दिपावलीच्या शुभेच्छा
||देववाणी ज्योतिषालय परिवाराकडून दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा || नमस्कार मित्रमंडळी,
कालपासून सुरू झालेल्या दिवाळीच्या शुभेच्छा देण्यास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. झगमगाटाचा आनंदाचा व सृष्टीतील अंधार दूर करण्याचा सण.हाच दिवा तुमच्या मनातील अंध:कार तर दूर करेलच पण त्याचबरोबर जीवनातील दु:ख, काळजी, चिंता व लहान मोठी संकटेही दूर करणार आहे याची खात्री बाळगा. पण त्यासाठी महत्वाचे आहे ते म्हणजे तुमच्या अंतरंगातील प्रेरणेला, इच्छेला व महत्त्वाकांक्षेला जागे करण्याची. प्रत्येक दिवस नवा, प्रत्येक आशा नव्या. सूर्यदेवाच्या सोनेरी किरणांनी तुमच्या जीवनात येणारा प्रकाश कोणीही थांबवू शकणार नाही म्हणूनच त्याच्याकडे निरामय आरोग्याची अपेक्षा करूया. चला तर मग आपल्या सर्वांच्या यशाच्या वाटचालीसाठी सज्ज होऊया.
सर्वे भवन्तु सुखिन : |सर्वे सन्तु निरामय : |
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्र्चिद् दु:खभाग्भवेत ||
देववाणी ज्योतिषालय परिवाराकडून दिपावलीच्या शुभेच्छा.
*******************************************************
ReplyForward
|