Read in
गुरूवार 25 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 25 नोव्हेंबर चंद्ररास कर्क दिवसरात्र व नंतरही कर्कट आहे. चंद्रनक्षत्र पुष्य 18:48 पर्यंत व नंतर आश्लेषा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज गुरूपुष्यामृतयोग आहे. 06:54 ते 18:48 पर्यंत.
या दिवशी काय करावे यावर स्वतंत्र लेख दिलेला आहेच.
मेष :–आज नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला न पटणार्या गोष्टी घडतील तरीही रागाला आवर घालावा लागेल. कुटुंबात मुलांकडून आनंदाच्या घटना कळतील व वातावरण आनंदी राहील.
वृषभ :–आज अचानक प्रवासाचे योग येणार आहेत. भावंडांच्या मदतीने व्यवसायातील कामकाजाच्या बोजा र मोठी चर्चा होऊन त्यातून चांगले फलित निघेल.
मिथुन :–विवाहासाठी आतूर झालेल्या तरूण तरूणींना अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळणार असल्याचे जाणवेल. इतरांबरोबर मतभेद होऊन वाद वाढण्याची शक्यता आहे.
कर्क :–आज नोकरीत अचानक सन्माननीय वागणूक मिळणार आहे. कोणत्याही कारणासाठी केलेला प्रवास मोठा फायदा करणारा ठरेल व भविष्याच्या संधींची माहिती मिळेल.
सिंह :–तरूणांच्या पचनाच्या तक्रारीत वाढ होऊन छातीत दुखण्याचा त्रास होईल. नवीन किमती खरेदी करण्याच्या विचारांना चालना मिळून आता ती पार पाडण्याचे नियोजन कराल.
कन्या :–सामाजिक कार्यातील तुमचा वाढता सहभाग तुमची प्रतिष्ठा वाढवणारा ठरेल. महिलांना एखाद्या अज्ञात भीतीने मनाला त्रास होईल तरी आज आपल्या आ डत्या माणसात रहा.
तूळ :–विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांनी आता सुरूवात करायला हरकत नाही. नोकरीत कामाचा ताण वाढल्यामुळे स्वत:साठी वेळ काढावा लागेल.
वृश्र्चिक :– आज तुमची विनाकारण चिडचीड वाढणार आहे. रागावर व स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. तरूणांच्या आज चैनी वृत्तीत वाढ होईल. वडिलांबरोबर केलेल्या चर्चेमुळे बर्याचशा गोष्टीना सकारात्मक वळण मिळेल.
धनु :–कुटुंबातील ज्येष्ठांच्या प्रकृतीत अपेक्षेप्रमाणे सुधारणा होऊ लागेल. तुमच्या नवीन वास्तूच्या खरेदी साठीचे बेत आखणे गरजेचे आहे अचानक खरेदी करू नका.
मकर :–नोकरी वा व्यवसायात कोठेही कोणत्याही परिस्थितीत स्वत:चा हेका चालवू नका. कुटुंबावर आलेल्या संकटामुळे मोठी जबाबदारी स्विकारावी लागेल.
कुंभ :–व्यवसायिक कारणांच्या निमीत्ताने ठरलेला प्रवास रद्ध होईल. मित्रमंडळींच्या कंपूमध्ये आज तुमचाच शब्द प्रमाण मानला जाईल. आर्थिक फायदा होईल.
मीन :–राजकीय मंडळीना आजचा दिवस अतिशय सुख व समाधानाचा जाईल. महिलांना आपल्या मनातील योजनांना मूर्त स्वरूप देता येणार आहे. कुटुंबात केलेल्या जून्या व्यवहारामुळे कांही गैरसमज होणार आहेत.
||शुभं-भवतु ||