daily horoscope

सोमवार 29  नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 29  नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 29 नोव्हेंबर चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 21:41 पर्यंत व नंतर हस्त.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

सोमवार 29 नोव्हेंबर चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 21:41 पर्यंत व नंतर हस्त.

 

मेष :–तुम्हाला धन मिळण्याचे जे मार्ग आहेत  त्या मार्गातून धनलाभ होणार आहे.  वाढलेल्या लोकसंपर्कातून  नवीन व्यवसायाचे मार्ग सुचतील.

 

वृषभ :–कुटुंबातील अनावश्यक  खर्चाला आळा घालावा लागणार आहे. सामाजिक कार्यातील तुमच्या  सहभागामुळे   तुम्हाला सन्मानाने वागवले जाईल.

 

मिथुन :– तुमच्या हातातील कामात इतरांच्या हस्तक्षेपामुळे झालेला गोंधळ निस्तरताना  तुमची मानहानी होणार आहे. शांतपणे निर्णय घेऊन कार्य करा.

 

कर्क :–नवीन गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला महत्वाचा ठरेल. बोलण्यातील स्पष्टपणामुळे आज नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे मत महत्वाचे ठरल्याचे जाणवेल.

 

सिंह :–आजचा संपूर्ण  दिवस  कामाच्या धावपळीत जाणार आहे. नोकरीतील सहकार्‍यांना तुमचे मत न पटल्याने मानसिक त्रास होईल. जवळच्या नात्यातून तुमच्या बाबत  नाराजीचा सूर येईल.

 

कन्या :–स्वत:ची व्यक्तिगत कामे स्वत:च पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा  न झाल्याने  दवाखान्यात अँडमिट करावे लागेल.

 

तूळ :–अती खाण्याने अपचनाचा व पित्ताचा त्रास संभवतो. व्यवसाय व नोकरीत सहकार्यांकडून आवश्यक तेवढे सहकार्य मिळणार नाही. टेक्निकलच्या क्षेत्रातील मंडळीना नवीन प्रोजेक्टवर काम सुरू  करता येणार आहे.

 

वृश्र्चिक :–इलेक्ट्रानिक क्षेत्रातील मंडळीना अचानक मोठ्या लाभाची संधी येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी स्पर्धात्मक कामाच्या मागे  न लागता शांतपणे कार्य करावे.

 

धनु :–आर्थिक बाबतीत नियोजनाची आवश्यकता निर्माण होईल. कोणतीही मोठी गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय करू नका.

 

मकर :–कुटुंबात ज्येष्ठ मंडळींसाठी तरूणांकडून त्यांच्या आवडीच्या गोष्टी ठरवल्या जातील. नोकरीतील कामाचा आवाका न आवरल्याने तुम्हाला वरीष्ठांकडून ऐकावे लागेल.

 

कुंभ :–व्यवसायातील नफ्याचे प्रमाण अचानक वाढल्याने कुटुंबात आनंदीआनंद निर्माण होईल. नोकरीतील तुमच्या कार्याचा गौरव करणार्या घटना घडतील.

 

मीन :–व्यवसायात इतरांवर अवलंबून राहिल्यास नुकसान संभवते. आवश्यक असेल तेथे कामगार भरती करावी लागेल. कुटुंबातील वयस्कर मंडळीना आनंद देणार्‍या घटना तुमच्या हातून घडतील.

 

||शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *