लक्ष्मीपूजन विधी

लक्ष्मीपूजन विधी

04 नोव्हेंबर गुरूवारी निज आश्र्विन कृष्ण अमावास्या आहे. अमावास्या गुरूवारी पहाटे  06:03 ला सुरू होत असून ती गुरूवार च्या उत्तररात्री 26:44 ला संपत आहे. बुधवारी दुपारी 02:52 ला प्रिती योगाची सुरूवात होत असून गुरूवारी दुपारी 11:09 पर्यंत आहे व त्यानंतर आयुष्यमान योगाची सुरूवातहोत असून आयुष्यमान योगशुक्रवारी सकाळी 07:11 ला संपत आहे.
प्रथम आपण आश्र्विन अमावास्येला  दिवाळीला लक्ष्मीपूजन कां करतात  ते पाहुया.
श्री विद्ध्यार्णव तंत्रात कालरात्रीला विद्धेचे अंग मानले आहे व याच विद्धेच्या उपासनेमुळे सुखसमृद्धीचे व सौभाग्याची  प्राप्ती होते. शक्तीसंगम  तंत्राच्या कालखंडात अमावास्या अशुभ मानल्या आहेत पण आश्र्विन कृष्ण अमावास्येची रात्र मात्र शुभ व लक्ष्मीची उपासना पूजाअर्चा करून लक्ष्मीप्राप्तीसाठी महत्वाची मानली आहे.
आश्र्विन कार्तिक अमावास्येला सूर्य व चंद्र दोघेही तूळ राशीत असतात. तूळेचा स्वामी शुक्र हा सुख, समृद्धी, धन धान्य सर्वांचाच कारक आहे. रूद्रयामल तंत्रामधे असा उल्लेख आहे कि आश्र्विन कृष्ण अमावास्येच्या रात्री श्री भगवान विष्णु श्रीलक्ष्मीसह संपूर्ण विश्वात भ्रमण करत असतात. म्हणून श्री भगवान विष्णु व श्री लक्ष्मी प्रसन्न होण्याकरीता ही पूजा  केली जाते.ही लक्ष्मी म्हणजेच महालक्ष्मी,  महाकाली व महासरस्वती म्हणूनच या तीनही देवतांची प्रतिके रूपया, पेन पेन्सिल व व्ही किंवा हिशोबाची चोपडी. लक्षांत घ्या नेहमी  वहीच्या तिसर्‍या पानावर || श्री:||असे लिहून मुहूर्त करावयाचा आहे.
या वर्षी लक्ष्मीपूजन गुरूवार 04 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 18:02 ते 20:34 या वेळेत करावयाचे आहे.
ज्याप्रमाणे आपण आपल्या आई वडीलांच्या  वाढदिवसाची तयारी करतो त्याचप्रमाणे या पूजेची जंगी तयारी करावी त्यात मनाची भावना व अंतःकरणातून आलेली ओढ असावी म्हणजे पूजा हा  फक्त उपचार न राहता ते एकप्रकारे पंचप्राणांचे समर्पण होईल.
साहित्य :–पाच मुठी तांदुळ,  ताम्हण, दोन पंचपात्री,, आंब्याचे ढाळे, पांच नाणी, दोन नारळ,, हळद कुंकू, तुळस दुर्वा फुले, निरांजन, कापूर, समई तेलाची. नैवेद्ध म्हणून गुळ खोबरे, दुधसाखर, बत्तासे पोढे.
श्रीलक्ष्मी ची मूर्ती, श्री कुबेराची मूर्ती, तसबीर किंवा आजकाल मिळते ती मुद्रा.
(श्री यंत्र असल्यास अती उत्तम. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या जवळील  दुकानात श्रीयंत्र मिळते. त्यावर तेथील गुरूजी अभिषेक करून श्री महालक्ष्मीच्या पादुकांना लावून देतात. किंवा त्यावर अभिषेक करून देतात. यावेळी श्री यंत्र नसल्यास कार्तिक पौर्णिमेस श्री यंत्राची स्थापना करावी.)
(लक्ष्मीपूजनाचा विधी संस्कृतमधील श्री सुक्तच्या अभिषेकाने व षोडशोपचार पद्धतीने केला जातो. पण आपण येथे भाषेचे बंधन काढून तीच पुजा, पण सहज व सोप्या पद्धतीने करावयाची आहे. गेले महिनाभर मला आलेल्या फोनकाँल्सवरील विनंतीमुळे मी हे तुमच्यासमोर ठेवत आहे. तज्ञांनी यामधील तांत्रिक बाजू सोडून तुमच्या आमच्या भावनांचा विचार करावा  व लक्ष्मीपूजनाचा आनंद घ्यावा. प्रत्येकाला पुजा करता येण्यासाठी  हा माझा अल्पसा प्रयत्न आहे. त्यातील अवडंबर बाजूला करून घरच्या घरी स्वत: मनापासून श्री लक्ष्मीची पूजा करणे महत्वाचे आहे या हेतूने हा प्रयत्न केला आहे. यामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. तरी क्षमस्व:)
सायंकाळच्या दिलेल्या मुहूर्तापूर्वी घराची स्वच्छता करून रांगोळ्या काढाव्यात. फुला पानांची तोरणे दाराला व पूजेच्या ठिकाणी बांधून जागा सुशोभीत करावी. दाराला आंब्याचा डहाळा लावून वातावरण मंगलमय  व शुचिर्भूत करावे.घरामध्ये असलेल्या गणेश, सरस्वती, महाकाली यांच्या प्रतिमा एकत्र टेबलावर उभ्या मांडाव्या, टेबलावर उभ्या मांडता येत नसतील तर जमीनीवर गालीचा घालून भिंतीला टेकवून ठेवाव्यात. पण कोणताही फोटो आडवा ठेवू नये. प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी श्री गणेश, श्रीलक्ष्मी, भगवान श्री विष्णू व श्री कुबेर यांची पूजा करावयाची असा विधी करावयाचा आहे.
स्त्रीयांनी साडी नेसावी, दागिने घालावेत, नट्टापट्टा करावा. पुरूषांनी धोतर नेसावे व अंगावर उपरणे घ्यावे किंवा अंगरखा घालावा. पण शर्ट पँट घालू नये. टाँवेल गुंडाळू नये.
एका चौरंगावर किंवा पाटावर अक्षता चे कमळ म्हणजेच अष्टदल किंवा स्वस्तिक काढावे. त्यावर तांदुळाचे भरलेले ताम्हण ठेवावे. दुसर्या ताम्हणामध्ये या श्रीलक्ष्मी श्री गणेश व श्री कुबेर या मूर्तींना कोमट पाण्याने स्नान घालावे. कोणताही फोटो  पावडर  चिंच, वगैरे लावून स्वच्छ करू नये. दह्याने चोळून चोळून स्वच्छ करावेत. त्यानंतर एकदा पंचामृत( दुध, दही, थेंबभर तूप व मध, नसल्यास गुळ व साखर अशा पांच पदार्थांना पंचामृत म्हणतात.) एकदा कोंमट पाणी  व एकदा चमचाभर पंचामृत अशा पद्धतीने स्नान घालावे. नंतर नवीन वस्त्राने देवतांना कोरडे करून मग त्यांना चौरंगावरील ताम्हणात ठेवावे. म्हणजेच  स्थापना करावी.
प्रथम श्री गणेशाला किंवा गणेशरूपी सुपारीची स्थापना करावी. व माझे हे लक्ष्मीपूजन निर्विघ्नपणे फार पाडण्याची विनंती करावी.
(वक्रतुंड महाकाय  कोटिसूर्यसमप्रभ |निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा||श्री गणपतये नम||
त्यानंतर श्री गणेशाला उदबत्तीने किंवा निरांजनाने ओवाळून गुळ खोबर्याचा नैवेद्य दाखवावा. व गणेशास अक्षता व्हाव्यात.
 नंतर श्री लक्ष्मी व श्री कुबेर यांची ताम्हणात स्थापना करावी. श्रीलक्ष्मी ला  हात  जोडून प्रार्थना करावी. हे देवी तू विष्णूला प्रिय असून  सर्व देवांना वर देणारी आहेस. तुला शरण येणार्‍यांना तू प्रसन्न होऊन गती प्राप्त करून देतेस तरी तुझ्या दर्शनाने  तू मला प्रसन्न हो.
(नमस्ते सर्व देवानां वरदासि हरे: प्रिया |या गतिस्त्वत्प्रन्नानां सा मे स्यात्तव दर्शनात||
श्रीलक्ष्मीच्या जवळच श्री कुबेराची मूर्ती किंवा यंत्राची स्थापना करून त्याची प्रार्थना करावी.
निधी व पद्म यांचा अधिपती असलेल्या हे श्री कुबेरा तुला माझा नमस्कार असो. माझ्यावर धनधान्य व संपत्ती ची कृपा कर.
(धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च |भवन्तु तत्प्रसादेन धनधान्यविसम्पद ||
यानंतर यथाविधी श्री लक्ष्मीचे व श्री कुबेरा चे पूजन करावे. श्री लक्ष्मीला हळदकुंकु वहावे. उपलब्ध असलेली फुले वहावीत.तसेच श्री कुबेराला अष्टगंध किंवा रक्तचंदनाचा टिळा लावावा. पांढरी फुले वहावीत.
यानंतरही कुबेर देवाचा दुर्लभ व प्रभावी मंत्र 11 वेळा म्हणावा.
( ॐ श्रीं, ॐ र्हीं  श्रीं, ॐ  र्हीं श्रीं क्लीं वित्तेश्र्वराय नम:  ||)
यानंतर श्री लक्ष्मीचे श्री सुक्त येत असल्यास किंवा मोबाईलवरून  मोठ्या आवाजात लावावे. त्यातील ऋचाांची स्पंदने आपल्या घरामधे पसरणे हा हेतू आहे.)
त्याच वेळी लेखणी, पेन व चोपडी यांची पूजा करावी. चोपडीच्या दुसर्या पानावर  श्री: असे लिहून चोपडी लिहीण्याचा मुहूर्त करावा. (तुळशीच्या किंवा इतर कोणत्याही शुभ खाडीला कणभर कापूस गुंडाळून त्याने ओल्या कुंकवात बुडवून श्री: असे लिहावे.) श्री सुक्त सुरू असताना श्री लक्ष्मीस व श्री कुबेर देवास फुले व्हावीत. देवीला सुवासिक फुले वहावीत.कापसाचे वस्त्र वहावे. श्री देवीच्या अंगावर एखादा सोन्याचा  दागिन घालावा. श्री कुबेराच्या गळ्यात मोत्याचा दागिना घालावा.चोपडीची पूजा करावी. यानंतर संपूर्ण चौरंग  सजवावा. प्रथम निरांजनाने ओवाळावे व महानैवेद्ध किंवा पेढे किंवा बत्तासे यांचा नैवेद्ध दाखवावा. व श्री महालक्ष्मीची व श्री कुबेराची आरती करावी..
कुबेर आरती
उँ जै यक्ष कुबेर हरे,
स्वामी जै यक्ष  जै  कुबेर हरे |
शरण पडे भगतों के,
भण्डार कुबेर भरे |
उँ जै यक्ष कुबेर हरे ||1||
शिव भक्तोमें भक्त कुबेर बडे़,
स्वामी भक्त कुबेर बडे|
दैत्य दानव मानवसे,
कई कई युद्ध लडे़ |
उँ जै यक्ष कुबेर हरे ||2||
स्वर्ण सिंहासन बैठे,
शिर पर छत्र फिरे,
स्वामी सिरपर छत्र फिरे |
योगिनी मंगल गावैं,
सब जय जय कार करैं |
ऊँ जै यक्ष कुबेर हरे ||3||
गदा त्रिशुल हाथ में,
शस्त्र बहुत धरे,
स्वामी शस्त्र बहुत धरे|
दु:ख भय संकट मोचन,
धनुष टंकार करें |
ऊँ जै यक्ष कुबेर हरे ||4||
भांति भांति के व्यंजन बहुत बने,
स्वामी व्यंजन बहुत बने |
मोहन भोग लगावैं,
साथमें उड़द चणे |
ऊँ जै यक्ष कुबेर हरे ||5||
बल बुद्धि  विद्या दाता,
हम तेरी शरण पडे़,
स्वामी हम तेरी शरण पडे़ |
अपने भक्त जनों के,
सारे काम संवारे |
ऊँ जै यक्ष कुबेर हरे ||6||
मुकुट मणी की शोभा,
मोतियन हार गले,
स्वामी मोतियन हार गले |
अगर कपूर की बाती,
घी की झोत जले|
ऊँ जै यक्ष कुबेर हरे||7||
यक्ष कुबेर जी की आरती,
जो कोई नर गावे,
स्वामी जो कोई नर गावे|
कहत प्रेमपाल स्वामी,
मनवांछित फल पावे |
 ||इति श्री कुबेर आरती ||
श्री कुबेर व अष्टलक्ष्मी मंत्र
ॐ ह्रीं श्रीं श्रीं  क्रीं श्रीं कुबेराय अष्ट लक्ष्मी
मम गृहे धनं पुरय पुरय नम:||
हा मंत्र कुबेर लक्ष्मीची पुजा झाल्यावर कुटुंबातील सर्वानी एकत्र बसुन एकत्रितपणे  एका सुरात वरील मंत्र म्हणावा.
मंत्र : ‘ॐ आद्य लक्ष्म्यै नम:’।
मंत्र : ‘ॐ सौभाग्य लक्ष्म्यै नम:’।
मंत्र : ‘ॐ वाहन लक्ष्म्यै नम:’।
मंत्र :’ॐ स्थिर लक्ष्म्यै नम:’ या ‘ॐ अन्न लक्ष्म्यै नम:’।
मंत्र : ‘ॐ सत्य लक्ष्म्यै नम:’।
मंत्र :’ॐ भोग लक्ष्म्यै नम:’।
मंत्र :’ॐ योग लक्ष्म्यै नम:’।
मंत्र :’ॐ नमो भाग्य लक्ष्म्यै च विद्महे अष्ट लक्ष्म्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोद्यात’।
                  ||शुभं भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *