daily horoscope

मंगळवार 30 नोव्हेंबर 2021  चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 30 नोव्हेंबर 2021  चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 30 नोव्हेंबर चंद्ररास कन्या  दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त  20:33 पर्यंत व नंतर चित्रा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

मंगळवार 30 नोव्हेंबर 2021  चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 30 नोव्हेंबर चंद्ररास कन्या  दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त  20:33 पर्यंत व नंतर चित्रा.

आज उत्पत्ति एकादशी.

 

मेष :–मनातील योजनां सुरू करताना अचानक कांही अडचणी सुरू होऊ लागतील. नोकरीत वरिष्ठांच्या भीतीने दैनंदिन कामातही चुका होऊ लागतील.

 

वृषभ :–व्यवसायातील अडचणींवर अचानक न विचारातही तज्ञांकडून सल्ला मिळेल. भावंडांच्या  हस्तक्षेपाने  कुटुंबातील अडचणींवर उपाय सापडेल.

 

मिथुन :–समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तीबरोबरच्या बोलाचालीतून  नवीन उद्योगाचे विचार समोर येतील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात येईल.

 

कर्क :–महिलांना एखाद्या जुन्या व्याधींचा पुन: त्रास सुरू होईल. वयस्कर मंडळींच्या प्रकृतीत काळजी वाढवणार्या घटना घडतील. लहान मुलांकडूनही त्यांच्याबाबत काळजी वाढवणार्‍या घटना घडतील.

 

सिंह :–कुटुंबातील कन्या संततीकडून आनंदाची बातमी कळेल.व्यवसायात अचानक नव्याने महत्वाची ओळख घडेल. नोकरीतील कमाबाबतचे तुमचे निर्णय अचूक ठरतील.

 

कन्या :–व्यवसायातील किंवा उधार दिलेले पैसे लवकरच परत मिळणार आहेत. कुटुंबातील एकोपा वाढवण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहेत.

 

तूळ :–आरोग्याबाबत जराही हेळसांड करू नका.  मैदानी खेळांबाबतचे तुमचे आकर्षण अचानक वाढेल व नव्या स्फुर्तीने पुन : भाग घ्यावासा वाटेल.

 

वृश्र्चिक :–कुटुंबातील सदस्यांकडून तुमच्या कार्यात आवश्यक ती मदत मिळेल. शैक्षणिक क्षेत्रातील मंडळीना त्यानी आखलेल्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे   कळेल.

 

धनु :–नोकरीत वरिष्ठांबरोबरचे संबंध वृद्धींगत होतील. आज सकाळपासूनच तुमच्या मनातील नवनवीन  विचारांचा  सहकारी वर्गावर  प्रभाव वाढेल.

 

मकर :–सामाजिक कार्यातील तुमच्या योगदानाचे   इतरांकडून खूपच कौतुक होणार आहे. आज व्यवसायात नव्या कराराचे अँग्रीमेंट करण्याचा विचार पक्का होईल.

 

कुंभ :–आज अचानक कायदेशीर कटकटी निर्माण होणार आहेत. नोकरीत सहकारी वर्गाकडून अतिशय चांगले सहकार्य मिळेल. मित्रमंडळीमधे तुमच्याविषयी पैज लागेल.

 

मीन :–ज्या प्रकारे नवीन जागेच्या शोधात आहात त्याच प्रकारच्या जागेची माहिती कळेल. शेजारील मंडळीना अत्यंत अवघड परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी  तुमच्या प्रयत्नांना यश येईल.

 

||शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *