Read in
गुरूवार 18 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 18 नोव्हेंबर चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र भरणी 25 :28 पर्यंत व नंतर कृतिका.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
वैकुंठ चतुर्दशी. आवळी पूजन व भोजन, त्रिपुरारि पौर्णिमा.
आज वैकुंठ चतुर्दशीचा उपवासाचा दिवस आहे. मध्यरात्री विष्णुपूजन व अरूणोदयी शिवपूजन करण्याचा दिवस आहे.
मेष :–मनातील इच्छांना मूर्त स्वरूप देण्यासाठीचे तुमचे सुरू असलेले प्रयत्न मार्गी लागत असल्याचे जाणवेल. विद्यार्थ्यांना नवीन प्रोजेक्टमधे रस निर्माण होईल.
वृषभ :–हातातील प्रोजेक्टवर काम करणार्या नोकरदार व्यक्तींना कामाचा उबग येईल. सामाजिक कार्यकर्त्याना आपल्यावर असलेल्या जबाबदार्यांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
मिथुन :– नोकरीच्या ठिकाणी नव्याने होत असलेल्या घडामोडीतून तुम्हाला काम करण्याची अग्रक्रमाने संधी देण्यात येईल. कुटुंबातील सर्वात लहान व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
कर्क :–राजकिय क्षेत्रातील मंडळीनी फुशारकीने आपले व्यवहार चव्हाट्यावर मांडू नयेत. खर्चावर बंधन घालावे लागेल. दुसर्यांकडून प्रेमाने कामे करून घ्याल.
सिंह :–नोकरीत पदाधिकार्यांमधे एकमेकात मतभेद होऊन वाद निर्माण होतील. व्यावहारिक पातळीवर अतिशय उत्कृष्टपणे वागाल व इतरांकडून शाबासकी मिळवाल.
कन्या :–मनाविरुद्ध घडणार्या घटनांना फारसे महत्व न दिल्यास आजचा दिवस समाधानात जाईल. कलाकार मंडळीना अचानक नैराश्याची भावना निर्माण होईल.
तूळ :–हातातील कामात गुंतागुंत वाढल्यामुळे मानसिक ताण वाढेल. व्यावसायिकांना मागील उधारी वसूल होणार असल्याची चिन्हे दिसतील.
वृश्र्चिक :– चालताना अचानक तोल जाऊन पडण्याचा धोका आहे तरी काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीनी स्वत:च्या मनावर नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करावा.
धनु :–कलाकारांना आपल्या कलांचे, कलाकृतींचे कौतुक होत असल्याचे जाणवेल. तरूण – तरूणींना आपल्या मनातील कलेच्या क्षेत्रातील इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळेल.
मकर :–नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरी बाबतची माहिती घरबसल्या मिळणार आहे. लहानशा घरगुती उद्योग करणार्यांना आपले क्लायंटस् वाढत असल्याचे कळेल.
कुंभ :–वृद्धांचा पायदुखीचा त्रास अचानक कमी होऊ लागल्याचे जाणवेल. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा व मौजमजा करण्याचा आहे.
मीन :–नोकरी व्यवसायातही आज वातावरण आनंदाचे व समाधानाचे राहील. जुगारासारख्या व्यवहारात आज मोठे नुकसान होईल. महिलांना आपल्या आवडत्या छंदाबाबत अभ्यास वाढवता येणार आहे.
||शुभं-भवतु ||