Read in
रविवार 31 आँक्टोबर 2021 ते शनिवार 06 नोव्हेंबर 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य.
रविवार 31 चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र. मघा 13:15 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे
सोमवार 1 नोव्हेंबर चंद्ररास सिंह 18:39 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 12:52 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी. मंगळवार 02 चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 11:43 पर्यंत व नंतर हस्त. बुधवार 03 चंद्ररास कन्या 20:53 पर्यंत व नंतर तुळ. चंद्रनक्षत्र हस्त 09:57 पर्यंत व नंतर चित्रा. गुरूवार 04 चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र चित्रा 0742 पर्यंत व नंतर स्वाती. शुक्रवार 05 चंद्ररास तूळ 21:04 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 26:22 पर्यंत व नंतर अनुराधा. शनिवार 06 चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 23:38 पर्यंत व नंतर ज्येष्ठा.
सोमवार रमा एकादशी गोवत्स द्वादशी, वसुबारस.
मंगळवार गुरूद्वादशी, धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती, भौम प्रदोष.
बुधवार शिवरात्री, कुळधर्म, उल्कादर्शन.
गुरूवार नरकचतुर्दशी, अभ्यंगस्नान.
शुक्रवार बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा.
शनिवार यमद्वितीया, यमपूजन, भाऊबीज,
मेष :–हा दिपावलीचा सप्ताह तुम्हाला नोकरी, व्यवसाय आणि गुंतवणूकीसाठी चांगलाच लाभदायक आहे. व्यवसायातील अडचणींवर सहजपणे उपाय सापडेल. आजपर्यंत ज्या गोष्टींचा उलगडा होत नव्हता त्याबाबतची माहिती हळू हळू सोमवारपासून मिळू लागेल. फार उतावीळपणा करू नका. गरजवंताना तुमच्याकडून मोठी आर्थिक मदत होणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह चांगला जाणार असल्याने काम करण्याची उर्जा भरपूर असेल.दिपावलीचे लक्ष्मीपूजन व्यवसाय वृद्धी करणारे आहे.
वृषभ :हा संपूर्ण सप्ताह तुम्हाला व्यावसायिक दृष्ट्या अतिशय चांगला जाईल. त्यातील महत्वाच्या कामाकरता तुम्हाला जर आईने कांही सूचना दिल्या असल्यास त्या तंतोतंत पाळा. तसेच गुंतवणूकीबाबतही तुमचे स्वत:चे डोके न चालवता मार्गदर्शन घ्यावे लागेल. मग मात्र फायदाच फायदा आहे. आरोग्य विभागात काम करणार्यांना वरीष्ठांकडून कौतुकाचे शब्द मिळतील व सन्मान केला जाईल. दिपावलीचे लक्ष्मीपूजन नोकरीतील तुमचे स्थान भक्कम करेल.
मिथुन :–वाहन किंवा घराची विक्री करण्याचा विचार असेल तर या सप्ताहात तु म्हाला जाहिरात करायला हरकत नाही प्रतिसाद चांगला मिळेल. विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीचे व सोयीचे रायटींग टेबल घेण्याची संधी मिळणार आहे. बुधवार, गुरूवार तर आनंदाची पर्वणीच होणार आहे. आई वडीलांना भेटण्यासाठी दूर असणारी मुले व विवाहित मुलीही माहेरी येतील. अपत्य प्राप्तीच्या प्रतिक्षेतील दांपत्यास आनंदाची बातमी मिळेल.
कर्क :–हा दिपावलीचा सप्ताह तुमच्यासाठी धनलाभ व मातृसुखाचा पुरेपुर लाभ करून देणारा आहे. जे अपत्यप्राप्तीच्या प्रतिक्षेत आहेत त्यानाही आता फार वेळ वाट पहावी लागणार नाही. डाँक्टरी उपचारांनाही यश येणार आहे. ज्यांच्या वडीलांना नोकरीत अडचणी व संकटांचा सामना करावा लागतोय त्यांना आता बराच दिलासा मिळणार आहे. नोकरीतून कांही कालावधी करीता दुसर्या गावी जावे लागणार असल्याचा निरोप कींवा आँर्डर मिळणार आहे.
सिंह :– हा दिपावलीचा सप्ताह तुमच्यासाठी मनातील इच्छा पूर्ण करणारा ठरेल. ज्यांना आपल्या व्यक्तिमत्वात बदल करावयाचा आहे त्यांनी आलेली संधी घालवू नका. कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय बँकेचे कर्ज प्रकरण करण्याच्या भानगडीत पडू नका. प्रेमप्रकरणात मात्र कांहीसा कटु अनुभव येईल तसेच घरातील वडीलधार्यांकडून मनासारखा सपोर्ट मिळणार नाही. बालसंगोपन केंद्र चालवणार्या महिलांनी त्यात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करावा.
कन्या :–हा दिपावलीचा सप्ताह तुमच्यासाठी मनातील इच्छा व महत्वाकांक्षा पूर्ण करणारा ठरेल. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणापुढे इतर गोष्टी गौण वाटतील व महत्त्वाकांक्षेच्या पोटी इतरांचे ऐकणार नाहीत. कुटुंबातील अचानक एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीबरोबर मतभेद होऊन वाद निर्माण होईल तरी सांभाळूनच रहावे. लहान मुलांच्या कल्पना शक्तीला व स्मरण शक्तीला सलाम करावा लागेल. मुले त्यांचा प्रभाव इतरांवर पाडतील.
तूळ :–या दिपावलीच्या सप्ताहात तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींची अतिशय चांगली साथ मिळणार आहे. जवळच्या व्यक्ती, खंदे पाठीराखे यांच्या प्रेमाचा व मदतीचा अनुभव येईल. जर तुमची एखादी वस्तू चोरीला गेलेली असेल तर त्या वस्तूचा पत्ता लागेल. निदान माहिती तरी कळेल. गूढविद्ध्या, गुप्तविद्ध्या यांचा अभ्यास करणार्यांना त्यातील कांही तंत्र अवगत करण्याची कला समजणार आहे. एकलकोंडोपणाच्या आहारी गेलेल्यांना जीवनातील आनंदाचा साक्षात्कार होईल.
वृश्र्चिक :–हा दिपावलीचा सप्ताह तुमच्यासाठी तुमच्या कार्यक्षेत्रासंबंधित अचंबित करणार्या गोष्टींचा अनुभव देणारा ठरेल. उद्धोग व्यवसायातील प्रगतीचा आलेख चढता राहील व नवनव्या तंत्रांचा वापर करण्याची इच्छा पूर्ण करता येणार आहे. उच्चशिक्षितांना तसेच राजकीय व सामाजिक पदाधिकार्यांना मानसन्मान , प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळेल. कोर्टकेसमधे अडकलेल्यांना जामिन मिळण्यासाठी आता फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत.
धनु :–या सप्ताहात तुमच्या पूर्वपुण्याईमुळे व पूर्वजांच्या आशिर्वादाने तुमच्या भाग्योदयाची चुणूक दिसून येईल. आईवडीलांच्या व्यवसायातून आज तुम्हाला अचानक नवीन ओळख मिळेल. संशोधन संस्थेत काम करणार्यांना, प्रबंध लेखनाचे ज्यांचे काम शुरू आहे त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळेल. मनातील अनुत्तरीत प्रश्न विचारानेच सोडवावे लागतील अंदाजाने सुटणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या परदेशी जाण्याची प्रक्रिया मात्र ठरलेल्या वेळेत व मुदतीत पूर्ण होणार नाही.
मकर :–हा दिपावलीचा सप्ताह अचानक द्रव्यप्राप्ती करून देणारा ठरेल. पूर्वजांचे धन सहजपणे न मागताही तुमच्यापर्यंत येणार असल्याची बातमी मिळेल. निवृत्त झालेल्या ज्येष्ठ मंडळींना आपला पी. एफ. सहजपणे विनासायास मिळणार असल्याचे कळेल. राना वनात, शेतात, झाडाझुडपात फिरायला जाणार असाल तर विषारी किडा मुंगी, प्राण्यांपासून सावध रहावे लागेल. गर्भवती स्त्रीयांनी विशेष काळजी घ्यावी.
कुंभ :–दिपावलीचा हा सप्ताह विशेषकरून महिलांना लाभदायक जाणार आहे. व्यवसायासाठी बँकेकडे मागितलेल्या कर्जाची सहजपणे सोय होणार असल्याचे कळेल. प्रेमविवाहाच्या ठरलेल्या कार्यक्रमास कुटुंबियांकडे अनुमती मिळेल. व्यापार व्यवसायातील आर्थिक व्यवहार, व उलाढाली करताना अतिशय जागरूक रहावे लागेल. घटस्फोट घेऊ इच्छिणार्यांच्या , तसेच वैवाहिक जाीवनातील अडचणींवर चर्चेतून मार्ग निघेल व पुनर्मिलनाची संधी मिळेल.
मीन :–दिपावलीचा हा सप्ताह तुम्हाला नोकरी व व्यवसाय या दोन्हीतील अडचणी दूर करणारा ठरेल. वैवाहिक जोडीदाराच्या बरोबर केलेली चर्चा महत्वाची ठरेल. भागिदारीतील मुदत वाढवण्यातील अडचणी दूर होतील. उत्पादन क्षेत्रातील कामगार मंडळीना अचानक आर्थिक लाभ होणार असल्याचे कळेल. कोर्टकेसच्या बाबतीत जराही दुर्लक्ष केल्यास तुमचे नुकसान होण्याचा धोका आहे. प्रतिस्पर्धी व्यक्तीस तुमच्यावर मात करणे या सप्ताहात अवघड जाणार आहे.
||शुभं-भवतु ||