Read in
बुधवार 01 डिसेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 01 डिसेंबर चंद्ररास कन्या 07:44 पर्यंत व नंतर तूळ.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
चंद्रनक्षत्र चित्रा 18:46 पर्यंत व नंतर स्वाती. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज हातातील पैसा पुनर्गुतवणूकीसाठी वापरल्यास चांगला मोबदला मिळणार आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहणार आहे. आईवडीलांच्या सल्ल्याने खर्चाबाबतचा निर्णय घ्या.
वृषभ :–आज उत्साह व आनंद यात अचानक चांगलीच वाढ होणार आहे. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवली जाईल.
मिथुन. :–उच्चशिक्षण घेण्यासाठीच्या प्रयत्नांना यश येईल. आज अचानक मनाविरुद्ध घटना घडणार आहेत तरी मानसिक शांतता ठेवा.
कर्क :–नवीन घर घेण्याचा प्रश्नावर एकमत होईल. कुटुंबातील वृद्ध मंडळीना तिर्थक्षेत्री नेण्याचे बेत आखले जातील. नोकरीतील वातावरण संशयास्पद जाणवेल.
सिंह :–नव्याने केलेल्या गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल. शिक्षणावर खर्चकेलेले पैसे महत्वाचे ठरल्याचे जाणवेल. वारसा हक्काची जमीन अचानक पैसे मिळवून देण्याची संधी देईल.
कन्या :–विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करण्याची आतून जाणिव होईल व तसा निश्चयही करतील. जवळच्या मित्राच्या मदतीने बिघडलेल्या गोष्टींवर विचार करूनच योग्य तो निर्णय घ्यावा.
तूळ :– अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील जोडप्यांना गोड बातमी कळेल. तरूणांनी नवीन नोकरीच्या प्रयत्नात असणार्यांनी प्रथम आपले विचार पक्के करावेत.
वृश्र्चिक :–आज कौटुंबिक किंवा वैयक्तिक पातळीवर अचानक एखाद्या समस्येला सामोरे जावे लागेल. महिलांनी मनातील विचार मोकळेपणाने मांडल्यास मनावरील ओझे कमी होईल.
धनु :–नव्या उत्साहाने व नव्या दमाने अवघड कामालाही सुरूवात कराल. व्यावसायिक पातळीवर आज एकमोकात सहकार्याचे व सलोख्याचे संबंध ठेवणे महत्वाचे राहील.
मकर :–आजच्या हातातील अडलेल्या कामात मित्राची किंवा भावाची मदत घेतल्यास काम पुढे सरकण्याचा मार्ग सापडेल. मनातील भावना आज पटकन व्यक्त करू नका.
कुंभ :–आज अचानक बोलण्यावर ताबा न राहिल्याने समोरील माणसे दुखावली जातील. उच्च शित्क्षण घेणार्यांना अभ्यासाची योग्य दिशा सापडेल.
मीन :–नेहमी होणार्या सर्दी मुळे डोक्यात सर्दी साठल्याने कान गच्च होऊन अचानक चक्कर येण्याचे प्रसंग येतील. राजकीय मंडळीना गुप्तशत्रूंचा अचानक त्रास होऊ लागेल.
||शुभं-भवतु ||