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 26:18 पर्यंत व नंतर उत्तराषाढा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मुस्लिम जमादिलावल मासारंभ.

मेष :–आज कितीही अडचणी आल्या तरी त्यातून तुम्हाला मार्ग काढता येणार आहे. घरगुती व्यवसायातील आर्थिक बाजू चांगली राहील. कोणत्याच कामात घाई करू नका.

वृषभ :–नोकरीतील तुमच्यावर असलेल्या जबाबदारीने मनावर ताण निर्माण होईल पण सर्वच कामात सहकारी वर्ग चांगली  मदत करतील. उत्साह वाढवणारा दिवस आहे.

मिथुन :–कलावंताना कलेच्या माध्यामातून प्रसिद्धी मिळेल  व अपेक्षित संधी  मिळतील. आवश्यक नसल्यास प्रवास करू नका प्रवासात त्रास संभवतो.

कर्क :–कुटुंबातील वरीष्ठांचा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्याबरोबर तात्विक मतभेद होतील. आवडता पदार्थ खायला मिळाल्यामुळे खूष व्हाल. 

सिंह :–हातातील काम जबाबदारीने स्वत:च्या हिमतीवर पूर्ण कराल. व्यवसायातील भागीदाराबरोबर  असलेले संबंध सुधारू लागतील. पूर्वनियोजित कार्यक्रम उत्तम रितीने फार पडेल.

कन्या :–नोकरीत सहकार्यांबरोबरील बोलताना अतिशय काळजीपूर्वक शब्द वापरावेत. समाजातील प्रतिष्ठीत मंडळी  कडून तुमचे कौतुक केले जाईल.

तूळ :–व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्यावर नसलेल्या जबाबदार्या पण सांभाळाव्या लागतील. कोर्टकचेरीच्या कामात आज तुम्हाला गप्प बसावे लागेल.

वृश्र्चिक :–कोणतेही काम हातात घेण्यास आजचा दिवस चांगला नाही कारण त्यात बरेच अडथळे निर्माण होणार आहेत. शरिरात कफाचे प्रमाण वाढल्याने वयस्कर मंडळीना त्रास होईल.

धनु :–बौद्धिक क्षेत्रातील मंडळीना आजचा दिवस भरपूर लाभाचा राहणार आहे. प्रकृतीच्या कोणत्याही कारणावर मनाने औषध घेऊ नका.

मकर :–मित्रमंडळींकडून अचानक अविश्वास दाखवला जाईल. आज तुमचे वैचारिक मतभेद   असलेल्या  लोकांपासून सावध रहा व शांतही रहा.

कुंभ :–कुटुंबात ज्येष्ठ  भावंड किंवा वडिलांकडून  तुमच्या मताला कडाडून विरोध होईल.कोणत्याही क्षेत्रातील निर्णय घेताना मनाची गोंधळाची स्थिती निर्माण होईल.

मीन :–अपत्याच्या प्रतिक्षेतील मंडळीना डाँक्टरांकडून अपेक्षित दिलासा मिळेल. साथीच्या रागांपासून त्रास न होण्यासाठी काळजी घ्यावी लागेल.

||शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *