Read in
मंगळवार 23 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 23 नोव्हेंबर चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 13:43 पर्यंत व नंतर पुनर्वसु.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
अंगारक संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय 21:06. ( मुबई )
मेष :–आज तुमच्या मनातील कल्पनाना कुटुंबियांकडे सकारात्मक प्रतिसाद मिळेल. दिवस अत्य, त आन, दाचा व उत्साहाचा पण खर्चिक जाणार आहे.
वृषभ :–आज कोणत्याही मानसिक त्रासातून बाहेर पडण्याची गुरूकिल्ली सापडेल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल व प्रशंसा होईल.
मिथुन :– पूर्वी गुंतवलेल्या पैशातून चांगला लाभ होईल. लहानशा उद्योगाला पण खूपच चालना मिळाल्याचे लक्षांत येईल. नव्याने पैसे गुतवण्यासाठी वडिलांकडून मोठी मदत मिळेल.
कर्क :–नव्याने जबाबदारी स्विकारताना मनाची चलबिचलता वाढेल. व्यवसायाच्या नव्या कल्पना आज प्रत्यक्षात आणण्याचा मुहूर्त करू नका.
सिंह :–नातेवाईकांबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचे ठरेल व तसे नियोजन कराल. प्रकृतीविषयी कांही संशय आल्यास लगेच डाँक्टरांचा सल्ला घ्या.
कन्या :– अध्यात्माच्या नावाने भुलवणार्या गुरूंपासून सावध रहा. नव्या व्यवसायाच्या नव्या कल्पना अंमलात आणण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी होणार आहे तरी त्याचा शुभारंभ करायला आज हरकत नाही.
तूळ :– दुसर्यांकडून झालेल्या लहानशा चुकीचा मानसिक त्रास होऊ देऊ नका.कोणतीही एंटीबायोटिक्स औषधे मनाने आज अजिबात घेऊ नका.
वृश्र्चिक :– तुमच्या स्वभावातील कंजुषपणा आज अतिशय वाढेल व इतरांकडून त्याचे हसे होईल. बौद्धिक क्षेत्रातील मंडळीना आज मानसन्मानाचा लाभ होईल.
धनु :–तुम्ही ज्यांना गुरू मानता त्यांच्या आशिर्वादामुळे आज तुमच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्याचे जाणवेल. शिक्षकांना नवीन वर्षासाठीच्या केलेल्या नियोजनात कांही महत्वाच्या सुधारणा कराव्या लागतील.
मकर :–साठवलेल्या पैशातून आईवडीलांसाठी त्यांच्या आवडत्या वस्तूची खरेदी कराल. पतीपत्नीच्या वादविवादात दोघानाही मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
कुंभ :– कुटुंबातील व्यक्तींच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याचा त्रास मानसिक त्रास होईल. मुलांच्या शिक्षणासाठी अचानक पैसे खर्च भरावे लागतील.
मीन :–विद्यार्थ्यांच्या मनातील योजनांचा कल पूर्णत्वाकडे जाऊ लागेल त्यासाठी आज मार्गदर्शनाची संधी मिळणार आहे. म्युचुअल फंडासाठी गुंतवलेल्या रकमेतून फायदा होईल.
|| शुभं-भवतु ||