Read in
शनिवार 04 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 04 नोव्हेंबर चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 10:47 पर्यंत व नंतर ज्येष्ठा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज अमावास्या 13:13 पर्यंत आहे., आज सूर्यग्रहण आहे पण ते भारतामधून दिसणार नाही आहे. तरीही त्याचा राशीवर होणार्या परिणामांबाबतचा वेगळा लेख देत आहे.
मेष :–वयस्कर आजारी मंडळींनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. कलाकारांना कलाक्षेत्रात काम करण्याची चांगली संधी मिळेल. आर्थिक प्राप्ती ही होणार आहे.
वृषभ :–संततीच्या प्रगतीकडे व आरोग्याकडे आज प्रामुख्याने लक्ष द्यावे लागेल. नोकरीत श्रम जास्त व समाधान कमी अशी परिस्थिती निर्माण होईल.
मिथुन :–नातेवाईकांबरोबर होणार्या गप्पांमुळे तुम्हाला आज मनावरचे ओझे कमी झाल्याचे जाणवेल. नोकरीत अतिश्रम व दगदग यामुळे प्रकृती नरम गरम राहील.
कर्क :–आज प्रकर्षाने तुम्हाला आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरीत वरीष्ठांकडून नवीन संधी उपलब्ध करून देण्यात येईल ज्यामुळे तुमचा मान वाढणार आहे.
सिंह :–आजचा दिवस तुमचा संघर्षमय असणार आहे. महिलांना स्वयंपाकघरातील कामाबरोबर व्यवसायाच्या बाबतीत मोठा विचार करावा लागेल.
कन्या :–घरातील धार्मिक कार्याच्या आयोजनाची तुमच्यावर जबाबदारी राहणार आहे. व्यवसायातील तुमचा सहभागाने तुमची प्रतिष्ठा वाढेल.
तूळ :–व्यवसायात होणारी प्रगती तुमची कर्तबगारी सिद्ध करेल. कुटुंबातील ज्येष्ठांना वेळ दिल्याबद्दल त्यांना समाधान राहील. व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
वृश्र्चिक :–पोटाच्या विकारात अचानक वाढ होऊन त्रास होऊ लागेल. गुरूतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कारणास्तव प्रवास करू नका.
धनु :–कुटुंबियांच्या मनातील भावना ओळखून आज तुमचे वागणे बदलेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून मिळणार्या सहकार्यासाठी त्यांचे आभार मानावे लागतील.
मकर :–आजचा दिवस अतिशय महत्वाच्या कामासाठी उत्तम असल्याने विचार करा. आर्थिक गुंतवणूकीसाठी फक्त तुमच्या एकट्याच्या विचाराने व्यवहार करू नका.
कुंभ :–संततीच्या प्रगतीच्या दृष्टीने तुमचा विचार योग्य ठरेल. बोलण्यातील व वागण्यातील पारदर्शकता तुम्हाला मानाचे स्थान मिळवून देईल. आर्थिक बाबतीत सर्वांबरोबर चोख रहा.
मीन :–मनातील स्पर्धात्मक विचारांवर नियंत्रण घालण्याची आवश्यकता आहे. आर्थिक व्यवहारातून आज प्रचंड आनंद मिळेल. नियोजनबद्ध काम केल्यामुळे कामात यश मिळेल.
||शुभं-भवतु ||