daily horoscope

शुक्रवार 12 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 12  नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 12  नोव्हेंबर चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 14:52 पर्यंत व नंतर शततारका.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील राशी व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज कुष्मांड नवमी, युगादी आहे.

मेष :–मूर्तिकार, शिल्पकार  यांच्या कामास मोठ्या प्रमाणात मागणी येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या कतृत्वाचे कौतुक होऊन मोठी प्रसिद्धीही मिळेल.

 

वृषभ :–औद्योगिक क्षेत्रात काम करणार्यांना मोठ्या कामाच्या आँर्डर्स मिळतील. व्यवसाय क्षेत्रात  मोठ्या उलाढालीचे स्वप्न पाहू नका तूर्तास तरी नको.

 

मिथुन. :– जवळच्याच मित्रमंडळींकडून व्यवहारात गडबड केली जाईल तरी आज कोणाशीही व्यवहार करू नका. महिलांच्या संशयी वृत्तीत वाढ होईल.

 

कर्क :–तुम्हाला आज आपली ताकद व हिंमत दाखवण्याचा मोह होईल. राजकीय मंडळी तर आज जराही मागे  हटणार नाहीत. ब्रोकर्सना मोठा फायदा होईल.

 

सिंह :–धान्याच्या व कांदा बटाट्याच्या व्यापारांना मुबलक नफा होईल. महिलांना आपल्या आवडत्या छंदाबाबत अभ्यास वाढवण्याची संधी मिळेल.

 

कन्या :–अचानक एखाद्या विषारी किड्याकडून दंश होईल तरी अंधार, अडगळ व झाडे यापासून सांभाळून रहा. महिलांना पाळीचा फारच त्रास होणार आहे.

 

तूळ :–हातातील कामामधे कष्टांचा विचार न करता कामात सातत्य ठेवाल.तुमच्याकडून  हजरजबाबीपणा व विलक्षण बुद्धीमत्तेचा इतरांना अनुभव येईल.

 

वृश्र्चिक :–आज तुम्हाला अतिशय जपून बोलावे लागेल. बोलण्यात खोचकपणा  किंवा फटकळपणा अजिबात येऊ देउ नका. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात इतरांच्या मताला कींमत द्या.

 

धनु :–आज स्वत:बाबत अती आत्मविश्वास निर्माण होऊन अधिकाराची लालसा उत्पन्न होईल. सर्वच गोष्टीत तोलून मापून रहावे लागेल. विचारात बदल करून घाईने  निर्णय घेऊ नका.

 

मकर :–खाण्यापिण्याच्या उद्योगातून नवीन पोटधंदा करता येणार असल्याचे जाणवेल. व्यवसायात गरजेनुसार नव्याने आज भांडवलाचा विचार करायला हरकत नाही.

 

कुंभ :–नैसर्गिक वस्तूंच्या व्यापारातून अचानक मोठा धनलाभ होईल. फिरते एजंट किंवा विक्रेते यांना मालाच्या मागणीचा अंदाज येईल.  इतरांच्या चुका नजरेत येथील पण व्यक्त होऊ  नका.

 

मीन :–एकाच वेळी हातात अनेक कामे घेऊ नका. तरूणांनी आज आपल्या चिडचिडेपणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करावा.  नोकरीत मिटींगमधे बौद्धिक वाद निर्माण होईल. 

 

||शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *