daily horoscope

सोमवार 08 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 08 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार  08 नोव्हेंबर चंद्ररास. धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 18:48 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

विनायक चतुर्थी

मेष :- कोटुंबिक प्रश्र्नावर निर्णय घेण्याचे काम तुमच्यावर येईल. सेवाभावी संस्थेत काम करणार्यांना मानसिक समाधानाबरोबर सन्मानही मिळेल. आजचा दिवस तुमच्या वर्तुळात तुमचीच चर्चा होईल.

 

वृषभ :–कर्ज देण्या घेण्याच्या व्यवहारातील अडचणींवर तुमच्याकडून उपाय सापडेल. मैत्रीच्या व्यवहारात  पूर्वी दिलेला शब्द फार मोठे काम करून जाईल. मुलीच्या विवाहाची बोलणी पुढे सरकतील.

 

मिथुन :– नको असलेल्या कायदेशीर बंधनातून सुटण्याचा मार्ग सापडेल. व्यापार व व्यवसायातील तुमचे अंदाज खरे ठरतील. महत्वाची वस्तू सांभाळा.

 

कर्क:–उष्णतेचा त्रास होणार्यांनी  फार जागरण करू नये. लहान मुलांना पडण्या धडपडण्यापासून सांभाळावे लागेल. पतीपत्नीमधील मतभेद आज दूर करण्याची संधी मिळेल.

 

सिंह :– शाळा काँलेजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनावर संयम ठेवावा. मित्रमंडळींच्या सहकार्याने मानसिक बळ वाढेल व वातावरण आनंददायक राहील.

 

कन्या :–पोटदुखीचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष न करता इलाज करावा. भाडोत्री कडून तुमचे घर लवकरच तुमच्या ताब्यात मिळणार असल्याचे कळेल. कोर्टकेसच्या बाबतीत दुर्लक्ष करू का.

 

तूळ :–खाजगी संस्थेत तुमच्या विचाराशी व मतांशी इतर सदस्य सहमत असल्याचे सांगतील. नोकरीत वरिष्ठांना दिलेला शब्द पाळल्याने ते खूष होतील.

 

वृश्र्चिक :–द्वितीय संततीकडून मानसिक त्रास संभवतो, तुमचे  म्हणणे त्यांच्यावर लादू नका. पगारातील मोठी रक्कम  इतरांची गरज पुरवण्यात खर्च होईल.

 

धनु :–डिझायनिंग व अँनिमेशनच्या  व्यावसायिकांना मोठी आँर्डर मिळेल. नृत्य व गायन यातील कलाकारांना  नवीन चांगली मनासारखी संधी मिळेल, संधी सोडू नका..

 

मकर :–प्रथम संतती तुमचे  म्हणणे तंतोतंत पाळेल. बँकेतील व्यवहार तुमच्या  कडून पूर्ण होत नसल्याने इतरांची मदत घ्या. नोकरीत न मागता सल्ला देऊ नका.

 

कुंभ :–सरबताचा व्यवसाय करणार्याना नवीन फंडा सापडेल. निवृत्त झालेल्या ज्येष्ठ मंडळींना आज सेवाभावी मार्गदर्शन करण्याची संधी मिळाल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. 

 

मीन :– व्यवसायातील  केलेली तडजोड तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. नोकरीत जे करणार नसाल त्याचा शब्द देऊन अडकू नका. सहकार्‍यांची मदत चांगली मिळेल.

 

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *