Read in
रविवार 21 नोव्हेंबर ते शनिवार 27 नोव्हेंबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 21 नोव्हेंबर चंद्ररास वृषभ 21:09 पर्यंत व नंतर मिथुन
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
चंद्रनक्षत्र रोहिणी 07:35 पर्यंत व नंतर मृगशीर्ष. सोमवार 22 चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 10 :42 पर्यंत व नंतर आर्द्रा. मंगळवार 23 चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 13:43 पर्यंत व नंतर पुनर्वसु. बुधवार 24 चंद्ररास मिथुन 09:49 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 16 :28 पर्यंत व नंतर पुष्य. गुरूवार 25 चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 18:48 पर्यंत. शुक्रवार 26 चंककर्क 20:35 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 20:35 पर्यंत व नंतर मघा. शनिवार 27 चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 21:42 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी.
मंगळवार 23 रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी.
गुरूवार 25 रोजी गुरूपुष्यामृत योग आहे.
शनिवार 27 रोजी कालभैरव जयंती.
मेष :–नोकरीच्या बाबतीत तुम्हाला जे धाडस करायचे होते ते करण्याची मनाची तयारी करा. नाहीतर संधी मिळून सुद्धा फायदा घेता आला नाही असे वाटेल. राहत्या घराच्या जागेत बदल करावयाचा असल्यास आता विचार करायला हरकत नाही. पित्ताच्या त्रासामुळे डोके दुखण्याचा त्रास होईल. विद्यालय व महाविद्यालयातील शिक्षकांना आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागणार आहे. संततीच्या वागण्याबाबतचे तुमचे अंदाज खरे ठरतील.
वृषभ :–नोकरीत असलेल्यांनी इतरांची बाजू मांडण्याकरीता जीवाचा आटापिटा करू नये. सर्दी खोकला झालेल्या लहान मुलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. घरगुती उपाय करत बसू नये. कुटुंबातील ज्येष्ठांच्या विचाराने नवीन खरेदीची विचार करावा. व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मानाचे पान दिले जाईल. मंत्रविद्येच्या अभ्यासकांना मंत्रशक्तीचा अनुभव येईल. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांनी आपला विचार पक्का करूनच मग डाँक्टरांकडे जावे.
मिथुन :–सध्या तुमच्या नियोजनाप्रमाणे घराचे कर्ज बर्यापैकी फेडण्याची तयारी कराल. निवृत्त झालेल्या ज्येष्ठ मंडळींना सेवाभावी काम करण्याची इच्छा निर्माण होईल. महिलांना आपल्या चेहर्याचे सौंदर्य वाढवण्याची इच्छा होईल. हा सप्ताह तुम्हाला स्वत:विषयी विचार करायला लावणारा आहे. मित्रमंडळींच्या आग्रहाखातर लहानशा प्रवास कराल. व्यवसायात नुकसान झालेल्यांना पुन: नव्याने व्यवसाय सुरू करण्याची उमेद मिळेल.
कर्क :–सप्ताहाच्या सुरूवातीच्या दिवसाच्या सकाळपासूनच अचानक बर्याच गोष्टी पाँझिटीव्ह घडू लागतील. वडीलांकडील नात्यातील ज्येष्ठांच्या आग्रहामुळे पूर्वीचा ठरलेला कार्यक्रम रद्ध करावा लागेल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची मनात काळजी घेऊन विचार करू नये. विद्यार्थ्यांचे यश अगदी नजरेसमोर असले तरीही प्रयत्नात ढिलाई करू नये. स्वत:चे घर घेण्याच्या विचारात असाल तर त्यानुसार प्रयत्न सुरू करावेत. वयस्कर मंडळींना हात पाय दुखण्याचा त्रास संभवतो.
सिंह :–मनातील तीव्र इच्छाशक्तीचा विजय झाल्याचे दिसून येईल. विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न वाढवल्यास यशाची खात्री मिळेल. महिलांना आपल्या छंदाकडे व आवडीकडे विशेष लक्ष देता येणार आहे. चित्रकार व शिल्पकार मंडळीना आपली कला सादर करण्याची सुवर्णसंधी मिळेल. नातेवाईकांसाठी अचानक आर्थिक खर्च करावा लागेल पण त्यातून मनाला खूपच आनंद वाटेल. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपला आनंद साजरा कराल.
कन्या :–या सप्ताहाची सुरूवात लाभदायक घटनांनी होणार आहे. मित्रमंडळींच्या मदतीने एखाद्या लहानशा पिकनीकची संधी मिळणार आहे. कोणत्याही कारणाने तुम्हाला आनंदच मिळणार आहे. अवघड वाटणार्या गोष्टी धाडसाने करायला हरकत नाही नक्कीच त्यात तुम्हाला यश येणार आहे. परदेशी कंपन्यांबरोबर असलेल्या व्यावसायिक संबंधातातील तुमचा सहभाग महत्वाचा राहील. वयस्कर मंडळीना जून्या अनुभवांची शिदोरी उलगडता येणार आहे त्यामुळे मनाला हलकेपणा वाटेल.
तूळ :–सोशल मिडीयात सहभागी होऊन तुम्हाला तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील महिलांना आपल्या कर्तृत्वाचा अभिमान वाटावा अशा घटना घडतील. तरूणांच्या मनात असलेली नवीन नोकरीची इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग सापडेल. विद्यार्थ्यांना आता आपल्या यशाविषयी खात्री पटेल. आजोळकडील नात्यातील प्रेमाचा सहवास घडेल व बच्चेकंपनीला मामा आईकडून खूप प्रेम मिळेल. तरूणांच्या आर्थिक खर्चात वाढ झाली तरी त्यातुनही सुख मिळेल.
वृश्र्चिक :–या सप्ताहाचे नियोजन न केलेल्याना हा सप्ताह काही प्रमाणात घाईगडबडीचा व मानसिक गोंधळाचा जाणार आहे. अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहून मानसिक ताणतणाव कमी होईल. वयस्कर मंडळीना या सप्ताहात स्वत:ची करमणूक कशी करायची ते स्वत:च ठरवावे लागेल. नोकरीतील कामाच्या प्रेशरने कामात चूक होण्याची शक्यता आहे तरी अतिशय जागरूकपणे काम करा. विवाहेच्छूनी जोडीदाराची निवड करताना ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
धनु :–तुमच्या मनातील प्रबळ इच्छेमुळे अवघड कामही सोप्या पद्धतीने कराल. फोटोग्राफीची आवड असलेल्यांच्या कलेला अचानक वाव मिळेल व त्याच्या कलेचे ही कौतुक होईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाने मानसिक समाधान मिळेल. तरूणांना पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे तरी काळजी घ्यावी. घरातच राहून कंटाळलेल्याना दूर परगावी किंवा नातेवाईकांकडे जाण्याची संधी मिळेल. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धात्मक परिक्षेसाठी तुम्ही करत असलेली मेहनत प्रशंसनीय ठरेल.
मकर :–आज तुमच्या मनातील प्रेमभावना जागे करणार्या घटना घडणार आहेत. कांही कारणांनी मैत्रीमधे झालेल्या मतभेदाचा तुम्हाला मानसिक त्रास होईल तरी शांतपणे विचार करा. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही व्यवहार करू नका. शिक्षक मंडळीना कामाचा बोजा वाढल्याने योग्य नियोजनाची आवश्यकता असल्याचे जाणवेल. पुरूष मंडळीनी सहकार्यांची मदत घेऊन हातातील कामात सोपेपणा आणावा किंवा प्रत्यक्ष मदत घ्यावी. महिलांना महत्वाची वस्तू हरवल्याचे लक्षांत येईल.
कुंभ :–आईवडीलांच्या इच्छेखातर तुम्हाला ठरलेल्या निर्णयात बदल करावा लागेल.पतीपत्नीच्या एकत्र व्यवसायात आलेल्या अडचणींसाठी मार्गदर्शनाची गरज भासेल. महिलांनी आपल्या मोनोपाँजचा विषयी कोणतीही गोष्ट लपवून ठेवू नये डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. घराचे सुशोभिकरण करण्यासाठीचे विचार आता मात्र पक्के होणार आहेत. पाठदुखीचा त्रास असलेल्यांनी त्याकडे दुर्लक्ष न करता डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. वकील मंडळीना हातातील कामात गुंतागुंत वाढल्याचे जाणवेल.
मीन :–नोकरीतून महत्वाच्या कामाकरता परगावी असलेल्या ठिकाणी कांही कामाकरता जावे लागेल. लहान व्यापार्यानी जूने अनुभव लक्षात ठेवूनच पुढील व्यवहार करावेत. कामातील घाई व अविचार कामाचे नुकसान करेल. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात पतीपत्नीमधे एकवाक्यता होईल व पुढील मनस्ताप टळेल महत्वाचा प्रश्र्न चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात मंगल कार्याची सूचना मिळेल. कलाकार मंडळीना अचानक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बोलावले जाईल.
||शुभं-भवतु ||