Read in
रविवार 07 नोव्हेंबर 2021 ते शनिवार 13 नोव्हेंबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
रविवार 07 वृश्र्चिक 21:04 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 21:04 पर्यंत व नंतर मूळ.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
सोमवार 08 चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 18:48 पर्यंत व नंतर पूर्वा षाढा. मंगळवार 09 चंद्ररास धनु 22:26 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 16:59.बुधवार 10 चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा षाढा 15:41नंतर श्रवण. गुरूवार 11 चंद्ररास मकर 26:50 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र श्रवण 14:58 पर्यंत व नंतर धनिष्ठा. शुक्रवार 12 चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 14:52 पर्यंत व नंतर शततारका. शनिवार 13 चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 15:23 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा.
सोमवार 08 विनायक चतुर्थी.
मंगळवार 09 पांडव पंचमी
गुरूवार 11 गोपाष्टमी, दुर्गाष्टमी.
शुक्रवार 12 कुष्मांड नवमी.
मेष :या सप्ताहात तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रमंडळींचे तुमच्या आयुष्यात असलेले महत्व जाणवेल. तुमच्या प्रतिस्पर्धींकडून तुम्हाला हातमिळवणी करण्याकरीता निरोप येईल. या सप्ताहात तुम्हाला देवाची, पुजा तसेच कुळधर्म करण्याची तीव्र इच्छा होईल. ज्या विद्यार्थ्यांच्या हातून आता वेळ गेली आहे असे वाटतेय त्यांना पुन्हा कांही वेळेची मुदत मिळेल तरी धास्तावून न जाता कामाला लागा. महिलांना मासिक पाळीचा चांगलाच त्रास होणार आहे.
वृषभ :–सध्याच्या तुमच्या सुरू असलेल्या व्यवसायामधे थोडा बदल करण्याची गरज आहे हे समजून घ्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वागल्यास कांहीही गडबड न होता व्यवसाय सुरळीत चालेल. डोके किंवा अर्धशिशीचा त्रास असलेल्यांनी वेळेवर योग्य ती उपाययोजना करावी. तुमच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तुम्हाला फसवले जाईल. पुरूष मंडळीना सासुरवाडीकडून अचावक लाभ होतील.
मिथुन :–भाड्याने दिलेले घर लवकरच तुमच्या ताब्यात येईल. आता फार वाट पहावी लागणार नाही. मोठ्या भावंडांबरोबर झालेल्या चर्चेनुसार पुढील व्यवहार करायला हरकत नाही हे लक्षांत घ्या. तरूणांना साथीच्या रोगाचा त्रास संभवतो. नोकरीत तुमच्या हाताखालील कर्मचार्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. गुप्तशत्रूंवर मात करण्यास हा सप्ताह अतिशय चांगला आहे. मामाकडील घराण्यांकडून महिलांना प्रेमाची भेट मिळेल.
कर्क :–तुमच्या व्यवसायातील भागिदारीबाबत तुम्हाला पुनर्विचार करावा लागेल. कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. प्रवासात झालेली ओळख तुमच्या अडलेल्या कामात मदतीला येणार आहे तरी विचार करा. पुरूषांचा पोटदुखीचा त्रास वाढेल तरी योग्य वेळेत डाँक्टरांचा उपाय करा. शेतकी व्यवसायातील तरूणांना प्रयोगशील कामासाठी कौतुक होऊन आर्थिक मदत मिळेल. रूढी बाह्य विवाहकरणार्यांनी ज्येष्ठांना सत्य पक्स्थितीची कल्प ा द्यावी.
सिंह :-/हाँटेल, खानावळी, लहान दुकाने असलेल्यांनी पूर्ण विचाराने व्यवसाय वृद्धीचा विचार करावा. एकदम भांडवल ओतू नये. कुटुंबातील सर्वानीच सहविचाराने निर्णय घेतल्यास नुकसान होणार नाही. प्रेम विवाहातील अडचणींवर ज्येष्ठांच्या सल्ल्याने मार्ग निघेल. येथे मित्रमंडळींचा सल्ला अडचणी वाढवतील. घरातील वादाची, मतभेदांची चर्चा बाहेर केल्याचा मनस्ताप होईल. फँशन डिझायनिंगच्या क्षेत्रातील मंडळीना अचानक नवीन कामे मिळतील.
कन्या :–स्वयंपाकघरातील कामातून वेळ काढून आज तुमच्या हातून होणार्या कामापासून तुम्हाला तुमच्या भाग्योदयाच्या दिशा सापडतील. शेअर्समधील या सप्ताहात होणारे नुकसान तुम्ही गप्प बसलात तर ते आवाक्यात राहील. स्वत:च्या वाहनाने प्रवास करत असाल तर प्रथम वाहनाची नीट तपासणी करून घ्या. वैद्यकिय क्षेत्रातील मंडळीना नवीन संकटाला तोंड द्यावे लागेल. निद्रानाशाच्या मंडळीनी मनाने औषधे घेऊ नयेत.
तूळ:–नर्सरी, फुलझाडे असलेल्यांना त्यांचे झाडांवर केलेले प्रयोग यशस्वी झाल्याचे कळेल. लहान मुले व वयस्कर मंडळीना त्यांच्या आवडीच्या वस्तू मिळाल्यामुळे त्यांना अतिशय आनंद होणार आहे. वडिलांकडील नात्याची घरी वर्दळ वाढेल व वातावरण आनंददायक राहील. रागीट मंडळीना रागावर नियंत्रण करण्याचा मंत्र सापडेल. संततीकडून झालेल्या उत्कृष्ट कामगिरी बाबत जाहीर कौतुक होईल. राजकीय मंडळीनी आपले मनसुबे, इच्छा इतरांसमोर उघडपणे व्यक्त करू नयेत.
वृश्र्चिक :–हा सप्ताह तुमच्या मनातील खूप दिवसापासूनच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करणारा असणार आहे. महिलांना स्वयंपाकघरातील त्यांच्या कौशल्याबद्धल इतरांकडून खूपच कौतुक होईल. तरूण स्त्रीयांना नटण्या मुरडण्याची हौस भागविता येणार आहे. कुटुंबात सणाच्या निमीत्ताने जमलेल्या नातेवाईकांसमोर पतिराजांकडून मोठे क्रेडिट मिळेल. विद्यार्थ्यांना व तरूणांना आपल्या स्मरणशक्तीची चुणूक इतरांना दाखवता येणार आहे. वयस्कर मंडळींकडून अतिशय मनोरंजक किस्से ऐकायला मिळणार आहेत.
धनु :–न्यायालयातील काम करणार्या पदाधिकार्यांना अचानक कात्रीत सापडत असल्याचे जाणवेल. अध्यात्मिक व ज्योतिषशास्त्र शिकवणार्याना अचानक उत्तम मार्गदर्शकाची भेट होईल. महिलांना सुचक गोष्टींची चाहूल लागेल. या सप्ताहात मंदिराच्या पुजार्याना दिवसभराच्या कामातून एक मिनीटही उसंत मिळणार नाही. विद्यार्थ्यांना या सप्ताहात आळस झटकून काम करावे लागेल. अचानक मनात आले म्हणून मोठी खरेदी कराल.
मकर :–तरूणांना व विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वकष्टार्जित कमाईतून आईवडीलांसाठी त्याच्या आवडीची गोष्ट घेता येणार आहे. महिलांच्या विचारांना व मतांना फार मोठी पसंती मिळून मान्यता मिळेल. कलाकुसरीच्या कामातून चांगला आर्थिक फायदा झाल्याचे लक्षात येईल. नोकरीतील सरकारी कामाची जबाबदारी तुम्हाला स्विकारावी लागणार आहे. लोखंडाशी संबंधित व्यवहार असलेल्यांनी या सप्ताहात व्यवसायातील उधारी वसूल करण्याचे नियोजन करावे.
कुंभ :–डोळ्याचे विकार असलेल्यांनी लवकरात लवकर डोळे तपासून घ्यावेत. मोतीबिंदू, काचबिंदू ची शक्यता आहे. पुरूष मंडळीना आपले पैशाचे पाकीट कोठे ठेवले आहे ते विसरल्यामुळे बरीच शोधाशोध होईल. तुमच्या व्यवसायात जराही जाहिरात न करताही व्यवसाय चांगला चालल्याचे दिसून येईल. गायन व वादनाच्या क्षेत्रातील कलावंतांना मोठी डिमांड मिळून बक्षिसीही मोठी मिळेल. एकंदरीत तुमच्यासाठी हा सप्ताह वेगवेगळे अनुभव देणारा ठरेल.
मीन :–प्रवचन, किर्तन करणार्यांना एखाद्या देवळात करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयावरील आपले विचार श्रोत्यांसमोर व्यक्त करण्याचा मोठा योग येईल. सरकारी शिक्षण क्षेत्रात काम करणार्यांना अचानक त्यांना अंतर्गत बदलाला सामोरे जावे लागेल. अनोळखी ज्येष्ठ व्यक्तीला पितृवत मान देऊन त्यांची आवश्यक ती सोय कराल. स्वेच्छा निवृत्ती घेण्याच्या विचारावर पुन: विचार करणे महत्वाचे ठरेल. निर्णयाची घाई करू नका. कुटुंबात अचानक प्रथम संतती बाबतच्या विवाहाचा प्रश्र्न चर्चेला येईल.
|| शुभं-भवतु ||