Read in
मंगळवार 09 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 09 नोव्हेंबर चंद्ररास धनु 22:26 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 16:59 पर्यंत व नंतर उत्तरा षाढा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज पांडव पंचमी आहे.
मेष :– मनामधे अचानक येणार्या विचारांना अवरोध करणे जमणार नाही तरीपण त्यांच्या आहारी जाऊ नका. व्यावहारिक पातळीवर बोलताना अविचाराने बोलू नका.
वृषभ :–तुमचे म्हणणे ऐकून न घेता इतरांकडून तुमच्यावर विचार लादले जातील. नोकरीतील कायदेशीर बाबींची जबाबदारी तुम्हाला स्विकारावी लागणार आहे.
मिथुन :–अपरिचित व्यक्तींच्या बोलण्यावर विश्र्वास ठेवून कोणताही निर्णय घेऊ नका. डाँक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी पटल्या नसल्या तरी त्या काटेकोरपणे पाळा.
कर्क :–मनमोकळेपणाने नवीन ओळखी करून घेताना मानसिक आनंद मिळेल. आपली क्षमता ओळखूनच पुढील कामाचे नियोजन करा. संपूर्ण सप्ताहाचे नियोजन करताना व्यवहारिक रहावे लागेल.
सिंह :–प्रवासात त्रास होणार असल्यामुळे प्रवासाचा बेत रध्द करावा लागेल. विद्यार्थ्यांनी आपल्या अतीमहत्वाकांक्षेपोटी अविचाराने वागू नका नियोजनात बदल करू नका.
कन्या :–कालपासून सुरू झालेल्या कार्यक्रमातील तुमची हजेरी उल्लेखनीय राहील. आईवडीलांसोबत केलेल्या प्रवासाचे अनुभव अतिशय आल्हाददायक राहतील.
तूळ :–हिशोबीपणाने वागताना नात्यांच्या जबाबदारीला महत्व द्या. व्यवहार करताना जोखमीचा विचार प्रथम करावा लागेल.मित्रमंडळींच्या मदतीने व्यवसायातील नवीन योजना सुरू कराल.
वृश्र्चिक :–प्रकृतीच्या कारणास्तव तुम्हाला दोनचार दिवस आराम करण्याची गरज आहे याचे भान ठेवा. राजकीय क्षेत्रातील मंडळीनी आपण करत असलेल्या कामाव्यतिरीक्त दुसर्यांच्या कामात लक्ष घालू नये.
धनु :– मनातील इच्छा प्रत्यक्षात उतरवण्याकरीता आज तुम्ही कामाला प्राधान्य देणार आहात. न्यायालयातील रेंगाळलेल्या कामासाठी तज्ञांचा सल्ला उपयोगी पडल्याचे जाणवेल.
मकर :–नोकरीतील कोणत्याही कामातील दिरंगाई तुम्हाला त्रासदायक ठरेल. ट्रेडिंग करणार्यांनी सल्ल्याशिवाय नव्याने गुंतवणूक करू नये. लहान मुलांच्या पोटदुखीकडे दुर्लक्ष करू का.
कुंभ :–बर्याच दिवसापासून ठरलेल्या कामाला अचानक झपाटून लागाल. शैक्षणिक संस्थेत काम करणार्यांना नियमांच्या अधिन राहूनच काम करावे लागेल.
मीन :–तुमच्या नेहमीच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल करावा लागेल. पूर्वी केलेल्या कामाचा आजपर्यंत न मिळालेला मोबदला अचानक मिळणार असल्याचे कळेल.
||शुभं-भवतु ||