Read in
02 नोव्हेंबर 2021 मंगळवार गुरुद्वादशी आणि धनत्रयोदशी
अश्विन कृष्ण द्वादशीला गुरुद्वादशी साजर केली जाते. या वर्षी गुरुद्वादशी मंगळवारी असून द्वादशीची तिथी सोमवारच्या 13:21 ते मंगळवारच्या 11:31 पर्यंत आहे.
ll श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll
अश्विन कृष्ण द्वादशीला गुरुद्वादशी साजर केली जाते. या वर्षी गुरुद्वादशी मंगळवारी असून द्वादशीची तिथी सोमवारच्या 13:21 ते मंगळवारच्या 11:31 पर्यंत आहे.
सूर्याचे पूर्वाफाल्गुनी नक्षत्र हे थोडेसे अरिष्ट नक्षत्र आहे. पण मुहुर्त शास्त्रात महत्वाचे नक्षत्र आहे. वास्तु, गृहप्रवेश, घर बांधणी, कोनशिला बसवणे, छप्पर घालणे यासाठी शुभ आहे. तसेच बागेच्या सर्वच कामाकरता म्हणजे भी पेरणी, औषधी झाडे लावणे, शेतकामाची सुरूवात करणे, यांसाठी पण चांगले आहे. विहीर खोदण्यासाठी हा मुहुर्त उत्तम आहे. विद्याभ्यासही या मुहुर्तावर सुरू केल्यास चांगले यश मिळते. बाळाचे बारसे करणे, कान टोचण्यासही हे नक्षत्र चांगले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे राज्याभिषेकास अतिशय लाभदायक आहे. म्हणूनच गुरूद्वादशीच्या या मुहुर्तावर वरीलपैकी जे करणे शक्य असेल ते करून घ्या व लाभ घ्या.
या गुरुद्वादशीला शिष्य श्री गुरूंचे समर्पण भावनेने पूजन करतात. म्हणून या दिवसाला गुरुद्वादशी म्हणतात. या दिवशी ब्रह्मॅनण्डा मध्ये गुरुतत्वाची वाढ होते त्यामुळे या दिवसाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या दिवशी गुरुतत्व वाढल्यामुळे वातावरणातून आपण मनापासून गुरूला मारलेली हाक गुरुपर्यंत पोहचते. अभ्यासू साधकाला गुरू दीक्षा देऊन त्याचा शिष्य म्हणून स्वीकार करतात आणि त्याच्या पुढील आयुष्याचा मार्ग सुखकर करतात. अध्यात्मिक उपासकांना अध्यात्माचा मार्ग सोपा करून मार्गस्थ करतात. वास्तविक गुरुद्वादशी ही श्रीदत्त संप्रदायामध्ये एक अद्वितीय पर्वणीच ठरते. महाराष्ट्रातील श्रीदत्त शक्तिपिठांमध्ये लाखो भक्त हा सोहळा अतिशय उत्साहाने श्रद्धेने साजरा करतात.
श्रीदत्तात्रेयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ हे अश्विन कृष्ण द्वादशीला म्हणजे याच दिवशी श्रीशैल मूर्ती मध्ये अदृष्य झाले.
श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी सांगली जिल्ह्यातील नरसोबाची वाडी येथे मनोहर पादुकांची स्थापना केली व याच दिवशी पुढे ते गाणगापूरला प्रस्थान करते झाले.
श्री टेंबेस्वामी महाराजांनी परमपूज्य योगीराज गुळवणी महाराजांच्या हातात याच दिवशी चांदीच्या पेटीत घालून एक संरक्षक कवच बांधले व प्रत्येक गुरुद्वादशिस तेथे येण्याचा गुळवणी महाराजांनी संकल्प सोडला. नृसिंहवाडीतील सर्व महिला प्रत्येक गुरुद्वादशीला परमपूज्य गुळवणी महाराजांना ओवळत असत. व महाराजही प्रत्येकीला 1 रुपया ओवळणी घालत. अशाप्रकारे ही गुरुद्वादशी ही श्रीदत्तपरंपरेच्या भक्तांसाठी अतिशय मोलाची, महत्त्वाची, आणि आशिर्वाद देणारी आहे.
ज्या व्यक्तिंनी श्रीदत्तपरंपरेची दीक्षा घेतली आहे त्यांनी व ज्यांनी दीक्षा ना घेता श्री दत्तगुरूंना आपले गुरू मानले आहे त्यांनी आपला नित्यनेमाचे श्री दत्त मंत्राचे नामस्मरण करावे व मनापासून शरण जावे.
ज्यांना औषधानेही गुण येत नाही अशांनी श्रीदत्त शक्तीस मनोभावे शरण जाऊन प्रार्थना करावी.
ll श्री गुरूदेव दत्त ll