Read in
शनिवार 27 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 27 नोव्हेंबर चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 21:42 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
कालाष्टमी आहे.
आज कालभैरव जयंती आहे. संकटाने, आजारपणाने त्रस्त झालेल्यानी आजपासून श्री कालभैरवाष्टक वाचण्यास सुरूवात करावी.
मेष :–आपल्या निर्णया बरोबर पक्के राहण्याचा स्वभावामुळे आज तुमचा फायदा होणार आहे. तुमच्या बोलण्याने आज सर्वजण प्रभावीत होतील.
वृषभ :– खर्चाच्या बाबतीत अती हिशोबी राहिल्याने मनस्ताप होईल. कोणाच्याही दडपणाखाली आज तुम्हाला काम करणे अशक्य होईल.
मिथुन. :–संततीच्या बाबतीत आज तुम्हाला अतिशय व्यवहारी रहावे लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांना आज अचानक नकारात्मक गोष्टीचा अनुभव येईल.
कर्क :–विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी स्वत:च्या मनाने निर्णय घेऊ नयेत. महत्वाच्या कागदपत्रांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, हरवण्याची शक्यता आहे.
सिंह:–जुने विषय डोक्यात ठेवल्यास मानसिक ताण येईल ब्लडप्रेशरचा पण त्रास संभवतो.समोर आलेल्या परिस्थितीतून योग्य मार्ग काढण्यासाठी फक्त ज्येष्ठांचाच सल्ला घ्या.
कन्या :–आज तुम्हाला आत्मपरिक्षणाचा गरज भासेल. वादग्रस्त विषयावर गोड बोलून युक्तीने उपाय काढता येणार आहे. विद्यार्थ्यांना आपला आत्मविश्वास कमी झाल्याचे जाणवेल.
तूळ :–अपयशाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास त्यातूनही मार्ग सापडेल. जुन्या योजनांवर पुन्हा विचार करावा लागेल. सरकारी बँकेच्या कर्जाबाबतीत बेफिकीर राहू नका.
वृश्र्चिक :–आपले तेच खरे अशा समजूतीने वागल्यामुळे आज तुमचे मतभेद विकोपाला जातील. कुटुंबातही वाद टाळण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कागदपत्रावर वाचल्याशिवाय सही करू नका.
धनु :–आज संततीकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. तरूणांना आपल्या छंद, आवडीला महत्व देता येणार आहे. वरिष्ठांसमोर आज तुम्हाला नम्रतेने वागावे लागेल.
मकर :–शांतपणाने विचार करून भविष्याचे नियोजन करण्यात आज यशस्वी व्हाल. शेजार्यांबरोबर गोडीचे व्यवहार ठेवण्याचा प्रयत्न करा, तुसडेपणाने वागू नका.
कुंभ :– तुम्ही बँकेकडे कर्जासाठी केलेल्या प्रस्तावाचा विचार होऊन बँकेचा योग्य प्रतिसाद मिळेल. आज खर्चाचा बोजा वाढणार आहे तरी काटकसरीचे धोरण ठेवा.
मीन :–हातात आलेल्या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर शांत रहावे लागेल. कोणासही आश्वासन देताना व्यवहारी दृष्टीकोन वापरा. चिंता व चिंतन यातील फरक समजून घ्या.
||शुभं-भवतु ||