daily horoscope

शुक्रवार 05 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार 05 नोव्हेंबर  2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 05  नोव्हेंबर चंद्ररास तूळ 21:04 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 26:22 पर्यंत व नंतर अनुराधा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे. 

आज बलिप्रतिपदा  दिपावली पाडवा 

मेष :–आजचा संपूर्ण दिवस  तुमच्या मनात व्यवसाय व्यापाराचे विचार असणार आहेत. त्याचबरोबर कुटुंबातील नातेसंबंध दृढ करण्यासाठी तुमच्याकडून प्रयत्न कराल. 

 

वृषभ :–नोकरीतील घडामोडींवरील चर्चा ज्येष्ठांबरोबर अगदी मोकळेपणाने करा बरेच पेचप्रसंग सुटतील. ज्या आजारपणावर योग्य उपाय इलाज सापडत नाहीय त्याविषयी तज्ञ डाँक्टरांकडे जाण्याचे निश्चित कराल.

 

मिथुन :–करमणुकीच्या क्षेत्रातील कलाकाराना आज नवीन आँफर मिळत असल्याचे कळेल. चित्रकला, हस्तकला व पेंटींग्ज च्या कलावंताना बिझनेस वाढवण्याचा विचार करता येणार आहे. 

 

कर्क :–सरकारी पदाधिकारी असाल तर आज फोनवर बोलतानाही कोणत्याही प्रकारचे गाँसिपींग करू नका. आजचा दिवस मातोश्रींकडून सुखाच्या वर्षावाचा आहे. 

 

सिंह :–सोन्याचे व इतर मौल्यवान दागिने जागच्या जागी ठेवा एखादा दागिना गहाळ होण्याचा धोका आहे. जागा, जमिन यांच्या मोठ्या व्यवहारातील मध्यस्थांना चांगल आर्थिक फायदा होईल. 

 

कन्या :–सार्वजनिक ठिकाणच्या  प्रबोधनाकरीता, मिटींगमधे तुमचे नांव सुचवले जाणार आहे. द्वितीय विवाहाच्या वधुवरांनी आज सकारात्मक विचार केल्यास आनंदाची घटना घडेल. 

 

तूळ :–सतत कुटुंबाचा विचार करताना आज तुमच्या मनात स्वत:बाबतचा विचार येईल.  आजारी मंडळीना आज बरे वाटू लागेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आत्मशक्तीत वाढ होईल. 

 

वृश्र्चिक :–राजकीय क्षेत्रातील मंडळींबाबत आज  उलटसुलट चर्चा निर्माण होणार आहेत. आर्थिक व्यवहारास आजचा दिवस चांगला नाही. फसवणूकी ची मोठी  शक्यता आहे. 

 

धनु :–नात्यातील हरवलेल्या, पळून गेलेल्या व्यक्तींबद्दल  तुम्हाला प्रथम सुगावा लागेल. एकांतवासात गेलेल्यांना परत समाजात मिक्स व्हावेसे वाटेल. 

 

मकर :–सरकारी वरिष्ठ पातळीवरील अधिकार्यांनी आपल्या मनातील विचार किंवा दृष्टीकोन इतरांसमोर उघड करू नयेत. आज व्यवसायाबाबत च्या निर्णय ज्येष्ठांच्या सल्ल्यानेच घ्या. 

 

कुंभ :–आईच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीनी अतिचिकित्सेने हातातील संधी घालवू नये. तरूणांनी वारंवार मनात आलेल्या विचारांवर लक्ष द्यावे, कारण ती सुचना असू शकते. 

 

मीन :–आजचा दिवस तुमच्यासाठी सासुरवाडीकडून लाभ देणारा आहे तरी आवर्जून सासुरवाडीला  भेट द्या. कामगार, दलाल मंडळीना भरपूर बक्षिसी मिळवून देणारा दिवस आहे. 

 

|| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *