Read in
बुधवार 17 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 17 नोव्हेंबर चंद्ररास मेष दिवसरात्र. . चंद्र नक्षत्र अश्र्विनी 22:42 पर्यंत व नंतर भरणी.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज वैकुंठ चतुर्दशीचा उपवासाचा दिवस आहे. मध्यरात्री विष्णुपूजन व अरूणोदयी शिवपूजन करण्याचा दिवस आहे.
मेष :–स्थलांतराची संधी मिळणार आहे. पण जबरदस्तीने व तुमच्या मनात नसेल तर ते तुम्ही टाळू शकता. व्यवसायात, नोकरीत कांही प्रमाणात मानसिक गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल.
वृषभ :–वैयक्तिक ताकदीच्या जोरावर अवघडातील अवघड कामही करून दाखवाल. तुमच्या सेवावृत्तीला मानसिक बळ मिळाल्यामुळे सर्वांपेक्षा पुढे जाता येणार आहे.
मिथुन :–वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नका व वेगावर ही नियंत्रण ठेवा. तुमचा तुमच्या स्वत:वरचा विश्वासच संकटातून तारून नेईल. तुम्हाला तुमची भूमिका स्पष्ट करावी लागेल.
कर्क :–कायदेशीर कागदपत्रे बारकाईने वाचल्याशिवाय त्यावर सही करू नका. आर्थिक व्यवहारातील पारदर्शकपणा तुम्हाला दोषारोपातून मुक्त करेल.
सिंह :– विवाहाच्या संदर्भातील रेंगाळलेले काम वडील भावंडाच्या मदतीने मार्गी लागेल. उगाच तुमचा इगो आड आणू नका. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
कन्या :–नोकरीत किंवा कुटुंबातही दुसर्यांच्या कामात हस्तक्षेप करू नका. सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी तारेवरची ख रथ करावी लागेल.
तूळ :– नोकरीत सहकार्यांच्या मदतीने रेंगाळलेल्या कामाला मार्गी लावाल. राजकीय क्षेत्रातील मंडळीना अचानक आपली प्रतिष्ठा वाढत असल्याचे जाणवेल.
वृश्र्चिक :–विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक गोष्टीत भाग घेतल्यास नक्कीच विजयी होणार आहात हे लक्षांत ठेवा. लोक आपल्याविषयी काय विचार करतात याचा विचार करावा लागेल.
धनु :–आईवडीलांनी मुलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्यास मुलांच्या मानसिक शक्तीमधे चांगली वाढ होईल. स्वत:च्या जीवावर जे शक्य आहे तेवढेच काम करा.
मकर :–नोकरीत सहकार्यांबरोबरील संघर्ष जेवढा टाळता येईल तेवढा टाळा. जेवढे आर्थिक परिस्थितीबाबत उदासीन रहाल तेवढी मानसिक शांती मिळेल.
कुंभ :–इतरांच्या मताना होकार देताना विचार करूनच मगच होकार द्या. अनोळखी तसेच अपरिचीत व्यक्तींच्या बोलण्यावर फार विश्वास ठेवू नका. कोणत्याही प्रकारचा ताणतणाव ओढवून घेऊ नका.
मीन :–निस्वार्थी मनाने केलेला आर्थिक व्यवहार तुमची प्रतिष्ठा वाढवेल. इतरांच्या मनात प्रेरणा जागवाल. प्रथम संततीकडून आनंदाची बातमी ऐकावयास मिळेल.
||शुभं-भवतु ||