daily horoscope

बुधवार 24 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार  24 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 24 नोव्हेंबर 2021 चंद्ररास मिथुन  09:49 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 16:28 पर्यंत व नंतर पुष्य.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–विद्यार्थ्यांना अवघड व जड जाणार्या विषयाची गोडी लागून विषयाचे आकलन होऊ लागेल. गु, तवणूकीतून फायदा करून देणार्‍या व्यक्तीपासून सावध रहावे लागेल.

 

वृषभ :–नोकरीतील नवीन आव्हानांना सामोरे जाताना  जून्या अनुभवांची शिदोरी उपयोगी पडणार आहे. व्यावसायिक कामासाठी केलेला  प्रवास लगेच फळीत देणार नाही पण  निष्फळही  ठरणार नाही.

 

मिथुन :–कुटुंबातील  जवळच्या व्यक्तींकडून आनंदाची बातमी  कळेल. नोकरीतील कामकाजाचा आढावा घेऊन आपल्या कामाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडाल.

 

कर्क :–एखाद्या सभेस मान्यवरांच्या यादीत उपस्थिती लावण्याचा सन्मान मिळेल. पतीपत्नीमधील वाद संपुष्टात येऊन एकमेकांमधील प्रेमभावना वाढीस लागेल.

 

सिंह :–वैयक्तिक आयुष्यातील निर्णय घेताना मनाची चलबिचलता वाढेल. लहानशा घरगुती उद्योगासाठी  गुंतवणूक वाढवावी लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या हातातील प्रोजेक्टमधे इतरांनी ढवळाढवळ केलेली आवडणार नाही.

 

कन्या :–समाजातील  मोठ्या लोकांच्या ओळखीने  तुमची अडकलेली कामे मार्गी लागणार असल्याने तुम्ही त्यांची मदत घ्या. वयस्कर मंडळींच्या मानसिक शक्तीची तुम्हाला आज चांगलीच प्रचिती येईल.

 

तूळ :–जून्या गुंतवणूकीतून एकदम  समाधानकारक परतावा मिळेल. लहान मोठ्या प्रसंगातून निर्माण झालेला गैरसमज आज दूर करण्याची संधी मिळेल तरी त्याचा फायदा घ्या.

 

वृश्र्चिक :–आज तुम्हाला कटाक्षाने खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबात मुलांकडून आनंदाच्या घटना कळतील. व्यवसायात नव्याने ओळखी होणार आहेत.

 

धनु :-जवळच्या वा लांबच्या  कोणावरच आज आंधळ्या विश्वासाने व्यवहार करू नका. राजकारणात मात्र तुमची ताकद वाढणार्या घटना घडतील. गटबाजीपासून सावध रहावे लागेल.

 

मकर :–तुमच्या वाढत्या जनसंपर्कामुळे तुमची सगळ्यांकडून वाहवा होईल. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणापुढे इतर गोष्टी गौण वाटतील परदेशी जाण्यासाठीची स्वप्ने पूर्ण करण्याच्या  महत्वाकांक्षेतही वाढ होईल.

 

कुंभ :–तुमच्या बुद्धिकौशल्याने  आज तुम्हाला मोठ्या गटाला समुपदेशन करण्याची संधी देण्यात येणार आहे. महिलांना आपल्या संभाषण कौशल्याने सभेस जिंकता येईल.

 

मीन :–वाहन चालविताना अतिशय सावध रहावे लागेल. इलेक्ट्रानिक्स क्षेत्रातील कर्मचार्‍यांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागेल. वयस्कर मंडळीना आपल्या दुखण्यांकडे केले ले  दुर्लक्ष अडचणीत आणेल.

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *