Read in
रविवार 28 नोव्हेंबर 2021 ते शनिवार 04 डिसेंबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार चंद्ररास सिंह 28:03 पर्यंत व नंतर कन्या.
रविवार 28 नोव्हेंबर 2021 ते शनिवार 04 डिसेंबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
रविवार चंद्ररास सिंह 28:03 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 22:04 पर्यंत व नंतर उ. फाल्गुनी. सोमवार 29 चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उ. फाल्गुनी 21:41 पर्यंत व नंतर हस्त. मंगळवार 30 चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त 20:33 पर्यंत व नंतर चित्रा. बुधवार 01 डिसेंबर चंद्ररास कन्या 07:44 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र चित्रा 18:46 पर्यंत व नंतर स्वाती. गुरूवार 02 डिसेंबर चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 16:27 पर्यंत व नंतर विशाखा. शुक्रवार 03 डिसेंबर चंद्ररास तूळ 08:26 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 13:44 पर्यंत व नंतर अनुराधा. शनिवार 04 डिसेंबर चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 10:47 पर्यंत व नंतर ज्येष्ठा.
मंगळवार उत्पत्ति एकादशी.
गुरूवार प्रदोष, शिवरात्री. श्री ज्ञानेश्र्वर महाराज समाधी उत्सव. (आळंदी)
शनिवार अमावास्या दुपारी 13:13 पर्यंत. शनिवारी खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही.
मेष :–बर्याच दिवसापासून सुरू असलेल्या आजारातून बरे वाटू लागे. त्यामुळे आता अजिबात प्रकृतीबाबत कोणतेही टेंशन घेऊ नका. खरेदीचा मूड येऊन अचानक मोठा खर्च करणारी खरेदी कराल. हा सप्ताह कांही प्रमाणात विद्यार्थ्यांना त्रासदायक जाणार आहे. अभ्यासातील गैरसोयी दूर करण्याकरीता वरीष्ठांची मदत मिळेल. अध्यात्माच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांचा सन्मान केलाजाईल.
वृषभ :–प्रेमाच्या व्यवहारात अतिशय शांतपणाने वागावे लागणार आहे. लगेच राग येणार्यां मुलीना रागावर नियंत्रण मिळवावे लागेल. कुटुंबातील अडचणींसाठी जवळच्या नातेवाईकांची मदत घ्यावी. घर भाडय़ाने देत असाल तरकायदेशील सोपस्कार करावे लागणार आहेत. तीन महिने पूर्ण न झालेल्या गर्भवती महिलांनी जराही दगदग करू नये व आवश्यक ती काळजी घ्यावी. शेअर मार्केटमधे या सप्ताहात फारसे कांहीही हाताला लागणार. ाही तरी व्यवहार करू नयेत.
मिथुन. :–पाळणाघर किंवा बालसंगोपन केंद्रात काम करणार्या मावशी मामानी अतिशय काळजीपूर्वक काम करावे. टेलिफोन आपरेटर, पोष्ट आँफीस जाहिरात विभागात काम करणार्याना अचानक कामाचा बोजा वाढल्याचे कळेल. नोकरीतील कोर्टकेसच्या बाबतीत तुम्हाला मानसिक त्रास होणार आहे लेखकांना त्यांच्या नवीन पुस्तकाला भरपूर मागणी वाढल्याचे दिसेल व प्रसिद्धी मिळेल.
कर्क :–अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेतील जोडप्यांना गोड बातमी मिळण्याची आशा धरायला हरकत नाही. व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात उधारीचे काम वाढवू नये. लहान मुलांच्या हातातील वस्तूंकडे मोठ्यांनी लक्ष द्यावे. या सप्ताहात बाजारात गेल्यावर तुम्हाला तुमची पर्स फारच लक्षपूर्वक सांभाळावी लागणार आहे. प्रवासातही पाकीट सांभाळावे लागेल. वेगळे रहात असलेल्या लहान भावंडाची अचानक भेट होणार आहे.
सिंह :–तुम्हाला तुमच्या आवडीनुसार हा सप्ताह वापरता येणार आहे. तुमची वैयक्तिक शिलकीतील कामे मार्गस्थ लावण्यासाठी नक्कीच या सप्ताहाचा वापर करा. नोकरीतील तुमच्या हातात असलेले प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या नियोजनानुसार व योजनेनुसार मार्गी लावता येणार आहे. फक्त या सप्ताहात जराही शेअर बाजारामधे कोणताही व्यवहार करू नका.
कन्या :–उजव्या डोळ्याला दुखापत होण्याची शक्यता आहे. गायन विद्या शिकणार्यांना आपली कला सादर करता येणार आहे. त्यातूनच भविष्याच्या संधी मिळणार मिळणार आहेत तरी संधीचा फायदा घ्या. वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत कामकाजाचा बोजा वाढल्यामुळे स्वभावातील चिडखोरपणा वाढेल. विवाहयोग्य तरूण तरूणींनी विवाहाबाबतची आपले विचार पक्के करावेत.
तूळ :–या सप्ताहात सुरूवातीपासूनच तुमची कामे सकारात्मकतेकडे सुरू राहतील. महिलांकडून या सप्ताहात धाडसाची कामे पार पडतील. डाँक्टर मंडळींकडून अवघड व फार मोठी सर्जरी केली जाईल व त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा जमा होणार आहे. तरूणांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केल्यास प्रकृतीतील बिघाड लवकर दुरूस्त होईल. वयस्कर मंडळीनी खाण्यापिण्यावर संयम ठेवावा. राजकीय मंडळीना गुप्तशत्रूंचा त्रास होईल.
वृश्र्चिक :–हातातील कामे विनाविलंब करण्याचा प्रयत्न केल्यास कामे खात्रीशीरपणे मार्गी लागतील. कुटुंबातील अडचणीवर मित्रमंडळींच्या मदतीने योग्य उपाय सापडेल. विवाहाच्या बाबतीत लहान मोठ्या प्रसंगातून गैरसमज होण्याचा धोका आहे तरी अतिशय जागरूकपणे विचार करावा लागेल. राजकीय क्षेत्रातील मंडळींचा जनमानसात मानसन्मान वाढेल. नव्याने नोकरीत लागलेल्याना आपली कार्यक्षमता दाखवण्याची संधी मिळेल.
धनु :–कुटुंबातील नात्यातील मतभेद अचानक संपुष्टात येऊन एकमेकांमधील प्रेमभावना वाढीस लागणार आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून व दैनंदिन शेअर बाजारातून चांगला धनलाभ होईल. राजकीय क्षेत्रातील मंडळींना त्यांचे विरोधक सध्या शांत झाल्याचे जाणवेल. चित्रपट व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना त्यां च्या कामाच्या बाबतीत नवीन वाटा सापडतील. कोणत्याही कामात घाईगडबड करू नका.
मकर :–विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्यासाठी परदेशी जाण्याची इच्छा होईल. दुसर्यांच्या सांगण्यावरून घेतलेले निर्णय नंतर अडचणीत आणतील तरी तुमच्या वैयक्तिक प्रश्र्नाबाबत कोणाच्याही सल्ल्याने वागू नका. तरूणांना आपल्या बुद्धी कौशल्याने आपले म्हणणे मांडता येणार आहे. शेअर मार्केटमधील या सप्ताहातील व्यवहार लाभदायक राहतील. व्यवसायात नवीन ओळखी होतील.
कुंभ :–या सप्ताहात कांही व्यवहार फायद्याचे होणार असून व्यवसायाचा नव्याने विस्तार करण्याचे ठरेल. विद्यार्थ्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढवणार्या गोष्टी घडणार आहेत. लांबच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागणार आहे. महिलांना ज्या कामाची भीती वाटत होती तेच काम करण्याचे त्यांचे धाडस वाढणार आहे. प्रकृतीबाबतच्या कोणत्याही तक्रारी बाबत बेफिकीर राहू नका.
मीन :–नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार असेल नक्की हा सप्ताह तुमच्यासाठी लाभदायक आहे. नोकरीतील कामाचा ताण कमी करण्यासाठी बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. कुटुंबात आनंदी व उत्साहाचे वातावरण राहणार आहे. व्यवसायात नवनवीन प्रयोग करण्याची आवश्यकता भासेल व त्यासाठी मित्रमंडळींपेक्षा तज्ञांची मोठी मदत मिळेल. महत्वाची व्यक्तिगत कामे स्वत:च करा.
||शुभं-भवतु ||