weekly-horoscope-2020

रविवार 14 नोव्हेंबर 2021 ते शनिवार 20 नोव्हेंबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

Read in

रविवार 14 नोव्हेंबर 2021 ते शनिवार 20 नोव्हेंबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक
राशी भविष्य

रविवार 14 चंद्ररास कुंभ 10:10 पर्यंत व नंतर मीन.

weekly-horoscope-2020

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे

चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा
16:30 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा. सोमवार 15 चंद्ररास मीन दिवसरात्र व
चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 18:08 पर्यंत व नंतर रेवती. मंगळवार 16 चंद्ररास
मीन 20:13 पर्यंत व नंतर मेष. चंद्र नक्षत्र रेवती 20:13 पर्यंत व नंतर
अश्र्विनी. बुधवार 17 चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 22:42
पर्यंत व नंतर भरणी. गुरूवार 18 चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र भरणी
25:28 पर्यंत व नंतर कृतिका. शुक्रवार 19 चंद्ररास मेष 08:12 पर्यंत व नंतर
वृषभ. चंद्रनक्षत्र कृतिका 28:28 पर्यंत व नंतर रोहिणी. शनिवार 20 चंद्ररास
वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी अहोरात्र नंतरही रोहिणी नक्षत्र आहे.
रविवार 14 प्रबोधिनी स्मार्त एकादशी, विष्णुप्रबोधोत्सव.
सोमवार 15 भागवत एकादशी, तुलसीविवाहारंभ, चातुर्मास समाप्ती.
मंगळवार 16 भौमप्रदोष
बुधवार 17 वैकुंठ चतुर्दशीचा उपवास. मध्यरात्री विष्णुपूजन व ् रूणोदयी
शिवपूजन.
गुरूवार 18 वैकुंठ चतुर्दशी, आवळी पूजन व भोजन, त्रिपुरारि पौर्णिमा.
शुक्रवार 19 कार्तिक स्नान समाप्ती, तुलसीविवाह समाप्ती, श्री गुरूनानक
जयंती.

मेष :–हा सप्ताह तुमच्या मित्रमंडळींबरोबर पार्टी, मौजमजा करण्यात जाणार
आहे. पतीपत्नीमधे क्षणांत सरळ तर क्षणांत वाकडे असे प्रसंग वारंवार येणार
आहेत. खेळाडूना आपल्या खेळाशिवाय दुसरे तिसरे कांहीही सुचणार नाही.
कुटुंबातील प्रत्येक व्यवहाराची चर्चा काका व आत्या यांच्याबरोबर
झाल्याशिवाय पुढे जात नाहीय याचा प्रत्यय येईल. तरूणाना अचानक
आर्थिक प्राप्ती होईल.

वृषभ :– व्यवसाय. उद्योगातील अडकलेल्या कामांना भरपूर वेळ दिल्यास
ती कामे मार्गी लागतील. पूर्वनियोजित कार्यक्रमात अचानक बदल करावा
लागणार आहे. नोकरीच्या कामाबरोबर इतर कशालाही प्राधान्य न देता
फक्त दिलेलेच काम करा. सध्या काय महत्वाचे आहे याचा सारासार विचार
करून ठरवा. उधार उसने व्यवहार अडचणीत आणणारे ठरतील. लहान
मुलांच्या नादाने प्रवास घडेल.

मिथुन :–तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीमुळे या सप्ताहात वरिष्ठांकडून
जाब विचारण्याच्या घटना घडणार आहेत. न्यायालयातील कर्मचारी वर्गाला
आपल्या कामात अतिशय चोख रहावे लागेल. अन्यथा तुम्हाला अडचणीत
सापडण्याची धोके आहेत. उच्चशिक्षणासाठी बाहेर जाणार्यानी आता आपली
मानसिक तयारी करावी. तरूणांची जनमानसातील प्रतिमा खराब होणार
नाही याची खबरदारी घ्यावी. अंत:स्फूर्तीने केलेल्या उपासनेतून मानसिक
समाधान मिळेल.

कर्क :–नोकरीतील जबाबदारी बरोबरच कांही गोपनिय माहितीबाबतची
जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. गुप्तहेर खाते, गुप्त पोलिस खाते
तसेच गुप्त संघटना येथील कर्मचार्‍यांना मोठ्या चौकशीला सामोरे जावे
लागेल. या सप्ताहात तुम्हाला स्वत:ला फसवले जाण्याचा योग आहे. त्यामुळे
कोणत्याही व्यवहारात हात घालण्यापूर्वी पूर्ण खात्री करूनच घ्या. पूर्वी
झालेल्या नुकसानीची भरपाईची सप्ताहात ही वाट बघावी लागेल.

सिंह :–निवृत्त कर्मचार्‍यांना मिळणारे प्राँव्हीडंट फंडचे पैसे आता लवकरच
मिळणार असल्याचे कळेल. दत्तक संततीकडून आनंदाची बातमी मिळेल व
तुमचे क्रेडीट वाढेल. महिलांना सासरकडून व पुरूषांना सासुरवाडीकडून
अचानक धनलाभाचा योग आहे. वेदनादायी आजार असलेल्यांना या
सप्ताहात बराच फरक पडणार आहे. इंजिनिअरींगच्या क्षेत्रातील
कर्मचार्‍यांना विशेष प्रशस्ती मिळेल व त्यांचे प्रेस्टीजही वाढणार आहे.

कन्या :–हेल्थ संबंधित सर्व क्षेत्रातील कर्मचार्‍यांना मान सन्मान मिळेल व
एखादे चांगले पाकीटही मिळेल. संशोधन संस्थेत काम करणार्यांना आपली
अतरीक उर्जा वाढल्याचे जाणवेल. लहान मुलांना पडण्या धडपडण्यापासून
सांभाळणे अवघड जाणार आहे. नोकरीतील प्रमोशनच्या बाबतीत सध्या
तुम्ही तुमचे विचार किंवा मतही व्यक्त करू नका. प्रसुतीचा कालावधी जवळ
आलेल्या स्रियांची प्रसुती अगदी सहजपणे होणार आहे.

तूळ :–विवाहाचे वेध लागलेल्या तरूण तरूणींना चांगली संधी येऊनही अती
लोभापायी व महत्वाकांक्षेपायी संधीचा विचार करता येणार नाही.

प्रेमविवाहाच्या बाबतीत आईवडील सकारात्मक विचार करत असल्याचा
अनुभव येईल. व्यवसायातील अडचणींतून मार्ग काढण्यासाठी प्राँपर त्याच
विषयाच्या तज्ञांचा सल्ला घ्या. कामगार संघटना व व्यापारी संस्थेत काम
करणार्या पदाधिकार्यांना गटबाजीचा त्रास होईल.

वृश्र्चिक :–कुटुंबात मातुल घराकडील पाहुण्यांचे आगमन होईल. तरूणांनी
आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केल्यास प्रकृतीतील बिघाड
लवकर दुरूस्त होईल. घर आणि शेती याच मानसिकतेत अडकलेल्यांना या
सप्ताहात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. महिलांनी घरातील
धान्याबाबत तपासणी करावी अचानक मोठ्या प्रमाणात वाया जाण्याचा
धोका आहे. लहान बहिणीच्या नावावर एखादे धाडस नोंदवले जाईल.

धनु :–आईवडीलांना संततीकडून खूप मोठा आनंद देणार्‍या घटना घडतील.
चित्रपट व सिनेमा या क्षेत्रातील समिक्षकांना जाहीर बोलण्याची संधी
मिळणार आहे. भागिदारीतील व्यवसायात नवीन भांडवलाची आवश्यकता
निर्माण होईल. ज्यांचा या सप्ताहात वाढदिवस आहे अशांना त्यांची आवडती
वस्तू भेटीखातर मिळणार आहे. परगावी जाण्याचा बेत तुमच्याकडूनच रद्ध
केला जाईल.

मकर :–डिझायनिंग, ग्राफिक्स व कलाकुसरीच्या कामातील तुमची प्रगती व
काम उल्लेखनिय राहील व सर्वांकडून कौतुक होईल. परगावी असलेल्या
मुलानातवंडाना घराची ओढ लागेल. तुमच्या मनातील आनंदाच्या गोष्टी
तुम्हाला इतरांना कधी सांगतो याची घाई होईल. गर्भवती स्त्रीयांना या

सप्ताहात भरपूर फ्रेश वाटू लागेल. शाळकरी मुलांना अचानक आपली
आकलन शक्ती चांगली वाढल्याचे जाणवेल.

कुंभ :–उपासना , मंत्र उपासना करणार्या साधकांना हा सप्ताह अतिशय
चांगला आहे. तपश्चर्या व जप साधना करणार्यांनी आपल्या अनुभवांचे
भांडवल करू नये. चेष्टा करवून घेऊ नये. पतीपत्नीमधे ज्या विचारावर
मतभेद होते त्याच विचारावर एकमत होणार आहे. वडिलांकडील कुटुंबातून
आलेल्या आनंदाच्या निरोपाने कुटुंबातील वातावरण आनंदी राहील व भेटीची
ओढ वाढेल. आजारी उद्योगांविषयी खूपच चिंता निर्माण होईल.

मीन :–चित्रे, पेंटींग्ज, अँनिमेशनची आवड असलेल्यांना आपल्या कलेचे
प्रदर्शन करता येणार आहे. मुलांनी आत्मविश्वास वाढवल्यास कांहीही
काळजी करावी लागणार नाही. महिलांनी केलेली कलाकुसरीची व घराला
सुशोभीत करणार्या वस्तूंची निर्मीती पाहणार्‍याला मोहित करेल व
त्यातूनच व्यवसायाची कल्पना वाढेल. पेये, सरबते यांचा व्यवसाय
अचानक जोर धरेल. फँशनेबल कपड्यांच्या घरगुती उद्योगात चांगली
आवक होईल.

|| शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *