daily horoscope

शनिवार 30 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 30 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 30 आँक्टोबर चंद्ररास कर्क 12:50 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 12:50 पर्यंत व नंतर मघा.

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश

वरील दोन्ही राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–लहान मुलांच्या अंगी आईच्या  आवडीच्या कला असल्याचे लक्षांत येईल. गायन कलेला मुले जास्त प्राधान्य देत असल्याचे जाणवेल. मुलांना पटणार्‍या गोष्टी मामाकडून सांगितल्यास  मुले पटवून घेतील.

वृषभ :–मैत्रिणीच्या आग्रहाखातर तिच्या  आईकडे  जाण्यासाठी लहानसा  प्रवास होईल. आवडत्या  वस्तूंची अपेक्षा करताही सहजपणे तुम्हाला मिळणार आहे.

मिथुन :–कुटुंबात गोड पाहुणा येणार असल्याची बातमी मिळेललहान सहान गोष्टींवरून ज्येष्ठांचे मन नाराज होईल. कोणत्याही कामासाठी आजचा दिवस वापरल्यास तुम्हाला लाभ होणार आहे.

कर्क :–मनातील प्रबळ इच्छेमुळे कामाची ओढ वाढेल. भावंडामधील समझ गैरसमज संपून आज दोघांमधे  गोड नातेसंबंध निर्माण होतील. पतीपत्नीच्या मनात एकच विषय घोळत राहील.

सिंह :–टाकाऊ पदार्थातून टिकाऊ वस्तू तयार करून  इतरांकडून प्रशंसा मिळवाल. घरगुती व्यवसायातील आर्थिक वाढ समाधानकारक झाल्याने कष्टाचे महत्व कळेल

कन्या :–परदेशी असलेल्या तरूणांना आपल्या घरी परत येण्याची ओढ लागेल. नोकरीत सहकार्‍यांच्या  अप्रत्यक्ष मदतीने  हातातील काम पूर्ण कराल. सहकार्‍यांची कींमत कळेल

तूळ :–वडीलांच्या मदतीने जुने स्वप्न साकार  करता येणार आहे. नवीन घराच्या थटलेल्या हप्त्यांसाठी  वडील भावंडाची चांगली मदत मिळेलअडचणींचा बाऊ करू नका

वृश्र्चिक :–कुटुंबातील अती ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने वा सल्ल्याने वागल्यास नुकसान टळेलमनात आले म्हणून कोणत्याही कामाची घाई करू नका. शाळकरी मुलांना बढाया माराव्याशा वाटतील

धनु :–दुखर्या पायाला पुन: त्रास होण्याचा धोका आहे. मैदानी खेळ खेळणार्यांनी अती आत्मविश्वासात कामगिरी करू नये. तरूणांना मित्रमैत्रिणीच्या घरी जेवणाचे आमंत्रण मिळेल

मकर :– वयस्कर मंडळीना ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच घडेल. नोकरीतील महत्वाची कागदपत्रे, फाईल वेळेत सापडणार नाहीत. सहकार्‍यांच्या मदतीने कामातील अडचण दूर कराल

कुंभ :– आज अचानक पत्नीबरोबर सासुरवाडीला जाण्याचा योग येईल. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग इतरांकडून कौतुकाचा राहील. आजचा दिवस अतिशय आनंदाचा राहील

मीन :– आज तुमच्या जवळच्या मित्राला तुमच्याजवळ मन मोकळे करावेसे वाटेल.   पतीपत्नीच्या  एकत्रित व्यवसायाला नव्याने चालना मिळत असल्याचे लक्षांत येईल

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *