Read in
सोमवार 22 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 22 नोव्हेंबर चंद्ररास मिथुन व चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 10 :42 पर्यंत व नंतर आर्द्रा
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–नियोजनात ठरलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. जागेचे व्यवहार पुढे जाऊ शकतात.
वृषभ :–उतारवयात असलेल्यांना अचानक एखाद्या ठिकाणी प्रवासाला जावे लागेल. नोकरी व्यवसायातील अडचणींवर मात करणे आता तुम्हाला सोपे जाणार आहे.
मिथुन. :–आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. निश्चय केलेल्या कामाला आज कोणत्याही परिस्थितीत सुरूवात करा नक्की काम मार्गी लागेल.
कर्क :–दगदग, धावपळ आणि तरीही मानसिक त्रास असा संमीश्र अनुभवाचा आजचा दिवस राहणार आहे. जास्त महत्वाची नसलेली कामे आज हातात घेऊ नका.
सिंह :– दुकानातून प्रत्यक्ष खरेदी केलेल्या वस्तूबाबत आज तुम्ही नाराज होणार आहात. महिलांना जुन्या व्यावहारिक बाबतीतील नुकसानीची रूखरूख लागेल.
कन्या :– आजूबाजूच्या वातावरणावर आज तुमचा मूड बदलत राहणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीवर विश्र्वास ठेवून प्रयत्न वाढवावेत. महिलांकरीता आजचा दिवस आनंदाचा राहील.
तूळ :–आजचा दिवस इतरांकडून तुम्हाला भरघोस सहकार्य मिळण्याचा आहे. बर्याच दिवसानंतर कुटुंबासह बाहेर फिरायला जाण्याचे प्लँनिंग कराल. विवाहेच्छूनी अजिबात घाई करू नये.
वृश्र्चिक :–तुम्ही आखलेले बेत फलद्रूप करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या हातातील अधिकारांवर बंधने आणली जाणार आहेत.
धनु :–परदेशी जाऊ इछ्छिणार्यांना शिक्षणाच्या निमीत्ताने जाता येणार असल्याचे कळेल. कोर्टकेसच्या बाबतीत उतावीळपणा केल्यास केसमधे बिघाड निर्माण होईल.
मकर :–आर्थिक नियोजनातील तुमचे अंदाज तंतोतंत खरे ठरतील. तरूणांना, खेळाडूना आपल्या आवडत्या खेळातून स्वत:ला सिद्ध करता येण्याची संधी मिळणार आहे.
कुंभ :–आज नोकरीत, व्यवसायात सर्वच ठिकाणी तुमची कामाची क्षमता अजब असल्याचे जाणवेल. पूर्वीच ठरलेल्या विवाहास आता विलंब लागणार नाही.
मीन :–नोकरी व्यवसायात तुम्हाला तुमच्या नियोजनानुसार काम करता येणार आहे. विद्यार्थ्यांना अवघड वाटणार्या विषयासाठी स्पेशल शिकवणारे शिक्षक मिळतील.
||शुभं-भवतु ||