Read in
गुरूवार 02 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 02 डिसेंबर चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 16:27 पर्यंत व नंतर विशाखा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज प्रदोष असल्याने शिव उपासकांनी उपवास व उपासना दोन्ही करावे. श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव आळंदी.
मेष :- – तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असलात तरी तुम्हाला आज खूप काम करावे लागणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील मंडळीना चांगला मानसन्मान प्राप्त होईल.
वृषभ :–जवळच्या मित्रांकडून मानसिक त्रास संभवतो. आज शक्यतो मित्रांबरोबरची बैठक टाळा. कुटुंबात जोडीदाराच्या सल्ल्याचा विचार करावा लागेल.
मिथुन :–शैक्षणिक असो वा अध्यात्मिक गुरूच्या पाठबळाने मार्गातील अडचणी दूर होतील. आज काम भरपूर व मोबदलाही भरपूर असा अनुभव येईल.
कर्क :–व्यवसायातील अडचणींवर अचानक मात करण्याचा उपाय सापडेल. साथीच्या रोगापासून लहान मुलांना आज खूपच जपावे लागेल. स्त्रियांना दागिने खरेदी करण्याची हौस वाढेल.
सिंह :–व्यवसायातील सुचलेल्या नवनवीन कल्पना अंमलात आणणे तितकेसे सोपे जाणार नाही. नोकरीत आज तुमचे काम तुम्हाला अतिशय हुषारीने करावे लागेल.
कन्या :–पूर्वी गुंतवलेल्या पैशावर उत्तम पैसे मिळाल्याने कुटुंबात आनंदी आनंद राहील. अचानक रिकामी जागा खरेदी करण्याची संधी चालून येईल, व्यवस्थित माहिती घ्या.
तूळ :–नव्याने घराचे रिन्युएशनचे काम सुरू करण्याचा बेत आखाल. आजचा दिवस तुम्हाला या कामासाठी शुभ नसल्याने आज महत्वाचा निर्णय घेऊ नका.
वृश्र्चिक :–तरूणांचा आत्मविश्वास वाढल्याने आज कामाचा उरकाही चांगला होईल. पतीपत्नीमधील झालेले मतभेद तसेच दुरावा आजच्या चर्चेने कमी होणार आहे
धनु :–कामातील तत्परता आश्र्चर्यकारक वाढेल व उत्साहाला पण उधाण येईल. हाथ, पाय, सांधे दुखणार्यांनी आज विशेष काळजी घ्यावी.
मकर :–कुटुंबात व्यवसायाबाबत नवीन विचारांबाबत चर्चा होऊन सकारात्मक विचार सुरू होणार आहेत., अचानक धाडस करण्याची मूळ प्रवृत्ती उफाळून येईल.
कुंभ :– स्कष्टाने वरती जाणार्या प्रवृत्तीमुळे आज तुम्ही जिंकणार आहात. व्यवसायात नोकरांकडून अपेक्षित काम करवून घ्याल व सुस्कारा टाकाल.
मीन :–तरूण तरूणींनी प्रेमप्रकरणाची माहिती घरच्यांना देण्यासाठीचा योग्य दिवस. स्त्रियांना आँफीसच्या कामानिमीत्त लहानसा प्रवास करावा लागेल.
||शुभं-भवतु ||