Read in
शनिवार 06 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 06 नोव्हेंबर चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 23:38 पर्यंत व नंतर ज्येष्ठा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज यमपूजन, यमद्वितीया, भाऊबीज.
मेष :–निव्वळ ओळखीखातर दुसर्यांच्या कोणत्याही आज भानगडीत पडू नका. मानापमानाच्या कल्पनाना फार महत्व दिल्यास नातेसंबंधात तणाव निर्माण होईल.
वृषभ :– बहिणीच्या विवाहासाठी मोठा खर्च करण्याची तयारी दाखवाल. इतरांच्या मताला होकार देताना विचार केल्याशिवाय निर्णय देऊ नका. स्वत:चा हेका चालवू नका.
मिथुन. :–आपली मर्यादा व क्षमता ओळखूनच कामाची तयारी दाखवा अन्यथा जबाबदारी घेऊ नका. इतरांचे ऐकून स्वत:चे अंदाज ठरवू नका वस्तूस्थितीचा अभ्यास करून ठरवा.
कर्क :–कौटुंबिक वातावरण क्षुल्लक कारणांमुळे बिघडण्याचा धोका आहे. कोणत्याही कागदपत्रावर वाचल्याशिवाय सही करू नका. कुटुंबातील ज्येष्ठांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.
सिंह :–आज कौटुंबिक कार्यक्रमातून तुम्हाला स्वत:साठी जराही वेळ मिळणार नाही. कोणाला किती अंतरावर ठेवायचे याचा आज तुम्हाला अनुभव येईल.
कन्या :–तुमच्या राहत्या जागेचा प्रश्र्न सोडवताना मेटाकुटीला याल. संततीच्या व्यसनाबाबत तुम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल. आर्थिक व्यवहार करताना बेफिकीर राहू नका.
तूळ :–आज तुमच्याकडून सर्वांच्या भरपूर अपेक्षा असणार आहेत. आज तुमचा आनंद वाढवणारे प्रसंग घडतील. कोणासही मदत करताना व्यवहारी रहावे लागेल.
वृश्र्चिक :–वाहनाच्या वेगावर मर्यादा ठेवा. ज्येष्ठांबरोबर चर्चा करताना आपली मर्यादा सांभाळाव्या लागणार आहेत. नोकरीतील तुमच्या सर्व प्रश्र्नांना उत्तरे आहेत हे लक्षात ठेवून वागा.
धनु :–आज तुम्हाला मार्गदर्शनाची गरज लागणार आहे. तुमच्या जबाबदार्या सांभाळूनच कोणतेही धाडस करा. तुमच्या उतावळ्या स्वभावामुळे आज नुकसान होणार आहे.
मकर :–सामाजिक कार्यात आज तुमचा मोठा सहभाग राहणार आहे. असुरक्षिततेची भावना बळावेल मित्रांच्या सहभागाने वेळीच उपाय करा. कोणत्याही व्यक्तीवर क्षुल्लक कारणावरून चिडचिड करू नका.
कुंभ :–तुमचे म्हणणे इतरांवर लादू नका. तुमच्या जीवनातील अडचणींवर उपाय शोधण्यासाठी आज तुमचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही. तरी शांत रहा.
मीन :–आत्मप्रौढी मिरवून स्वत:ची प्रतिष्ठा बिघडवून घ्याल. बँकेकडे मागितलेल्या कर्जाची सोय सहजपणे होणार नाही. कोणत्याही प्रकारची लाँटरी किंवा कोणत्याही शेअर्समध्ये आज पैसे गुंतवू नका.
||शुभं-भवतु ||