Read in
शुक्रवार 26 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 26 चंद्ररास कर्क 20:35 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 20:35 पर्यंत व नंतर मघा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज सर्वानीच आपल्या मुलांच्या सहविचाराने निर्णय घ्यावा. नोकरीतील अडचणींच्या विचाराने मानसिक ताण घेऊ नका. नातवंडांच्या सहवासात आनंद मिळेल.
वृषभ :–मानसन्मानाचा प्रसंगी तुम्हाला आज फारच अवघडल्यासारखे होईल. शेअर्स मधे गुंतवलेल्यांना आज चांगलाच फायदा होणार आहे.
मिथुन :–समाजातील प्रभावी व्यक्तींचा आज सहवास मिळेल. आजच्या दिवसात तुम्हाला छंदाकडे विशेष लक्ष देता येणार आहे. घरातील आवराआवर करताना जून्या हरवलेल्या सापडतील.
कर्क :–नवीन वाहन खरेदी करण्याचा विचारात बदल कराल. आज तुम्ही कोणत्याही एका विचाराशी पक्के राहणार नाही. व्यवसायात नवीन व्यावसायिक नाती निर्माण होतील.
सिंह :–विद्यार्थ्यांनी आजपासून थोडेथोडे परिश्रम वाढवून भरघोस यशाचा निश्चय करा. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घेऊन आज निर्णय घ्या.
कन्या :–कुटुंबात तुमच्या विवाहाबाबतची आज बोलणी सुरू होतील. तुम्हाला आज तुमचे विचार व्यक्त करण्याची संधी मिळेल. लेखक मंडळीना आज टिकेला सामोरे जावे लागेल.
तूळ :–मनातील जून्या सूप्त इच्छां बाबत आज तुम्हाला मार्ग सापडणार आहे. जमीमीच्या व्यवहाराच्या गुंत्यातून आज सहजपणे बाहेर पडाल. डोकेदुखीचा त्रास संभवतो.
वृश्र्चिक:–नोकरीतील कामाच्या तणावाखाली रहाल. चिडचिडेपणा वाढेल. आजच्या दिवसात तुम्हाला छंदाकडे विशेष लक्ष देता येणार नाही. मधुमेहीनी विशेष काळची घ्यावी.
धनु :–मैदानी खेळाडूना नवीन संधी मिळणार असल्याचे आज कळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील पण अतिशय काळजीपूर्वक विचार करावा लागेल.
मकर :–महिलांना एखाद्या जुन्या शारिरीक व्याधींचा त्रास जाणवेल. आज अचानक तुम्हाला आनंद देणार्या मित्रांची भेट होईल व आंतरिक उर्जा वाढेल.
कुंभ :–कुटुंबात आईकडील नात्याबाबत काळजी वाटणार्या घटना घडतील. व्यवसायात जुनी येणी न मागताही आज वसूल होतील. तरूणांच्या मनातील गोष्टींचा विचार करूनच व्यक्त व्हा.
मीन :–राजकीय व्यक्तींच्या ओळखीचा आज तुम्हाला फायदा मिळेल. आजारी व्यक्तीला आज तुमच्याकडून आर्थिक मदत मिळेल. व्यवसायात नवीन ओळखी होतील.
||शुभं-भवतु ||