Read in
शुक्रवार 19 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 19 नोव्हेंबर चंद्ररास मेष 08:12 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र कृतिका 28:28 पर्यंत व नंतर रोहिणी.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
कार्तिकस्नान समाप्ती. तुलसीविवाह समाप्ती. गुरूनानक जयंती.
मेष :–धार्मिक व्यक्तींच्या सहवासात आल्यामुळे त्याच्या होणार्या चर्चेत तुमचा सहभाग महत्वाचा ठरेल. नोकरीतील व व्यवसायातील वातावरण आनंदाचे व उत्साहाचे राहणार आहे.
वृषभ :–आज तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील कामाच्या पद्धतीबद्दल मान सन्मान मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या अडचणींकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल.
मिथुन :–सामाजिक कार्यामधील जबाबदारीचे ओझे पेलता येत नसेल तर त्वरीत निर्णय घेऊन ठरवा. खरेदी विक्रीच्या व्यवहारात अविचाराने आर्थिक व्यवहार करू नका.
कर्क :–घरगुती समारंभाबाबतच्या चर्चा वेगळेच वादाचे रूप घेतील. सामाजिक कार्यक्षेत्रात काम करणार्याच्या पतप्रतिष्ठेत वाढ होईल. तुमच्या प्रेमविवाहाच्या गोष्टीना घरातून संमती मिळेल.
सिंह :–सरकारी अडकलेली कामे मार्गी लागण्यासाठी येत्या दोन दिवसात प्रयत्न करा. भागीदारीतील व्यवसायात अचानक वृद्धी होणारे प्रसंग येतील.
कन्या :–वैवाहिक जीवनात वादग्रस्त विषय संपत आल्याचे जाणवेल. स्वत:ची कामे करताना येणार्या अडचणींवर स्वत:च निर्णय घ्या, इतरांवर अवलंबून राहू नका.
तूळ :–व्यवसायात भागीदार घेण्याचा विचार करत असाल तर हा निर्णय तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रमामुळे त्यांना ो स्वत:ची क्षमता दाखवता येणार आहे.
वृश्र्चिक :–आजचा ठरलेला प्रवास निव्वळ मनोरंजनासाठी असणार आहे हे लक्षात घ्या. नोकरीत वरिष्ठांबरोबरचे मतभेदांमुळे वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.
धनु :–आर्थिक व्यवहार करताना अनवधानाने जोखीम घ्याल. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आनंदाकरीता त्यांच्या आवडीच्या गोष्टींची निवड कराल.
मकर :– पर्यटन विभागात काम करणार्या नोकरदार व्यक्तींना अचानक लाभदायक घटना घडतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य मार्ग सापडेल.
कुंभ :–आज अचानक प्रवासाचा योग आहे. योग्य खर्चाचे नियोजन करूनच खरेदीला बाहेर पडा. नोकरीत कामकाज करताना नियमांच्या अडचणी येण्याची शक्यता आहे.
मीन :–भागीदारीतील व्यवसायात भगिदारामुळे एकदम प्रतिष्ठेत वाढ होईल. तरूणांच्या व्यक्तीमत्वात एकदम करारीपणात येईल व व्यक्तीमत्वातील प्रभावीपणा वाढेल.
||शुभं-भवतु ||