Read in
शनिवार 20 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 20 नोव्हेंबर चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी अहोरात्र नंतर पण रोहिणी आहे.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज तुमच्या हातून महत्वाची वस्तू फुटेल किंवा बिघडेल. कुटुंबातील नात्यातील तरूण व्यक्तीच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करावी लागेल.
वृषभ :– नोकरीसाठी दैनंदिन प्रवास करत असाल तरी अतिशय सावधानतेने करावा लागेल. कोणतेही काम करताना मनाची एकाग्रता ढळू देऊ नका. कुटुंबातील ज्येष्ठ स्त्री कडून तुम्हाला बक्षिस मिळणार आहे.
मिथुन :–व्यवसायातील अडचणींवर मात करून पुन: नव्याने काम करण्याची इच्छा होईल. स्वत:चा हेका न चालवता जरा इतरांचे पण ऐकण्याची तयारी ठेवा.
कर्क :–नोकरीत सहकारी वर्गाकडून अनपेक्षितपणे चांगली व आवश्यक असलेली मदत मिळेल. महिलांना अध्यात्मिक क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण होऊन त्या मार्गाचा अभ्यास करावासा वाटेल.
सिंह :–नोकरीतील हातातील गुंतागुंतीच्या कामासाठी वरीष्ठांकडून मदतनीस दिला जाईल. कुटुंबात पती पत्नीमधे वेगवेगळ्या विचारांमुळे वाद निर्माण होतील.
कन्या :–व्यवसायातील अडचणींचा उबग येऊन मानसिक ताण येईल. विद्यार्थी त्यांना आलेल्या अडचणींवर त्याच्या कौशल्याने मात करतील.
तूळ :–तरूण वर्गाला सारासार विचार करून मनाला संयम घालावा लागेल. प्रेमसंबंधातील व्यक्तींनी एकमेकातील दुरावा घालवण्याकरता बसून चर्चा करावी व मनमोकळे पणाने बोलावे.
वृश्र्चिक :–कुटुंबातील नात्यात निर्माण झालेल्या अडचणींवर विचाराने मार्ग सापडेल. नोकरीतील आलेल्या अडचणींना व कामाला प्राँब्लेम समजू नका.
धनु :–कुटुंबातील वयोवृद्ध मंडळींची नवीन विचारसरणी पाहून सर्वांना आश्चर्य वाटेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास निष्फळ ठरणार आहे.
मकर :–विद्यार्थ्यांना त्यांच्या रखडलेल्या शिक्षणाच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळेल व पुन: शिक्षण सुरू करण्याची संधी मिळेल. नोकरीत सहकार्यांच्या दुटप्पी वागण्यावर विश्वास ठेवू नका.
कुंभ :–कष्टाळूपणाने व चिकाटीने केलेल्या कामातून चांगले यश मिळेल. व्यवसायातील नवनवीन योजना राबवल्यामुळे बिघडलेली घडी मार्गावर येत असल्याचे जाणवेल.
मीन :–बोद्धीक कुवत चांगली असलेल्यांनी आपल्या महत्वाकांक्षेसमोर कोणताीही अडचण येऊ देऊ नये. नोकरीच्या ठिकाणी अचानक खळबळ उडवणार्या घटना घडतील.
|| शुभं-भवतु ||