daily horoscope

शुक्रवार 03 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 03 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 03 नोव्हेंबर चंद्ररास तूळ  08:26 पर्यंत व नंतर वृश्चिक.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

चंद्रनक्षत्र विशाखा 13:44 पर्यंत व नंतर अनुराधा. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–मतभेदांमुळे वादाचे प्रसंग येतील तरीही वाद टाळण्याचा प्रयत्न केल्यास नातेसंबंध बिघडणार नाहीत. समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या  सहवासात  रहाल.

वृषभ :–आज प्रकृतीबाबत  अस्वस्थता जाणवेल.  महत्वाच्या कामाचा ताण आल्यामुळे डोकेदुखीचा त्रास जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल. 

मिथुन :–कुटुंबातील व्यक्तींच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याचा  मानसिक त्रास होईल. नोकरीत विरोध करणार्या सहकारी वर्गाकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाला प्राधान्य द्याल.

कर्क :–आज अचानक धर्मकार्याबाबत  उत्सुकता निर्माण होईल. तरूणांना विचारल्याशिवाय वयस्कर मंडळीनी कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नयेत.

सिंह :–कौटुंबिक प्रश्नावरील चर्चा तुमच्या पुढाकारामुळे पुढे सरकेल व त्यावर उपाय निघण्याची आशा दिसेल. तरूणांनी आपल्या विवाहाबाबतच्या कोणत्याही प्रश्नांचा  अतिरेक करू नये.

कन्या :– नोकरी व्यवसायात अचानक प्रगतीची वाट सापडेल. तरूणांना आपल्या व्यवसायात स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करता येणार आहे. तरूणांना जुन्या दुखण्यांकडे लक्ष द्यावे लागेल.

तूळ :–कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहणार आहे. आईवडीलांच्या सल्ल्याने घेतलेल्या निर्णयात जराही फेरफार करावा लागणार नाही. मोठ्या भावंडांबरोबर केलेल्या गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल.

वृश्र्चिक :–मित्रमंडळींच्या मदतीने ठरवलेल्या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा जास्त प्रगती होत असल्याचे जाणवेल. कोणत्याही कामात नियम सोडून वागू नका.

धनु :–राजकीय व सामाजिक पातळीवर कार्य करणार्यांना विरोधकांच्या विरोधाला विरोध करावा लागणार आहे. नोकरीत अधिकारपद मिळेल व प्रतिष्ठा वाढेल.

मकर :–आज  नोकरीच्या ठिकाणी अचानक तुमच्या निर्णयाला विरोध होत असल्याचे जाणवेल. लहान भावंडाच्या मदतीने घरातील जबाबदारी उत्तम रितीने फार पाडाल.

कुंभ :–कुटुंबातील समारंभाकरीता लहानसा  प्रवास करावा लागेल. तुमच्या बोलण्याने जवळचीच माणसे दुखावली जाण्याची भीती आहे. एखाद्या घटनेचा मानसिक ताण जाणवेल.

मीन :–व्यवसायातील सरकारी परवानगीच्या नावाखाली एखादा दंड भरावा लागेल. व्यवसायातील जमत आलेले व्यवहार तुमच्या वेळेवर निर्णय न घेण्यामुळे फिसकटतील.

||शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *