Read in
शुक्रवार 29 आँक्टोबर 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 29 आँक्टोबर चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 11:37 पर्यंत व नंतर आश्लेषा.
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
वरील दोन्ही राशीचा व दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–कुटुंबाबद्दल असलेल्या प्रेमाखातर आज मोठा खर्च करण्याचे ठरवाल. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत लेखनाची सुरूवात कराल.
वृषभ :– गाण्याच्या कार्यक्षेत्रात तुमच्याकडून उत्तम कामगिरी होत असल्याचे जाणवेल. पोस्ट, टेलिफोन मधे काम करणार्यांना नोकरीत आनंदाची बातमी कळेल.
मिथुन :–हातातील कामात धरसोड वृती करू नका. हातातील कामाच्या गर्दीमुळे धांदल उडेल. सहकार्यांच्या मदतीने कामास पुढे न्याल.
कर्क :– पहिले वाहन असूनही दुसरे वाहन बुक करण्याचा मोह आवरणार नाही. तरूण वर्ग आपल्या मतालाच चिकटून राहील इतरांचे त्यांच्यापुढे काहीही चालणार नाही.
सिंह :–तुमच्या अंगभूत गुणांचा वापर करण्याची संधी मिळणार आहे व तुम्हाला स्वत:ला सिद्ध करता येणार आहे. तरी जराही मागे हटू नका. कुटुंबातील ज्येष्ठांचे आशिर्वाद कामी येतील.
कन्या :– सहविचाराने घेतलेला निर्णय फायदेशीर असल्याचे मुलांना पटेल व त्यांचा विरोध मावळेल. तुमच्या मनातील भावनांना आवरणे आज तुम्हाला कठीण जाणार आहे. भावूक व्हाल.
तूळ :–जाहिराती व प्रचार साहित्य, वर्तमानपत्रे येथे काम करणार्यांवर फार मोठी जबाबदारी सोपवली जाईल. विशाल दृष्टीकोनाच्या अभावी संधीचा फायदा घेऊ शकणार नाही.
वृश्र्चिक :–शारिरीक व्याधीमुळे आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मदत करता येणार नाही. तरूणांनी प्रवाहाविरुद्ध विचाराने वागू नये. अँसिडीटीचा त्रास होईल.
धनु :–प्राण्याबद्धचे तुमचे प्रेम व मायाळूपणा वाढेल व आजारीप्राण्यांसाठी आर्थिक मदत द्याल. सारासार विचाराने वागणे आज तुम्हाला बिल्कुल जमणार नाही.
मकर :–तुमच्या मनातील प्रबळ इच्छेपुढे इतर कोणाचेही काहीही चालणार नाही व तुमच्या मताचा आदर करतील. राजकीय मंडळींचे विरोधकांवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.
कुंभ :–खोट्या कल्पनेपायी विनाकारण खर्चाचा डोंगर वाढवाल. नोकरीतील प्रश्र्नावर पूर्ण विचाराशिवाय तुमचे मत व्यक्त करू नका. कुटुंबात नाराजी निर्माण होईल.
मीन :–परिस्थितीपुढे हार न मानता विचारांची दिशा बदलून काम करा. इतरांच्या चुका दाखवताना सौम्य शब्दात व्यक्त व्हा. सरकारी नियमांचे पालन करा.
||शुभं-भवतु ||