Read in
सोमवार 15 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 15 नोव्हेंबर चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 18:08 पर्यंत व नंतर रेवती
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज भागवत एकादशी, चातुर्मास समाप्ती, तुलसीविवाहारंभ.
मेष :– आजचा दिवस अतिशय त्रासाचा व दगदगीचा राहणार आहे. औषधांच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागू नका व इतरांच्या सल्ल्याने कोणताही निर्णय घेऊ नका.
वृषभ. :–मित्राना भेटण्यासाठी मुद्धामहून प्रवास करावा लागेल. आजचा वेळ मनोरंजनात व आनंदात जाणार आहे. नोकरीतील प्रमोशनच्या बाबतीत तुम्हालाच अग्रक्रमाने महत्व दिले जाणार असल्याचे कळेल.
मिथुन :–व्यवसायातील प्रत्यक्ष कामापेक्षा नियोजनावर आज जास्त भर राहणार आहे. आईवडीलांच्या सल्ल्याने घेतलेला निर्णय फायदेशीर असल्याचे जाणवेल.
कर्क :– लहान मुलांच्या पायाला दुखापत होण्याची शक्यता आहे. भागिदारीच्या व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्याची गरज निर्माण होईल.
सिंह :– कुटुंबातील मोठ्यांच्या गरजा भागवण्यासाठी यातायात करावी लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना नव्या प्रकरणाला तोंड द्यावे लागेल.
कन्या :–परगावी असलेल्या मुलांकडून क्षेम कळल्यामुळे मानसिक शांतता वाटेल. तरूणांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. भविष्यकाळातील कामाचे नियोजन वेळीच करा.
तूळ :–जमिनीच्या बाबतीतील व्यवहार चौकशी न करताना आंधळेपणाने करू नका. सरकारी कागदावर न वाचता व माहिती न घेता सही करू नये.
वृश्र्चिक :–मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल संसर्गजन्य आजारापासून सावध रहा. गर्भवती महिलांनी शारिरीक कष्ट करताना विचारानेच करावेत.
धनु :– मित्रमैत्रिणींच्या मदतीने महत्वाच्या विषयावर चर्चा करून समुपदेशन कराल. नोकरीमध्ये हातातील कामात झालेला गुंता सोडवताना नवीन गुप्त गोष्टीचा सुगावा लागेल.
मकर :–वडीलांना नोकरीतून निवृत्ती घेण्याची तीव्र इच्छा होईल. मनातील अनुत्तरीत प्रश्र्नांना प्राधान्य दिल्यास योग्य मार्ग सापडेल. सकारात्मक विचाराने चर्चा करा.
कुंभ :– बँकेकडे मागितलेल्या कर्जासाठी पुन: बँक अधिकार्यांची भेट घ्या. राहत्या घराच्या जागेत बदल करायचा असेल आज निर्णय घेऊ नका. फुलांच्या मार्केटला अचानक तेजी येईल.
मीन :–घरगुती खाऊच्या उद्योगातून चांगली प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर नियंत्रण ठेवावे उगाच दुसर्यांच्या विचाराने दृष्टीकोन बदलू नये.
||शुभं-भवतु ||