Read in
बुधवार 03 नोव्हेंबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 03 नोव्हेंबर चंद्ररास कन्या 20 :53 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र हस्त 09:47 पर्यंत व नंतर चित्रा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज तुम्हाला नोकरीतील आनंदाचे क्षण व तुमच्या कर्तृत्वाचे कौतुक ऐकायला मिळणार आहे. तुमच्या पाळीव प्राण्यांपासू आनंदमिळेल.लहानश्या दुखण्याचा आज जराही विचार करू नका.
वृषभ :–संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. ज्यांचा गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे त्यांना अचानक मोठा लाभ होईल. मुले आपल्या अचाट कल्पनाशक्तीचा वापर करतील.
मिथुन :–आईवडिलांचा मुलांबरोबर मतभेद होईल. शेअर्समधे आज कोणताही मोठा व्यवहार करू नका. आजच्या व्यवहारात नुकसान संभवते. प्रेमाच्या व्यवहारात अडचणी निर्माण होणार आहेत.
कर्क :–नोकरदार वर्गास अचानक आँफीसच्या कामानिमित्त बाहेर गावी जावे लागणार आहे. महिलांना नवीन कानाचा दागिना मिळण्याची संधी आहे. तरूणांनी अचानक न झेपणारे धाडस करू नये.
सिंह :–परगावी शिकत असलेल्यांना घरी येण्याची घाई होईल. आईच्या आवडत्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी आटोकाट प्रयत्न कराल. वडीलांना शेअर्समध्ये चांगला होईल.
कन्या :-आज तुमच्या घरगुती उद्योगाला व्यवसायाचे वळण देण्याचा विचार कराल. सौंदर्यप्रसाधनाच्या उद्योगातून आज चांगली आर्थिक प्राप्ती होईल. ब्युटी पार्लरच्या उद्योगातून चांगली प्राप्ती होईल.
तूळ :–ज्यांना कर्जमुक्त व्हायचे आहे त्यांनी आज विचार केल्यास योग्य नियोजन करता येईल. राजकीय किंवा नोकरीतील तुमचा प्रतिस्पर्ध्यांबरोबर मतभेद होणार आहेत तरी शांतपणाने रहावे लागेल.
वृश्र्चिक :–तुम्हाला तुमच्या कारकिर्दीतील महत्वाचा टप्पा गाठत असल्याचे जाणवेल. कुटुंबातील परस्परातील मतांवर चर्चा करून मगच निर्णय घ्यावा लागेल.
धनु :–गेल्या महिन्यातील भेडसावणाऱ्या प्रश्र्नावर योग्य तो उपाय सापडेल. अचानक प्रवासाच्या ठरणार्या कार्यक्रमात तुमचा सहभाग महत्वाचा राहील. आरोग्याच्या बाबतीत बेफिकीरीने वागू नका.
मकर :–शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर गावी असलेल्यांना आपल्या घरी येण्याची संधी मिळेल. वयस्कर मंडळींना डोळे दुखण्याचा किंवा इतरही त्रास संभवतो तरी काळजी घ्यावी.
कुंभ :–बर्याच वर्षापासून न भेटलेल्या मित्रमंडळींबरोबर भेटण्याची संधी मिळेल. अचानक पुरूष मंडळींकडून मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. महिलांना मोनोपाँजचा त्रास होईल.
मीन :–बर्याच दिवसापासून येणे बाकी असलेले विम्याचे पैसे लवकरच मिळणार असल्याचे कळेल. कौटुंबिक जीवनात महत्वाच्या बाबींवर निर्णय काय घ्यावा हे सुचणार नाही तरी जोडीदाराचा सल्ला घ्या.