daily horoscope

बुधवार 10 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 10 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार  10 नोव्हेंबर चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तराषाढा 15:41 पर्यंत व नंतर श्रवण.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील राशीचा दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

मेष :–राजकीय क्षेत्रातील मंडळीना न पटलेल्या गोष्टीना कडाडून विरोध करण्यासाठी तुमचे मन बंड करून उठेल. आज दुसर्यांवर अधिकार गाजवण्याची  तीव्र इच्छा निर्माण होईल.

 

वृषभ :– कायद्याचे शिक्षण घेतलेल्यांना दुसर्यांच्या कायदेशीर बाबीत मदतीला  धावून जावे लागेल. मनातील विचार मोकळेपणाने व्यक्त करण्याची संधी मिळेल.

 

मिथुन :–सरकारी खात्यातील अधिकारी वर्गास कधी एकदा अधिकार गाजवतो  असे होईल. स्वत:च्या दु:खाबाबत  मात्र मन फारच हळवे होईल.

 

कर्क :–तुमचे व्यवस्थित व मुद्धेसुद भाषण ऐकून श्रोते एकदम खूष होतील. आज तुमच्या अंगात चैतन्य सळसळून जागृत होईल. लहान मुलांच्या  हट्टीपणात वाढ होईल.

 

सिंह :–आज तुमच्या वागण्यात व बोलण्यात बरीच तफावत येईल. व्यावसायिक क्षेत्रातील प्रगतीसाठी ठरवलेला निर्णय घेताना पुन:  मन दोलायमान होईल.

 

कन्या :– मंत्रालय किंवा शासकीय खात्यात काम करणार्यांना अतिशय विचारपूर्वक काम करावे लागेल. आजूबाजूलाच असलेल्यांकडून कडवा विरोध किंवा विरोधी भूमिका घेतली जाईल.

 

तूळ :–तुमच्या मनात तुम्ही केलेल्या ठाम निश्चयाला कोणीही विरोध करू शकणार नाही. कुटुंबात आईचा वरदहस्त लाभेल व कामाला गती येईल.

 

वृश्र्चिक :–आज तुम्हाला तुमचे काम काढून घेण्यासाठी अतिशय गोड बोलावे लागेल. उत्तम बुद्धिमत्तेचा आज तुम्ही म्हणजे आदर्श नमुना ठराल. लहान मुलांचा अवखळपणा वाढेल.

 

धनु :–आज तुमच्या आवडीच्या गोष्टी घडल्यामुळे मनाला एकदम आनंद मिळेल. नियोजनबद्ध काम  केल्यामुळे कामात यशाचा टप्पा  लवकरच गाठता येणार आहे.

 

मकर :–तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती विषयी तुम्हाला उगाचच शंका निर्माण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने घरातील महत्वाचे प्रश्र्न सोडवता येतील.

 

कुंभ :–जवळच्या मित्राकडून झालेल्या चुकीबद्दल तुमच्याकडून त्याला माफ करावे  लागेल. आलेल्या परिस्थितीत अचानक मन भावनावश होऊन मानसिक क्लेश होतील.

 

मीन :– आँटोमोबाइल क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या नव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपल्या हुषारीची व कामातील चिकाटीपणाची चुणूक दाखवता येणार आहे.

 

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *