Read in
शनिवार 13 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 13 नोव्हेंबर चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 15:23 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील राशी व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–संशोधनात्मक कार्य करणार्यांना आजचा दिवस अतिशय महत्वाचा ठरेल. प्रत्येक गोष्ट आज विचार करून बुद्धी वापरूनच करा अंदाजावर करू नका.
वृषभ :–स्थिर बुद्धीने विचार केल्यास आज अवघडात अवघड कामही सोपे वाटेल. चामड्याच्या व्यवसायात आज अचानक मागणी वाढेल. महिलांच्या धार्मिक वृत्तीत वाढ होईल.
मिथुन :–देवघराची स्वच्छता करताना हरवलेली सोन्याची मौल्यवान वस्तू सापडेल. मिठाईच्या, सरबतांच्या व्यवसायाला मागणी वाढेल. महिलांच्या घरगुती उद्धोगाची चांगली वाढ होत असल्याचे जाणवेल.
कर्क :–महिलांना कंबरदुखीचा त्रास प्रचंड जाणवेल. घरातील कामकाजाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाईल. ज्येष्ठांच्या रागाचा पारा चढणार आहे.
सिंह :–उष्ण व कफ प्रवृत्तीच्या व्यक्तीना आज त्रास होणार आहे. वडिलांकडील कुटुंबातून काळजी लावणारा निरोप आल्याने मानसिक चिंता वाढेल.
कन्या :–आज तुमच्या विचारात एकवाक्यता येणार नसल्याने कोणत्याच बाबतीत निर्णयापर्यंत येऊ नका. स्त्रीयांच्या दयाळूपणा व हळवेपणा यात फारच वाढ होईल.
तूळ :–तुमच्या उत्तम सौंदर्य दृष्टीमुळे तुमच्या व्यक्तीमत्वाचे कौतुक होईल. व्यावहारिक पातळीवरील तुमची निवड पाहून तुमचे कौतुक होईल.
वृश्र्चिक :–कलाकौशल्याची कामे करणार्यांना भरपूर मेहनत करावी लागणार आहे. नोकरीच्या ठीकाणी कामात अचानक आलेल्या अडचणीला सामोरे जाताना आलेले अनुभवांचा विचार करावा लागेल.
धनु :–स्वावलंबनाने हातातील कामात कोणाचीही मदत न घेता काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. बर्याच दिवसापासून पाहिजे असलेली वस्तू दिसल्यावर फार उतावीळ होऊ नका.
मकर :–राजकीय मंडळींच्या चळवळी वृत्तीत वाढ होईल. गायक, वादक मंडळीना मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी मिळणार आहे तरी त्याचा फायदा घ्या.
कुंभ :–घरगुती कपड्याच्या शिलाईचे काम, विक्रीचा व्यवसाय यातील उधारी न मागता वसूल होणार आहे. कष्टाबरोबर उत्पन्नातही समाधानकारक वाढ होईल.
मीन :–औषधी क्षेत्रातील मंडळीना, अधिकार्यांना काटेकोर नियमांचे पालन न केल्याने दंड भरावा लागेल. विवाहाच्या बाबतीत अतिशय जागरूकपणे विचार करूनच निर्णय घ्या.
||शुभं-भवतु ||